World War three Ukraine joins NATO Russia warned 
ग्लोबल

तिसरे जागतिक महायुद्ध होईल; रशियाने दिला इशारा

युक्रेनच्या ‘नाटो’तील समावेशावर रशियाने दिला इशारा

सकाळ वृत्तसेवा

मॉस्को : अमेरिकेच्या नेतृत्वाखालील उत्तर अटलांटिक करार संघटनेचे (नाटो) सदस्यत्व युक्रेनला मिळाल्यास तिसऱ्या जागतिक महायुद्धाला तोंड फुटेल अशा इशारा ‘सिक्युरिटी कौन्सिल ऑफ रशियन फेडरेशन’चे उपसचिव अलेक्झांडर वेनेडिक्त्सोव्ह यांनी ‘तास’या सरकारी वृत्तसंस्था गुरुवारी दिलेल्या मुलाखतीत दिला आहे.

युक्रेनमधील १८ टक्के भूभागाचे रशियात विलीनीकरण झाल्याची अधिकृत घोषणा अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी ३० सप्टेंबरला केली होती. त्यानंतर काही तासांतच युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांनी ‘नाटो’चे सदस्यत्व तातडीने मिळण्याच्यादृष्टिने हालचाली सुरू केल्या. पण युक्रेनला ‘नाटो’त सहभागी करून घेण्याची प्रक्रिया मोठी आहे. यासाठी संघटनेच्या सर्व ३० सदस्य देशांची मान्यता त्यासाठी आवश्‍यक आहे. तरीही युक्रेनने त्यासाठी पाऊल उचलले. याचा परिणाम म्हणजे म्हणजे तिसऱ्या जागतिक महायुद्धाला सुरुवात असेल, हे युक्रेनला चांगलेच माहीत आहे, असे वेनेडिक्त्सोव्ह म्हणाले.

वेनेडिक्त्सोव्ह हे रशियाच्या ‘सिक्युरिटी कौन्सिल’चे सचिव निकोलाय पात्रुशेव्ह यांचे कनिष्ठ अधिकारी आहेत. ते म्हणाले, की युक्रेनला ‘नाटो’चे सदस्यत्व मिळाल्यास त्याचे काय परिणाम होतील, हे पाश्‍चिमात्य देशही जाणतात. त्यामुळे युक्रेनची मागणी हा प्रचाराचा भाग आहे. असे पाऊल उचलणे हे आत्मघातीपणाचे आहे, हे ‘नाटो’च्या सदस्यांनाही समजले आहे.

आण्विक संघर्ष मानवजातीसाठी विनाशकारी

‘‘रशियावर प्रतिहल्ला करण्याचे झेलेन्स्की यांच्या आवाहनात जगाला तिसऱ्या महायुद्धाला सामोरे जाण्याचा धोका त्यात दडला होता. आण्विक संघर्षाचा परिणाम हा केवळ रशिया किंवा पाश्‍चिमात्य देशांपुरता मर्यादित राहणारा नसून संपूर्ण या जगातील प्रत्येक देश त्यात भरडला जाणार आहे. त्याचे परिणाम सर्व मानवजातीसाठी विनाशकारी असतील,’’ असे वेनेडिक्त्सोव्ह म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDI Insurance: भारत विमा क्षेत्रात मोठी क्रांती करणार! १००% FDI ला मंत्रिमंडळाची मंजुरी, पॉलिसीधारकांवर काय परिणाम होणार?

Yashasvi Jaiswal संघात असूनही मुंबईने धापा टाकल्या; मोहम्मद सिराजच्या माऱ्यासमोर सारेच हतबल, हैदराबादचा विजय जवळपास पक्काच

Maharashtra News : लिफ्ट अपघात रोखण्यासाठी नवे कायदे तातडीने लागू करा; आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची सभागृहात मागणी!

Solapur News : लोकनेते गणपतराव देशमुखांचे स्मारक सांगोल्यात मध्यवर्ती ठिकाणी उभारावे; आ. बाबासाहेब देशमुख यांची विधानसभेत भूमिका!

Year End : फोटोग्राफीसाठी कोणता फोन खरेदी करावा? 2025 वर्षातले टॉप 5 स्मार्टफोन, बेस्ट कॅमेरा अन् परवडणारी किंमत

SCROLL FOR NEXT