goa election result 2022 analysis bjp devendra Fadnavis sakal
Goa Assembly Election

विश्लेषण : गोव्यातील विजयामुळे फडणवीसांचं भाजपातील वजन वाढणार

गोव्यात पुन्हा सलग तिसऱ्यांदा भाजप सत्तेवर येणार हे आता जवळपास स्पष्ट

धनंजय बिजले

Goa Assembly Election Result 2022 Update पणजी – गोव्यात पुन्हा सलग तिसऱ्यांदा भाजप सत्तेवर येणार हे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यामुळे गोव्याच्या राजकारणाला कलाटणी मिळणार आहे. गेली २५ वर्षे गोव्यात भाजप म्हणजे दिवंगत नेते मनोहर पर्रिकर असे समीकरण होते. मात्र त्यांच्या निधनानंतर निर्माण झालेली पोकळी पक्षाने भरून काढत कोणत्याही व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा असतो हे पुन्हा सिद्ध केले आहे. त्याप्रमाणे गेली अनेक वर्षे गोव्याच्या राजकारणाला अस्थिरतेचा शाप होता. तो आता दूर होणार आहे.

पणजीमध्ये भाजपने थेट पर्रिकर यांच्या मुलाला उत्पललाही तिकीट दिले नव्हते. यावरून भाजपमध्ये निवडणूक किती कठोरपणे लढविली जाते याचे उदाहरण घालून दिले आहे. गोवा म्हणजे अस्थिरता हे समीकरण गेली अनेक वर्षे गोव्यात द़ढ झाले होते. ते आता दूर होण्यास भाजपच्या या विजयामुळे उपयोग होईल यात शंका नाही. त्यामुळे यंदाचा निकाल हा गोव्याच्या अस्थिर राजकारणाला मिळालेला पूर्णविराम आहे असे मानले तर खोटे ठरणार नाही.

गोव्याच्या जनतेने तृणमुल कॉंग्रेस तसेच आम आदमी पक्षाला पूर्ण नाकारले आहे. पंजाबात विजय मिळवलेल्या अरविंद केजरीवाल यांना गोव्यात मात्र आपली जादू दाखविता आलेली नाही. अर्थात यावेळी भाजपने कॉंग्रेसमधून पक्षात आलेल्या तब्बल बारा आमदारांना तिकीटे दिली होती. त्यामुळे निवडून आलेले भाजपचे सारे नेते पक्षाचे हार्डकोअर कार्यकर्ते नाहीत. पण शेवटी जो जिता वही सिंकदर या उक्तीप्रमाणे आता हा विजय भाजपचा आहे मान्य करावेच लागेल.

भाजपच्या यंदाच्या यशात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याप्रमाणेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याचाही मोठा वाटा आहे. (Devendra Fadnavis the man behind bjp victory) हे दोघे यशाचे प्रमुख दावेदार आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. गोव्याच्या विजयामुळे फडणवीस यांचे पक्षातील वजन आणखी वाढणार आहे. कदाचित या निकालाचे महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम झाले तरी आश्चर्य वाटायला नको.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

ENG vs IND, 2nd Test: रवींद्र जडेजानं मोडला BCCI चा 'हा' नियम; आता काय होणार कारवाई नेमक काय घडलं, वाचा!

Latest Maharashtra News Updates : पेशवे बाजीरावांच्या स्मारकासाठी सर्वात योग्य जागा म्हणजे NDA - गृहमंत्री अमित शाह

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

SCROLL FOR NEXT