Devendra Fadanvis
Devendra Fadanvis Devendra Fadanvis
Goa Assembly Election

देवेंद्र फडणवीसांनी जिंकून दाखवले गोवा; सर्वांचे अंदाज ठरले फोल

सकाळ वृत्तसेवा

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : गोवा भाजपच्या हातून जाणार असा अंदाज सर्वत्र वर्तविला जात असताना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तसेच विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी जादूची कांडी फिरवून चक्क सत्ता खेचून आणली. त्यामुळे काँग्रेससह साऱ्यांनाच धक्का बसला आहे. नागपूरच्या बंद्याची मान आणि शान आणखी उंचावली आहे.

मागील विधानसभेच्या निवडणुकी गोव्यामध्ये (Goa wins) भाजपचे फक्त १३ आमदार निवडून आले होते. त्यावेळी काँग्रेसकडे १७ आमदार होते. सत्तेसाठी जोडतोड करण्यात काँग्रेसने उशीर केला आणि भाजपने बाजी मारली होती. मात्र, यावेळी सुरुवातीपासूनच भाजपची (BJP) सत्ता जाणार आहे. फारफार आठ ते १० आमदार निवडून येतील, असे झाडून सर्वच सांगत होते. सर्व वाहिन्यांचे अंदाजही हेच दर्शवत होते.

हे लक्षात घेता भाजपने निवडणुकीच्या नियोजनात अतिशय बारीकसारीक विचार करणारे देवेंद्र फडणवीस यांना गोव्याची जबाबदारी सोपवली. त्यांनी हिंदू आणि ख्रिश्चन मतदारबहुल संघावर लक्ष केंद्रित केले. जातीय समीकरणे योग्य जुळवून आणली. त्याकरिता स्वपक्षीयांचीही नाराजी ओढवून घेतली. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचा मुलगा उत्पल पर्रिकर यांना उमेदवारी नाकारली. त्यावर भाजपच्या (BJP) अनेक नेत्यांनी टीकासुद्धा केली होती.

उत्पल पर्रिकर यांची फडणवीस यांनी समजूत काढण्याचाही प्रयत्न केला. त्यांना दुसऱ्या मतदारसंघाचे तिकीट देऊन आणि निवडून आणण्याची हमीही दिली होती. मात्र त्यांनी ऐकले नाही. तसेच निवडणुकी दरम्यान, हिजाबवरून उठलेले वादळ आणि उत्तर प्रदेशातील मुस्लिमांचे लांगूलचालन करणाऱ्या काँग्रेससह इतर पक्षाच्या भूमिकेचा फायदा भाजपला झाला.

ख्रिश्चन मतदारांची भाजपला साथ

ख्रिश्चन मतदारांनी हिंदू म्हणजे भाजपला (BJP) सोबत केली. ही सर्व मोट बांधण्याची अवघड कामगिरी देवेंद्र फडणीस यांनी अतिशय बारकाईने केली. दुसरीकडे तृणमूल काँग्रेस आणि मगोप यांच्यातील चर्चा फिसकटली होती. त्यामुळे मगोपाला भाजपशिवाय पर्याय उरला नव्हता. याचा अचूक फायदा फडणवीस यांनी उचलला. २० जागा जिंकून देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी आपली रणनीती किती अचूक होती हे दाखवून दिले. भाजपला आता सत्तास्थापनेसाठी फक्त एका आमदाराची गरज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रमनदीपने अर्शिन कुलकर्णीचा घेतला अफलातून कॅच! स्टार्कला मिळाली पहिली विकेट

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT