Sadguru 
health-fitness-wellness

इनर इंजिनिअरिंग : उत्तरे नाहीत फक्त पद्धती

सद्‌गुरू

हिंदू जीवनशैली कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देत नाही. त्याऐवजी, आत्ता आपल्या आकलनात नसलेले सर्व आयाम जाणून घेण्यासाठी ती आपल्याला पद्धती आणि साधने देऊ करते. आम्ही अद्याप तुमच्या अनुभवात नसलेल्या एखाद्या गोष्टीबद्दलच्या तुमच्या प्रश्नाला उत्तर दिल्यास तुम्हाला ते उत्तर आवडल्यास तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवाल आणि सांगायला एक मजेशीर कथा असेल तुमच्याजवळ. माझे उत्तर तुम्हाला पसंत न पडल्यास तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही आणि तुम्ही त्याची अवहेलना करू लागाल. पण, तुमचा विश्वास किंवा तुमचा अविश्वास तुम्हाला सत्य आणि वास्तविकतेच्या अधिक जवळ आणत नाही.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ज्या गोष्टींचे आकलन तुम्हाला होते केवळ तेच तुम्ही जाणता. राहिलेले सर्वकाही फक्त एक मानसिक प्रक्रिया आहे आणि कोणत्याही क्षणी ती बदलू शकते; अस्तित्वाच्या दृष्टीने हे निरर्थक आहे. मानसिक रचना ही तुमची काल्पनिक घडवणूक आहे आणि तिचे वास्तवाशी काही देणेघेणे नाही. कारण, तुम्हाला हवे त्याची तुम्ही कल्पना करू शकता आणि ते करण्यापासून काहीही तुम्हाला थांबवू शकत नाही. लोक इतके मोहित झाले आहेत आणि त्यांच्या मनातील क्षुल्लक रचनेशी इतकी खोलवर त्यांची ओळख जडलेली आहे, की ते सृष्टीकर्त्याच्या सृष्टीस पूर्णपणे मुकतात. तरीही, वास्तविक सृष्टी ही काल्पनिक मानसिक रचनेपेक्षा विशाल आणि महाकाय आहे.

म्हणून, जर तुमच्यात सत्य जाणण्याची तीव्र उत्कंठा असल्यास तुमचे आकलन वृद्धिंगत करण्यासाठी एक पद्धत तुम्हाला दिली जाऊ शकते; जेणेकरून तुमच्या स्वानुभवाने तुम्हाला त्याची प्रचिती येईल. प्रश्न हा सृष्टीशी संबंधित आहे आणि उत्तरसुद्धा हे सृष्टीबद्दलच असले पाहिजे; ते मानसिक कल्पनेतून असता कामा नये. मानसिक कल्पित रचनेतून विश्वास प्रणाली वाढीस लागतात जे माणसांना एक प्रकारचे सांत्वन देतात. हे एक उत्तम मानसोपचार साधन आहे.

परंतु, भारतासारख्या पूर्वेकडील संस्कृती सांत्वन शोधत नाहीत. त्या उपाय शोधत असतात. मानसिक सांत्वन हे कधीच त्यांचे ध्येय नव्हते. त्यांचे एकमेव ध्येय नेहमी मोक्ष किंवा मुक्ती राहिले आहे. एका मनुष्यात शरीर, मन, त्याच्या भावना आणि त्याची जीवनऊर्जा आहेत. या चारींपैकी कोणत्याही वापरून त्याच्यातील सीमित मर्यादा पार करून जाऊ शकतो. हिंदू जीवनशैलीत या चारही पैलूंचा वापर परमार्थप्राप्तीसाठी केला गेला. तुम्ही तुमची बुद्धी वापरून एक ज्ञानयोगी होऊ शकता. तुम्ही तुमची भक्ती किंवा भावना वापरून भक्तियोगी होऊ शकता. शारीरिक कार्य-कृतींचा वापर करून तुम्ही परम मुक्ती प्राप्त करू शकता, याला आपण कर्मयोग असे म्हणतो. किंवा तुमच्या आंतरिक जीवनऊर्जेचे रूपांतर करून तुम्ही परम मुक्ती प्राप्त करू शकता; ज्याला क्रियायोग असे म्हणतात. हा काही हिंदू धर्म नव्हे, याला सनातन धर्म असे म्हणतात; म्हणजे वैश्विक धर्म. तुम्ही कोण आहात, याने काहीच फरक पडत नाही, तुम्ही फक्त हे चारच पैलू वापरू शकता. इतर आणखी काहीही वापरू शकत नाही. पूर्वेकडील देशांमध्ये कधीही धर्माकडे एक विश्वास प्रणाली म्हणून पाहिले गेले नाही. धर्म म्हणजे केवळ एक मानवी शक्यता म्हणून पाहिला गेला; माणूस त्याच्या उच्चतम शक्यतेत कसा उभारून येऊ शकतो, यावर भर दिला जातो.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Duplicate Voter Detection : राज्य निवडणूक आयोग संभाव्य दुबार मतदार कशाच्या आधारावर ठरवणार?

Ahmadpur Crime : अहमदपूर तालुक्यातील रुद्धा गावात पिता पुत्राचा अज्ञात हल्लेखोरांकडून निर्घुन खून

Maharashtra Police : श्रीशैल्य चिवडशेट्टी बारामतीचे नवीन पोलिस निरिक्षक

Eknath Khadse : खडसेंच्या मुक्ताई बंगल्यातील चोरीचा पर्दाफाश! आंतरराज्यीय टोळीचा सहभाग, सोने घेणारा सराफ अटकेत

निशिगंधा वाड यांची लेक अभिनय क्षेत्रात येणार? दीपक देऊळकर म्हणाले, 'माझी मुलगी गोल्ड मेडलिस्ट पण...

SCROLL FOR NEXT