World Most Expensive Number Plate Sakal
ग्लोबल

Expensive Number Plate: जगातील सर्वात महागड्या नंबर प्लेटचा करोडोंमध्ये लिलाव, खरेदीदाराने ठेवली 'ही' अट

मोस्ट नोबल नंबरचा दुबईमध्ये लिलाव झाला

राहुल शेळके

World Most Expensive Number Plate: प्रत्येक वाहनाला नंबर प्लेट असते. त्यामुळे वाहन ओळखण्यासाठी त्याची मदत होते. भारतात, आरटीओ कार्यालयांतर्गत वाहनांना नंबर दिला जातो, ज्यासाठी काही रुपये आकारले जातात.

पण एक नंबर प्लेट करोडोंमध्ये विकली जाते असे तुम्ही ऐकले आहे का? आज आम्ही अशाच एका नंबर प्लेटबद्दल सांगणार आहोत, जी करोडो रुपयांना विकली गेली आहे.

खरं तर, मोस्ट नोबल नंबरचा दुबईमध्ये लिलाव झाला, ज्यामध्ये अनेक नंबर लाखो कोटींना विकले गेले. या लिलावात P7 नंबर प्लेट सर्वाधिक किंमतीला विकली गेली आहे. त्याची किंमत इतकी आहे की मुंबईतील पॉश भागात कोट्यवधींचा फ्लॅटही खरेदी करता येतो.

P7 नंबर प्लेट कितीला विकली?

दुबईतील मोस्ट नोबल नंबर्सच्या लिलावादरम्यान, कारची नंबर प्लेट P7 विक्रमी 55 दशलक्ष दिरहम किंवा सुमारे 1,22,61,44,700 रुपयांना विकली गेली. शनिवारी रात्री झालेल्या लिलावात त्यासाठी 15 दशलक्ष दिरहमची बोली लागली.

काही सेकंदात ही बोली 30 दशलक्ष दिरहमच्या पुढे गेली. मात्र, 35 दशलक्ष दिरहमवर गेल्याने ही बोली काही काळ थांबली. यानंतर बोली 55 दशलक्ष दिरहमवर पोहोचली आणि ही बोली पॅनेल सातच्या व्यक्तीने लावली, ज्याने बोली गुप्त ठेवण्याची अट ठेवली.

जुमेराह येथील फोर सीझन हॉटेलमध्ये आयोजित कार्यक्रमात इतर अनेक व्हीआयपी नंबर प्लेट्स आणि फोन नंबरचाही लिलाव करण्यात आला, असे IANS च्या वृत्तात म्हटले आहे. (World’s Most Expensive Number Plate sold for Rs 122.6 crores, sets Guinness World Record)

लिलावातून सुमारे 100 दशलक्ष दिरहम (27 दशलक्ष डॉलर) जमा झाले. कारच्या प्लेट्स आणि विशेष मोबाइल नंबरच्या लिलावातून एकूण 9.792 कोटी दिरहम मिळाले.

एमिरेट्स ऑक्शन, दुबईचे रस्ते आणि वाहतूक प्राधिकरण आणि टेलिकम्युनिकेशन कंपन्या एतिसलात आणि डू यांनी हा लिलाव आयोजित केला होता. या लिलावादरम्यान P7 नंबर पहिल्या स्थानावर आहे. याआधी 2008 मध्ये अबू धाबीच्या व्यावसायिकाने नंबर 1 प्लेटसाठी 5.22 कोटी दिरहमची बोली लावली होती.

बोलीचे पैसे कोणाला दिले जातील :

या लिलावातील सर्व पैसे 'वन बिलियन मील्स' मोहिमेसाठी सुपूर्द केले जातील, ज्याची स्थापना जागतिक उपासमारीचा सामना करण्याच्या उद्देशाने करण्यात आली होती. दुबईचे उपाध्यक्ष आणि शासक शेख मोहम्मद बिन रशीद यांनी रमजानमध्ये देणगी देण्याचा प्रस्ताव दिला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vanraj Andekar vs Govind Komkar: नाना पेठेत थरार! वर्षभरानंतर बदला घेतला, नेमकं काय होतं वनराज आंदेकर प्रकरण?

Bhagwant Mann health Update: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती खालावली ; मोहालीतील फोर्टिस रुग्णालयात दाखल!

Pro Kabaddi: बेंगळुरू बुल्सची बत्तीगुल! यू मुंबाचा ४८-२८ ने एकतर्फी विजय; अजित चौहान ठरला सामन्याचा हिरो

Mira Bhayandar: पाच हजार कोटींचं ड्रग्ज जप्त, मीरा भाईंदर पोलिसांची मोठी कारवाई

Pune Crime: वनराज आंदेकरांच्या खुनाचा बदला! गोविंदा कोमकरची तीन गोळ्या झाडून हत्या; पुणं हादरलं

SCROLL FOR NEXT