China America Talk on Ukraine Russia War e sakal
ग्लोबल

Ukraine Russia War : अमेरिकेची चीनसोबत चर्चा; जिनपिंग म्हणाले, 'दोन्ही देश मिळून...'

सकाळ डिजिटल टीम

China America Talk on Ukraine Russia War : चीन युक्रेनवरील युद्धासाठी (Ukraine Russia War) रशियाला मदत करू नये, यासाठी अमेरिका (America) प्रयत्न करत आहे. अमेरिकेने रशियाविरोधात बोलण्यासाठी चीनवर दबाव आणण्याचा प्रयत्नही केला. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन (Biden) यांनी चीनचे राष्ट्रपती शी. जिनपिंग (Xi Jinping) यांच्यासोबत फोनवरून चर्चा केली. यावेळी चीन आणि अमेरिकेने मिळून जागतिक शांततेची जबाबदारी पार पाडली पाहिजे, असं जिनपिंग म्हणाले.

अमेरिकेचे म्हणणे काय? -

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना चीनने पाठिंबा दिल्याबद्दल आणि युक्रेनमध्ये रशियाच्या हल्ल्याचा निषेध न करण्याबद्दल बायडेन यांनी चीनला प्रश्न विचारले. या युद्धाच्या परिस्थितीत चीन कोणाच्या बाजूने उभा आहे? असा सवाल बायडेने यांनी जिनपिंग यांना विचारला, असे व्हाईट हाऊसचे प्रेस सेक्रेटरी जेन साकी यांनी सांगितले.

चीनचं उत्तर काय? -

चीनने प्रत्येक वेळी जीवितहानी टाळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे. युक्रेनमधील सामान्य लोकांना कशाची जास्त गरज आहे, अन्न की मशीन गन? असा सवाल चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी उपस्थित केला. अमेरिका युक्रेनला शस्त्रास्त्रे पुरवून रशियाला चिथावणी देत संघर्ष वाढवत असल्याचा आरोप चीनने केला आहे. पण, युक्रेनला शस्त्रे सोडून इतर मानवतावादी मदत करायला चीन तयार आहे, असं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी सांगितले.

चीनने स्वतःला ठेवले दूर -

रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर रशियाला विरोध करण्यासाठी अनेक बैठका झाल्या. पण, प्रत्येक बैठकीमध्ये चीनने तटस्थ भूमिका घेतली. चीनने रशियाविरोधात बोलण्याचं टाळलं. त्यामुळे चीनकडून युद्धादरम्यान रशियाला कुठलीही मदत मिळू नये, असा प्रयत्न अमेरिका करत आहे. त्यासाठी बायडेन यांनी शी जिनपिंग यांच्यासोबत चर्चा केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Politics : हसन मुश्रीफ केडीसीसी नाही गोकुळ निवडणूक लढवणार? एका वाक्यात दिलं स्पष्टीकरण; जिल्हा परिषदेत सतेज पाटील, मुश्रीफ एकत्र येणार?

Pandharpur Temple: पांडुरंगाचा लाडू प्रसाद निम्म्याच भक्तांनाच मिळणार; श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अन्नछत्राला गॅस टंचाईच्या झळा; उत्पादन निम्म्यावर!

Latest Marathi News Live Update : शनिवारवाड्याच्या बाजूच्या गेटजवळ कचऱ्याला आग

भारतीय जहाजांना होर्मुझमधून परवानगी, एस जयशंकर यांच्या फोन कॉलनंतर इराणचा मोठा निर्णय

Jasprit Bumrah: 'माझ्याकडून बुमराह स्लोअर बॉल्स शिकला...', पाकिस्तानी वंशाच्या गोलंदाजाचा अजब दावा

SCROLL FOR NEXT