sleep 
health-fitness-wellness

महिलांना पुरुषांपेक्षा का आवश्यक आहे जास्त झोप? जाणून घ्या 6 कारणे

सकाळन्यूजनेटवर्क

जीवशास्त्रानुसार पुरुष आणि महिला यांच्यात अनेक फरक आहेत. त्यांच्या वेगवेगळ्या शारीरिक गरजा आहेत. पण, तुम्हाला माहितेय का महिलांना पुरुषांपेक्षा जास्त झोप आवश्यक असते. एका अभ्यासात असं सांगण्यात आलंय की महिलांच्या मेंदुला रिकव्हर होण्यासाठी जास्त वेळ लागतो. जेव्हा महिला कमी झोपतात तेव्हा त्या तणावात आणि रागात असतात. पुरुषांपेक्षा महिलांना जास्त झोप हवी असते. महिलांना जास्त झोप का हवी असते हे आपण पाहुया...

-पुरुषांशी तुलना करता महिला या मल्टी टास्कींग काम करत असतात. त्यांच्या डोक्यात अनेक प्रकारचे विचार चालू असतात. तसेच त्यांची बुद्धी विश्लेषक असते. त्यामुळे झोप लवकर येण्यास त्यांना अडथळा येतो. 

- महिलांचे शेड्यूल व्यस्त असते. सध्या, अनेक महिला कामावर जाऊ लागल्या आहेत. त्या पूर्णवेळ किंवा अर्धवेळ काम करतात आणि परत घरी येऊन जेवण बनवणे, मुलांची काळजी घेणे असे काम करतात. अशा मल्टी टास्कींगमुळे त्या थकून जातात. सध्याचा समाज त्यांच्यावर अनेक ओझे टाकत आहे. त्यांना पुरुषांप्रमाणे बाहेर जाऊन काम करण्यास परवानगी दिली जाते, पण त्यांचे कथीत पारंपरिक काम करण्यासही भाग पाडले जात आहे.  

रक्तातील RBC चे प्रमाण कमी होणं धोक्याचं; आहारात करा काही बदल

- पुरुषांपेक्षा महिलांमध्ये जास्त निद्रानाश पाहायला मिळतो. याचमुळे त्यांच्यात जास्त लठ्ठपणा दिसून येतो. तसेच त्यांच्यात cortisol नावाचे स्ट्रेस हरमोन शरीरात रिलिझ होत असतात त्यामुळे भूक आणि लठ्ठपणा वाढत असल्याचं आढळून आलं आहे.

- महिलांमध्ये गंभीर हार्मोनल बदल पाहायला मिळतात. यामध्ये यौवन (puberty), गर्भधारणा (pregnancy) आणि रजोनिवृत्ती (menopause) यांचा समावेश होतो. अशा शारीरिक अस्वस्थतेमुळे आणि त्रासामुळे त्यांच्या मेंदूला जास्त आरामाची गरज असते.  

- सर्वसाधारणपणे महिला सकाळी लवकर उठून अनेक प्रकारची कामे करत असतात. त्या अनेकदा रात्री उशीरापर्यंत काम करत असतात आणि सकाळीही त्यांना लवकर उठावं लागतं. शिवाय लहान बाळ असलेल्या महिलांची अनेकदा झोपमोड होत असते. अशावेळी झोप न झाल्यास त्या चिडचिड करत असल्याचं पाहायला मिळतं.

-झोप व्यवस्थित न झाल्याने शरीरातील सी-रिअॅक्टिव प्रोटिनचे प्रमाण वाढते. याचा संबंध हाय ब्लड प्रेशरशी असतो. यामुळे हृदयासंबंधी आजार बळावतात. या कारणासाठी त्यांची झोप आवश्यक आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT