health-fitness-wellness

कोरोनाचा डबल म्युटंट व्हेरियंटच भारतातील दुसऱ्या लाटेस जबाबदार?

सकाळ डिजिटल टीम

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भारतातील आरोग्यव्यवस्थेवर अभूतपूर्व असा ताण आला आहे. गेल्या 24 तासांत भारतात 2.60 लाखांहून अधिक रुग्ण आढळल्याचं चित्र आहे. अशातच कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे या चिंतेत आणखीनच भर पडली आहे.

डबल म्युटेशन असलेला हा नवा व्हेरियंट अधिकच धोकादायक असल्याचं म्हटलं जातंय. गेल्या तीन दिवसांपासून देशात 2 लाखांहून अधिक रुग्ण आढळत असून भारताने आता कोरोनामुळे सर्वाधिक पीडित देश ब्राझीललाही मागे टाकत अमेरिकेनंतरचं दुसरं स्थान पटकावलं आहे.

काय आहे डबल म्युटेशन व्हायरस?

डबल म्युटंट - B.1.617

पहिला म्युटंट - E484Q

दुसरा म्युटंट - L 452R

व्हायरसच्या जीनोममध्ये दोन वेळा बदल झाले आहेत. व्हायरस मोठ्या काळासाठी आपला प्रभाव राखण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी तो जेनेटिक संरचनेमध्ये सातत्याने बदल करतो. दोन प्रकारच्या म्युटेशनमुळे व्हायरस अत्यंत खतरनाक बनतो. आणि मग व्हायरसचं संक्रमण खूपच वेगाने पसरायला लागतं. डबल म्युटेशन कितीतरी अधिक गतीने पसरणारं संक्रमण आहे आणि ते अत्यंत खतरनाक आहे. यासोबतच तो वेगळ्या प्रकारच्या स्पाइक प्रोटीन मार्करने व्हायरस सेल्सला चिटकतो. चिटकल्यानंतर तो हल्ला करतो. स्पाइक प्रोटीनच्या स्ट्रक्चरला बदलून टाकतो. सेल्ससोबत अटॅच झाल्यानंतर तो मोठ्या गतीने वाढून संक्रमित होऊ लागतो. भारतात देखील कोरोनाचा हा डबल म्युटंट सापडू लागला आहे. सीएसआयआरचे डीजी डॉ. शेखर मांडे यांच्या म्हणण्यानुसार, डबल म्युटंट हा अनेक कारणांमुळे पसरतो. त्यातील सर्वांत मोठं कारण लोकांचा निष्काळजीपणा हेच आहे. दुसरं कारण म्हणजे व्हेंटीलेशन नसलेल्या बंद खोल्यांमध्ये हा म्युटंट तीव्र गतीने पसरतो.

आतापर्यंत कुठे कुठे आढळलाय हा व्हेरियंट?

कोरोनाचा डबल म्युटंट आतापर्यंत ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, जर्मनी, आयर्लंड, नामिबिया, न्यूझीलंड, सिंगापूर, ब्रिटन आणि अमेरिकेत सापडला आहे. मार्च महिन्याच्या अखेरिस भारतात असा डबल म्युटंट अस्तित्वात असल्याच्या माहितीला आरोग्य मंत्रालयाने पुष्टी दिली होती.

भारतात दुसऱ्या लाटेला डबल म्युटंट जबाबदार?

भारत सरकारने जरी याबाबत कसलीही खात्रीशीर माहिती दिली नसली तरी या धोकादायक अशा दुसऱ्या लाटेला हा डबल म्युटंटच जबाबदार असू शकतो असं जिनोमने म्हटलं आहे. महाराष्ट्रातील मुंबईसारख्या अनेक शहर आणि जिल्ह्यांमध्ये या व्हेरियंटचा प्रसार जवळपास 60 टक्क्यांहून अधिक होता, अशी माहिती स्टेट काउन्सिल ऑफ सायंटिफिक एँड इंडस्ट्रियल रिसर्चचे प्रमुख अनुराग अग्रवाल यांनी दिली आहे. आरोग्य मंत्रालयाने मार्च महिन्याच्या अखेरिस दिलेल्या माहितीनुसार, मंत्रालयाने 10 नॅशनल लॅब्सचा एक ग्रुप बनवला होता, हा ग्रुप कोरोना व्हायरसच्या वेगवेगळ्या व्हेरियंट अर्थात जीनमचं सिक्वेन्सिंग करत आहे. मार्च अखेरिस भारतात कोरोनाच्या 10 हजार 787 सॅम्पल टेस्टिंग केल्यानंतर 771 वेगवेगळे व्हेरियंट सापडले होते. यामधील 736 सॅम्पल ब्रिटनच्या कोरोना व्हेरियंटचे आहेत. तर 34 सॅम्पल साउथ अफ्रीका आणि 1 सॅम्पल ब्राझीलच्या कोरोना व्हेरियंटचे होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT