World Trade Center Attacks eSakal
ग्लोबल

Attacks of 9/11 : ‘वर्ल्ड ट्रेड सेंटर’वरील दहशतवादी हल्ल्यात झाला होता मृत्यू; तब्बल बावीस वर्षांनंतर पटली ओळख

दहशतवाद्यांनी विमान धडकविल्याने इमारतीमध्ये मोठा स्फोट होऊन आग लागली आणि काही मिनिटांतच या गगनचुंबी जुळ्या इमारती कोसळल्या होत्या.

सकाळ वृत्तसेवा

अमेरिकेतील ‘वर्ल्ड ट्रेड सेंटर’वर ११ सप्टेंबर २००१ रोजी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या एका व्यक्तीची ओळख आज बावीसहून अधिक वर्षांनी पटली आहे. जॉन बॅलेन्टाइन निवेन (वय ४४) असे या व्यक्तीचे नाव असल्याचे न्यूयॉर्कच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केले. जॉन हे एका विमा कंपनीचे कर्मचारी होते. त्यांचे कार्यालय वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या १०५ व्या मजल्यावर होते.

दहशतवाद्यांनी विमान धडकविल्याने इमारतीमध्ये मोठा स्फोट होऊन आग लागली आणि काही मिनिटांतच या गगनचुंबी जुळ्या इमारती कोसळल्या होत्या. या घटनेतील अनेक मृतांची ओळख त्याचवेळी पटली असली तरी जवळपास ४० टक्के जणांचे मृतदेह ओळखण्याच्या पलीकडे असल्याने त्यांच्या अवशेषांवर विविध चाचण्या घेतल्या जात आहेत.

अवशेषांची डीएनए चाचणी घेतली जात असली तरी अवशेषांच्या २१,९०० तुकड्यांमधून व्यक्तीची ओळख पटविणे, हे अत्यंत जिकिरीचे काम असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. या हल्ल्यात सुमारे तीन हजार लोकांचा मृत्यू झाला होता. त्यापैकी जॉन निवेन हे ओळख पटलेली अखेरचे व्यक्ती ठरले आहेत.

हौथी बंडखोरांवर अमेरिकेचे हल्ले

दरम्यान, अमेरिकेने आज (शुक्रवार) येमेनमधील हौथी बंडखोरांवर पाचव्यांदा हल्ला केला. या हल्ल्यात बंडखोरांची दोन जहाजभेदी क्षेपणास्त्रे नष्ट करण्यात आल्याचे अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. अमेरिका आणि ब्रिटनकडून संयुक्तपणे हे हल्ले सुरू असले तरी अद्यापही लाल समुद्रातील व्यापारी जहाजांवर हौथींकडून होणारे हल्ले थांबलेले नाहीत.

इस्राईलशी संबंधित जहाजांवर हौथी बंडखोरांकडून हल्ले केले जात आहेत. आजही लाल समुद्रातून जात असलेल्या जहाजांना लक्ष्य करत बंडखोरांनी दोन क्षेपणास्त्रे डागण्याची तयारी सुरू केली असतानाच त्यांच्यावर नजर ठेवून असलेल्या अमेरिकेने तातडीने हल्ला करत ही दोन्ही क्षेपणास्त्रे नष्ट केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Chahar Divorce: क्रिकेटर राहुल चहरचा घटस्फोट!, भाविनक पोस्टद्वारे सोशल मीडियावर झाला व्यक्त

Amravati Crime : भारवाडीनजीक युवकाची निर्घृण हत्या, हल्लेखोर पसार; मृत व्यक्ती गुजरातचा रहिवासी

Trump Tariff: डोनाल्ड ट्रम्प यांचे टॅरिफ बेकायदेशीर; अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय, सुनावणीत काय घडलं?

Amravati News : महापालिकेच्या स्थायी समितीत महायुतीचे वर्चस्व, आठ स्वीकृत सदस्यांची निवड

Budget: अजित पवारांच्या निधनाची चौकशी, ९ लाख कोटींचं कर्ज अन्...; 'हे' मुद्दे महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन तापवणार!

SCROLL FOR NEXT