Sulaibiya Area of Kuwait 
ग्लोबल

VIDEO : जगातील सर्वात मोठ्या टायर्सच्या डम्पिंग ग्राऊंडला आग

कार्तिक पुजारी

कुवैतच्या सुलैबिया क्षेत्रात (Sulaibiya Area of Kuwait) असलेल्या जगातील सर्वात मोठ्या टायर्सच्या कब्रस्तानला (World’s Biggest Tyre Graveyard) आग लागली आहे.

कुवैत सिटी- कुवैतच्या सुलैबिया क्षेत्रात (Sulaibiya Area of Kuwait) असलेल्या जगातील सर्वात मोठ्या टायर्सच्या कब्रस्तानला (World’s Biggest Tyre Graveyard) आग लागली आहे. माती खोदून बनवण्यात आलेल्या मोठ्या खड्यांत जवळपास 70 लाख टायर ठेवण्यात आले आहेत. सहा एकरमध्ये पसरलेल्या या जागेला आग लागली आहे आणि मोठ्या प्रमाणात प्रदुषण होत आहे. अंतराळातूनही काळा धूर पाहायला मिळत आहे. सॅटेलाईट फोटोंमध्ये अग्नितांडवाचे दृश्य कैद झालेत. (International Latest News)

टायर एका ठिकाणी का जमा करण्यात आले?

'द सन'च्या रिपोर्टनुसार, सुलैबियाच्या या टायर भंडाराला जगतील सर्वात मोठे टायरांचे कब्रस्तान म्हटले जाते. याठिकाणी असलेले टायर कुवैत आणि इतर देशांमधून आणण्यात आले आहेत. इतर देशांनी टायर घेऊन जाण्यासाठी पैसे दिले आहेत. विल्हेवाटाची जबाबदारी चार कंपन्यांकडे देण्यात आलीये. पैशांसाठी कंत्राटदार हे टायर जमा करत असतात. आग लागल्याने काही प्रश्न उपस्थित होत आहेत. 50 डिग्री सेल्सियस तापमान असलेल्या देशात ज्वलनशील पदार्थ ठेवण्याची परवानगी का देण्यात आली? असा प्रश्न विचारला जात आहे.

2012 मध्येही झाली होती अशी घटना

कुवैत सरकारने 30 वर्षांपासून जमा असलेल्या टायरची विल्हेवाट करणे सुरु केले आहे. रिसायकल करण्यात येणारे 95 टक्के टायर हटवण्याची योजना आहे. 2012 मध्ये कुवैतमध्ये एका दुसऱ्या टायर डम्पला आग लागली होती, ज्यात 50 लाखांपेक्षा अधिक टायर जळून खाक झाले होते. अनेक देशांमध्ये टायरची विल्हेवाट लावणे समस्या बनले आहे. टायरला जाळल्याने हवेमध्ये कार्सिनोजेनिक डायऑक्साइन्स (Carcinogenic Dioxins) विषारी वायू मिसळतो. या प्रदुषणामुळे अस्थमा आणि अनेक गंभीर आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात.

ब्रिटनमध्ये दरवर्षी 4 लाख 86 हजार 000 टायर फेकून दिले जातात. त्यातील जवळपास सर्वांचाच पुन्हा वापर केला जातो. पण, अनेक देशांमध्ये याचा पुन्हा वापर केला जात नाही. 1970 ते 1980 च्या दशकात अमेरिका आणि दक्षिण पूर्व आशियामध्ये फेकून देण्यात आलेल्या टायरचा वापर करत एक कृत्रिम डोंगर निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पण, वादळादरम्यान हे टायर वेगळे झाले आणि प्रदुषणासाठी कारणीभूत ठरले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test : रवींद्र जडेजाने 'तलवार' उपसली! कपिल देव यांचा विक्रम मोडला, Sobers सारख्या दिग्गजांसोबत जाऊन बसला

Latest Maharashtra News Updates : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून बाळासाहेब लांडगे यांचं निलंबन

बाबा वेंगाचं भाकीत खरं ठरणार? पुढच्या 6 महिन्यात 'या' 4 राशी करोडपती होणार? कोणत्या त्या राशी जाणून घ्या...

Pune Accident: बसची वाट बघत उभे होते, तेव्हाच टेम्पो काळ बनून आला अन्..., दोघांचा जागीच मृत्यू, घटनेने पुण्यात खळबळ

Dhule Crime : दारूच्या नशेत पत्नीवर प्राणघातक हल्ला, धुळे कोर्टाने सुनावली ५ वर्षांची शिक्षा

SCROLL FOR NEXT