porn helpful to get information about sex to youth say research 
ग्लोबल

तरुण सांगतात, 'सेक्सची माहिती घेण्यासाठी पॉर्न उपयुक्त'; अभ्यासातील निष्कर्ष

सकाळ डिजिटल टीम

बोस्टन - पॉर्नोग्राफीमुळे तरुणांच्या सेक्सबाबतच्या मतांवर होणारा परिणाम याबबात एक अभ्यास करण्यात आला. यामध्ये सेक्सबाबत उपयुक्त अशी माहिती समजण्यासाठी तरुणांना पॉर्नची मदत होत असल्याचं अभ्यासातून समोर आलं आहे. पण त्यात एक वाईट गोष्ट अशीही समोर आली आहे. पॉर्न कशासाठी असतं याबाबत तरुणांमध्ये गैरसमज आहेत. अनेक फ्री आणि ऑनलाइन पॉर्नोग्राफी साइट आहेत त्यावर केवळं मनोरंजन आणि पैसा मिळवणं हाच उद्देशानं साहित्य अपलोड केलेलं असतं असं मत अभ्यास करणाऱ्या इमिली रॉथमॅन यांनी सांगितलं.

इमिली बोस्टन विद्यापिठात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. सेक्स कसं काय करायचं हे शिकवण्यासाठी पॉर्न नाही असही रॉथमॅन यांनी सांगितलं. 'Archives of Sexual Behavior' या जर्नलमध्ये संशोधन प्रकाशित झालं आहे. संशोधकांनी यांमध्ये 18 ते 24 वयाच्या 257 तरुणांना तर 14 ते 17 वयोगटातील 324 जणांना काही प्रश्न विचारले होते. त्यांनी पॉर्नमधून सेक्सबाबत उपयुक्त माहिती मिळाल्याचं म्हटलं. 

यामध्ये 14 ते 17 वयोगटातील मुलांच्या पालकांना आणि मित्रांनाही विचारलं होतं. फक्त 8 टक्के मुलांनी पॉर्न हे उपयुक्त माहिती देत असल्याचं म्हटलं. मुलींपेक्षा मुलांनी पॉर्नबाबत सकारात्मक मत व्यक्त केलं आहे. 

रॉथमॅन यांनी म्हटलं की, चिंतेची बाब म्हणजे मोठ्या प्रमाणावर पॉर्नला सेक्सची चांगली माहिती पुरवणारा स्रोत मानणाऱ्यांची संख्या मोठी असणं ही आहे. सेक्सबाबतचं शिक्षण ते असतं जे लैंगिकतेबाबत मी काय विचार करतो. सेक्सबाबत एकमेकांचे विचार, मते आणि संवाद हा महत्त्वाचा ठरतो. संशोधनामुळे तरुणांना सुरक्षित आणि सहमतीने सेक्सबाबत कसं शिकवता येईल हे समजण्यास मदत होईल असंही संशोधकांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ChatGPT Down : चॅटजीबीटी पुन्हा ठप्प, जगभरातील लाखो युजर्सचा खोळंबा; OpenAI ने सांगितले कारण

Nimisha Priya : कोण आहेत ग्रँड मुफ्ती? निमिषा प्रियाची फाशी थांबवण्यासाठी केली चर्चा

Gujarat Farmers Protest : गुजरातमध्ये शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण; ४७ जणांना अटक, १००० हून अधिक आंदोलकांविरुद्ध गुन्हे दाखल

Khadakwasla Dam : ‘खडकवासल्या’त सर्वोच्च पाणीसाठा, तेरा वर्षांतील उच्चांकी; धरणक्षेत्रात पावसाचा दिलासादायक परिणाम

Viral Video: रशियन महिलेने प्राणी संग्रहालयात नको ते कृत्य केलं... पाहणारे ही संतापले, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT