kids
kids esakal
health-fitness-wellness

मुलांना ओमिक्रोनपासून कसं दूर ठेवायचं? पालकांच्या प्रश्नाला डॉक्टरांनी दिले उत्तर

सकाळ डिजिटल टीम

ओमिक्रोनमुळे कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची भिती आता अनेकांना सतावते आहे. काही शाळांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर काही पालक याविषयी चर्चा करत आहेत. अनेकांना मुलांवर या लाटेचा परिणाम होण्याची भिती सतावते आहे. सध्या भारतातील सर्व पालकांमध्ये हीच चर्चा सुरू आहे. शाळा सुरू झाल्याने अनेक पालकांची भिती वाढते आहे. भारतातील ताज्या ओमिक्रोनच्या बातम्यांमुळे पालक घाबरले आहेत. मुलांचे लसीकरण झालेले नसल्याने त्यांना ही भिती सतावते आहे. याविषयी पालकांनी मुलांशी विषाणूबाबत स्पष्ट संवाद साधण्याचा सल्ला काही डॉक्टरांनी दिला आहे.

COVID-19 impact may kill 8 lakh kids in South Asia says UNICEF

मीनाक्षी मिशन हॉस्पिटल आणि संशोधन केंद्र, मदुराई पेडियाट्रिक इन्सेटिव्ह केअरचे सल्लागदार डॉ. एस. सेंथिलकुमार यांनी सांगितले की, डॉ. एस. सेंथिलकुमार यांच्या मते, आधीच्या दोन लाटांच्या अनुभवावरून असे दिसतेयकी, मुलांना जास्त धोका नसतो आणि मोठ्यांच्या तुलनेत हा आजार सामान्यतः सौम्य असतो. पुढील लॉकडाऊन टाळण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी कोविड विरोधी उपायांचे काटेकोरपणे पालन करण्याची हीच वेळ आहे. स्वत:चे रक्षण करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे मास्क वापरणे. जोपर्यंत लस येत नाही किंवा या व्हेरियंटचे स्वरूप समजत नाही तोपर्यंत मास्कच तुमच्यासाठी लस आहे.

अमृता हॉस्पिटलचे जनरल पेडियाट्रिक विभागाचे प्रमुख आणि प्राध्यापक डॉ. सी. जयकुमार सांगतात, “तुमच्या मुलांना काटेकोरपणे मास्क घालण्याचे महत्त्व शिकवा. हात धुणे खूप महत्वाचे आहे. ओमिक्रॉन हवेतून खूप वेगाने पसरतो. त्यामुळे गर्दीत जाणे टाळले पाहिजे. मुलांनी मोकळ्या जागेत किंवा कॅन्टीनमध्ये न जाता वर्गातच जेवावे. मुलांना विषाणूबद्दल योग्य माहिती देऊन त्यांना प्रशिक्षित करणे , एवढेच सध्या आपण करू शकतो. तसेच शाळेत पाळल्या जाणार्‍या सुरक्षा धोरणांचे महत्त्व त्यांना समजावून सांगणेही गरजेचे आहे.

पालकांनी किती घाबरले पाहिजे, .याबाबात डॉ. श्रीराम नेने सांगतात की, लोकांनी सध्या स्मार्ट असणे खूप महत्वाचे आहे. Omicron वर अद्याप कोणताही स्पष्ट डेटा नाही, केवळ विविध अंदाज व्यक्त केले जात आहेत. पण, मुलांसाठी लसीकरण ही काळाची गरज आहे. 12+ वयोगटांवर चाचणी करण्यात आलेली ZyCoV-D लस मुलांना लगेच उपलब्ध होणार नाही. कारण त्यांनी त्यांची उत्पादन क्षमता वाढविणे गरजेचे आहे. तसेच हवेतील बदलांमुळे मुलांमध्ये फ्लूची लक्षणे देखील दिसू शकतात. त्यामुळे अशी लक्षणे मुलांमध्ये आढळल्यास लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Kids

पालकांनी हे समजून घ्यावे

डॉ. एस. सेंथिलकुमार सांगतात की, सर्व विषाणूंमध्ये उत्परिवर्तन म्हणून ओळखल्या जाणार्‍या जनुकातील बदलांद्वारे त्यांच्या संरचनेत आणि कार्यांमध्ये किरकोळ बदल करण्याची नैसर्गिक क्षमता असते. हे उत्परिवर्तन विषाणूला क्षुल्लक किंवा लक्षणीय गुणधर्मांसह नवीन प्रकारे वागण्यास मदत करते. काहीवेळा हे उत्परिवर्तन व्हायरसला मूळ विष।णूपेक्षा कमी शक्तीशाली बनवतात. कोविडच्या मागील लाटेसाठी अल्फा आणि डेटा हे सुरवातीचे उत्परिवर्तनाचे प्रकार जबाबदार होते. आता ओमिक्रोन (B.1.1.529) हा कोरोना व्हायरसचा अलिकडील प्रकार आहे.

डॉ. सी. जयकुमार म्हणाले की, आम्हाला अजून या व्हेरियेंटबद्दल फारशी माहिती नाही. पण, आमच्याकडे उपलब्ध असलेल्या माहितीप्रमाणे मागील दोन कोविड प्रकारांपेक्षा हा व्हायरस खूपच धोकादायक आहे. यामुळे न्यूमोनिया आणि इतर धोकादायक गुंतागुंती कशा प्रकारे होतात याचा शोध घेणे सुरू आहे. म्हणूनच जोपर्यंत आपल्याला या विषाणूचे स्वरूप योग्यप्रकारे समजत नाही तोपर्यंत आपण स्वतःचे संरक्षण करणे आणि राज्य, केंद्र सरकारने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे गरजेचे आहे. लसीचे दोन डोस घेणे गरजेचे आहे. तसेच परिणामांपासून रक्षण करण्यासाठी सरकार लवकरच बूस्टर डोस घेण्यासाठी सल्ला देऊ शकते. या ओमिक्रोनला आळा, प्रतिबंध घालण्यासाठी काही लसी परिणामकारक आहेत, पण, शास्त्रज्ञ आणि संशोधकांकडून अद्याप यावर अभ्यास सुरू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: प्रज्वल्ल रेवण्णाविरोधातील फास आणखी आवळला! निघालं अटक वॉरंट

IPL 2024 RCB vs CSK Live Score: बेंगळुरूला दुसरा धक्का! अर्धशतकानंतर डू प्लेसिस आऊट, पण विकेटमुळे झाला ड्रामा

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

Video: 'सिग्मा मेल' म्हणून केलं रोस्ट, धमकी मिळाल्यावर कॅरी मिनाटीने टेकले गुडघे, काय होतं व्हिडिओमध्ये? पाहाच

MI vs LSG: मुंबईच्या पराभवानंतर रोहितबरोबर नीता अंबानींची आधी गहन चर्चा अन् मग ड्रेसिंग रुममध्ये दिलं स्पेशल मेडल, Video व्हायरल

SCROLL FOR NEXT