आपट्याची पान  
health-fitness-wellness

Dasara 2021: आपट्याच्या पानांचा असा आहे आरोग्यासाठी फायदा

आपट्याची पाने खाऊन तुम्ही विविध आजारांपासून दूर राहू शकता

सकाळ डिजिटल टीम

दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाने सोने म्हणून दिली जातात. आजच्या दिवशी आपट्याच्या पानांचा मान मोठा असल्याने ती घरी ठेवली जातात. पण दुसऱ्या दिवशी मात्र त्याची रवानगी खतासाठी केली जाते. रस्त्यावर तर आपट्याच्या पानांचे ढिगारे कचऱ्यात दिसतात. अशावेळी वाईट वाटतं. पण ही आपट्याची पाने आरोग्याच्या दृष्टीने अतिशय फायद्याची आहेत. आपट्याची पाने खाऊन तुम्ही विविध आजारांपासून दूर राहू शकता.आपटा ही बहुगुणी वनस्पती आहे. या झाडाची पाने फुले, बिया, सालं औषध म्हणून वापरली जाते. आपट्याला 'अश्मंतक' म्हणूनही ओळखले जाते. अश्मंतक' याचा एक अर्थ मुतखडा होऊ न देणारा किंवा तो जिरवणारा असा आहे. आपट्याच्या सालीपासून दोरखंड बनवला जातो. तर त्याच्या सालापासून डिंक मिळतो. पण त्याव्यतिरिक्तही आपट्याचे बरेच फायदे आहेत.

हे आहेत फायदे

1) आपट्याची पानं  पित्त आणि कफ दोषांवर गुणकारी आहेत. 

2) लघवीच्या वेळी जळजळ होत असल्यास आपट्याची पाने पाण्यात चांगली ओली करून ती नीट वाटून घ्यावीत. जेवढा रस निघेल तेवढ्याच प्रमाणात दूध-साखर टाकावे. हा दिवसातून चार - पाच वेळा घेतल्याने जळजळ कमी होते. 

3) हृदयाला सुज आली असेल तर आपट्याच्या मुळाची साल पाण्यात उकळवून ते मिश्रण गाळून प्यावे. 

4) गालगुंड झाली असल्यास आपट्याची साल पाण्यात शिजवून घ्यावीत. तो थंड झाल्यावर त्यामध्ये मध घालून तो प्यावा किंवा गंडमाळेवर आपट्याची सालं बांधावीत. 

5) आपट्याच्या बियांचे बारीक चूर्ण करून ते तूपात चांगले मिक्स करावे. हे मलम एखादा किटक चावल्यास लावता येते. त्यामुळे दाह कमी होतो. 

6)मुरडा झाला असेल तर आपट्याच्या सुक्या फुलांचे चूर्ण मध आणि साखरेबरोबर घेतल्यास पोटातील मुरडा बरा होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: नवऱ्याला नीळ्या ड्रममध्ये मारणाऱ्या मुस्कानची इच्छा ऐकून प्रशासनही थबकलं; प्रियकराला दाखवायचा आहे नवजात मुलीचा चेहरा!

School Timing Change : वाढत्या थंडीमुळे शाळांच्या वेळेत बदल शाळांचा निर्णय; मुलांसह पालकांना दिलासा

Success Story: पारळ्याच्या शेतकऱ्याचा मुलगा झाला भूवैज्ञानिक; कैलास आहेर यांचे लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र भूजल सेवा परीक्षेमध्ये यश

Vote Count Discrepancy Sangli : आष्टा नगरपालिका निवडणुकीत मतांच्या आकडेवारीत तफावत, जयंत पाटलांची एन्ट्री होताच काय घडलं; राड्याचा इशारा

Gold Silver Loot : ज्वेलरी फोडून १९ किलो चांदी ७०० ग्रॅम सोनं चोरलं, आराम बस बूक करून पुण्याला निघाला पण...; किणी टोल नाक्यावर थरार

SCROLL FOR NEXT