meena-harris
meena-harris 
ग्लोबल

लेखिका मीना हॅरिस यांना व्हाइट हाउसने सुनावले

पीटीआय

वॉशिंग्टन - अमेरिकेच्या उपाध्यक्षा कमला हॅरिस यांच्या लोकप्रियतेचा नावाचा वापर स्वतःच्या प्रसिद्धीसाठी करणे मीना हॅरिस यांनी थांबवावे, असे अमेरिकेने सुनावले आहे.  

भारतामधील शेतकरी आंदोलनावर टिप्पणी करणाऱ्या अमेरिकेच्या लेखिका मीना हॅरिस या कमला हॅरिस यांची पुतणी आहे. त्या सोशल मीडियावर सक्रिय असते. कमला हॅरिस उपाध्यक्ष झाल्‍यानंतर त्यांच्या नावाचा वापर मीना हॅरिस स्वतःच्या प्रसिद्धीसाठी नेहमी करतात. भारतातील शेतकरी आंदोलनावरून तिने केंद्र सरकारवर टीका केली. यावर सरकारने तीव्र आक्षेप नोंदविला असून आता अमेरिकेच्या अध्यक्षीय कार्यालयानेही मीना हॅरिस यांच्या वर्तणुकीची गंभीर दखल घेत चिंता व्यक्त केली आहे. उपाध्यक्षा कमला हॅरिस यांच्या प्रसिद्धीचा वापर स्वतःच्या प्रतिमा संवर्धनासाठी न करण्याची ताकीद व्हाइट हाउसच्या कायदे मंडळाने मीना हॅरिसला यांना दिली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘काही गोष्टी पूर्ववत करणे शक्य नाही, पण वर्तणुकीत बदल करणे आवश्‍यक आहे, असे व्हाइट हाउसच्या अधिकाऱ्यांनी त्यांना सुनावले. अमेरिकेच्या उपाध्यक्षांचे नाव असलेले कोणतीही गोष्ट त्या करू शकत नाहीत. पुस्तकांवर उपाध्यक्षा हॅरिस यांचे पहिले नाव लिहिणे किंवा त्यांचा स्वतःच्या ‘फेनॉमिनल’ या ब्रँडच्या स्वेटशर्टवर ‘व्हाइस प्रेसिडंट आँटी’ असे शब्दप्रयोग करण हे अमेरिकेच्या नीतीशास्त्राविरोधात आहे, असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. मध्यवर्ती वकिलांनी मीना यांच्या नव्या नियमांची माहिती दिली असली तरी त्यांनी अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या देणगीदारासह खासगी विमानातून प्रवास केला. 

मीना हॅरिस यांची ओळख
मीना हॅरिस या पेशाने वकील आहेत. त्यांनी स्वतःचा उद्योगही सुरू केला असून इंस्टाग्रामवर त्यांचे आठ लाख फॉलोवर आहेत. इंस्टाग्रामवर त्या राजकारणापासून खासगी मुद्यांवर टीप्पणी करीत असतात. त्यांनी महिलांच्या कपड्यांचा ‘फेनॉमिनल’ हा नवा ब्रँड तयार केला आहे. कमला हॅरिस यांची उपाध्यक्षपदी निवड होण्यापूर्वी मीना यांनी त्यांची आई मीना आणि कमला हॅरिस यांच्यावर ‘कमला ‘हॅरिस अँड मायाज बिग आयडिया’ हे चित्रमय पुस्तक लिहिले आहे. मुलांसाठीही त्या लेखन करतात. त्यांचे ‘अँबिशिअस गर्ल’ हे पुस्तक कमला हॅरिस यांच्या शपधविधीच्या आदल्या रात्री प्रसिद्ध झाले होते.

टीव्हीवरील अनेक चर्चासत्रातही त्यांचा सहभाग असतो. मीना हॅरिस यांचे शिक्षण स्टँडफर्ड आणि हॉर्वर्ड विद्यापीठातून झाले आहे. ‘गोपनीय माहिती आणि सायबर सुरक्षा’ या विषयात त्यांनी ॲटर्नी म्हणून काम केले आहे. २०१६ मध्ये त्यांनी ‘फेनॉमिनल वुमेन ॲक्शन कॅम्पेन’ ही चळवळ सुरू केली होती.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: दत्ता भरणे यांच्याकडून गावकऱ्यांना शिवीगाळ? सुप्रिया सुळे यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार

Latest Marathi News Live Update: अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामीन याचिकेवर सुनावनी सुरू; थोड्याच वेळात फैसला

Delhi Liquor Scam: मनीष सिसोदिया यांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत 15 मे पर्यंत वाढ

Shekhar Suman: हिरामंडी फेम अभिनेते शेखर सुमन यांचा भाजपमध्ये प्रवेश

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बजावला मतदानाचा हक्क

SCROLL FOR NEXT