World Saree Day 2022 sakal
ग्लोबल

World Saree Day 2022: आपली हक्काची लाडकी साडी भारतात जन्मलीच नाही? वाचा इतिहास

पण तुम्हाला साडीचा इतिहास माहिती आहे का?

सकाळ डिजिटल टीम

स्त्री ही साडीत खूप सुंदर दिसते असं म्हटलं जातं. खरं पाहायचं तर साडी हा स्त्रियांच्या आयुष्यातील अविभाज्य घटक बनलाय.

भारतात सत्तर टक्के विवाहीत महिला दररोज साडी नेसतात. याशिवाय काही सण समारंभाला विशेष साडी नेसली जाते. त्यामुळे साडीचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. पण तुम्हाला साडीचा इतिहास माहिती आहे का? (World Saree Day know the origin of the saree history )

इतिहास सांगतो की आपली हक्काची लाडकी साडी भारतात जन्मलीच नाही. हो, हे खरंय. तुमचा विश्वास बसणार नाही पण साडीचा उत्पत्ती भारतात झाली नाही.

संस्कृतनुसार साडीचा शब्दश: अर्थ कपड्याची पट्टी असा होतो. बौद्ध साहित्यामध्ये तर प्राचीन भारतातील महिलांच्या वस्त्राला सत्तिका शब्दाने वर्णित केले आहे.

काही इतिहासकारांच्या मते कपडे शिवण्याची कला ही 2800-1800 ई. पूर्व दरम्यान सुरू झाली आणि सोपोटामियन सभ्यताद्वारे भारतात आली. समकालीन सिंधु घाटी सभ्यता सूती कपड्यांपासून परिचित होते आणि वस्त्राच्या रुपात लंगोटसारखे कपड़े वापरायचे. पुरात्व सर्वेक्षण दरम्यान काही अवशेष, सिंध मधूनही प्राप्त झाले.

1500 ई स पूर्व नंतर जेव्हा भारतात आर्य आलेत तेव्हा पहिल्यांदा वस्त्र शब्दाचा वापर करण्यात आला. ज्याचा अर्थ त्यांच्यानुसार चामड्याचा एक तुकडा असा होता.

त्यानंतर कंबरेच्या चारही बाजूला कपड्याची लांबी असणे आणि त्यात महिलांसाठी एक नवा कपडा ओळखू लागला. त्यामुळे सिंधु घाटी सभ्यताच्या महिलांनी घातलेली लंगोट सारखा कपडा भारताच्या साडीची उत्पती होती, असं म्हणता येईल.

त्यानंतर मौर्यापासून सुंगपर्यंत आणि मुगल कालपासून ब्रिटिशकाळपर्यंत सर्व साड्यांमध्ये फरक दिसून आला.  मौर्य आणि सुंग काळात आयताकार साडी नुमा कपड्याचा वापर करायची जी फक्त महिलांच्या शरीराच्या खालच्या भागाला झाकायची.

त्यानंतर हळूहळू साड्यांची लांबी वाढत गेली आणि मुघल काळात एक क्रांतिकारी बदल आणत शिवण कलेला प्रोत्साहन देण्यात आले आणि आजची साडी उदयास आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

SCROLL FOR NEXT