Sadguru 
health-fitness-wellness

इनर इंजिनिअरिंग : नातं, एक समर्पण!

सद्‌गुरू

तुम्ही जीवनात अनेक प्रकारची नाती जोडता. शेजारी, मित्र, बायको, पती, मुले, पालक, भावंडे, प्रेमी आहेत आणि असेही लोक आहेत जे एकमेकांचा द्वेष करतात – सर्वकाही एक प्रकारचे एक नाते आहे. मूलभूतपणे, तुमच्या आयुष्यात हे वेगवेगळ्या प्रकारचे नातेसंबंध आले आहेत. कारण, तुम्हाला शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक, आर्थिक आणि इतर अनेक गरजांची पूर्तता करायची आहे. जी काही तुमची गरज आहे, ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही विशिष्ट प्रकारचा संबंध स्थापण्याचा प्रयत्न करता. ती गरज पूर्ण झाली नाही, तर ते नाते टिकू शकत नाही.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अनुभवाच्या स्तरावर असाही एक मार्ग आहे जगण्याचा, जिथे कुठल्याही नातेसंबंधांशिवाय तुम्ही जगू शकता. आतून तुम्ही इतके परिपूर्ण असता, की मग तुम्हाला काहीच फरक पडत नाही. मात्र, आज अनेकांसाठी त्यांच्या नातेसंबंधांची गुणवत्ता त्यांच्या आयुष्याची गुणवत्ता ठरवते आहे. तर मग आज आपण जिथे कोठे आहोत, तिथे आयुष्यातल्या  प्रत्येक क्षणी सर्वांत सुंदर नाती आपण कशी बनवू शकतो ते पाहूयात. जर तुम्ही याकडे पाहिलेत, तर तुमच्या लक्षात येईल, वेगवेगळ्या प्रकारचे संबंध बनवून आणि वेगवेगळ्या प्रकारच्या कार्य-कृतीतून तुम्ही आनंद प्राप्त करायचा प्रयत्न करत आहात. तुम्ही मित्र-मैत्रिणी बनवता, तुम्ही लग्न करता, मुलांना जन्माला घालता, उद्योग-धंदा सुरू करता – आयुष्यात तुम्ही हे सर्वकाही करता - कारण कुठेतरी तुम्हाला वाटते, की हे सगळे करून तुम्ही आनंदी व्हाल. आनंदाच्या शोधातच तुम्ही हे सगळे नातेसंबंध स्थापले. किंवा दुसऱ्या शब्दांत सांगायचे म्हणजे, तुम्ही लोकांमधून आनंद पिळून काढायचा प्रयत्न करत आहात. एकदा  तुम्ही हे केलेत तर मग नातेसंबंध हे कायमची समस्या होऊन बसेल. तुम्ही त्याशिवाय राहूही शकत नाही, आणि  त्यासोबत जगूही शकत नाही. 

तुमच्या आत आनंद नाहीये, म्हणून तुम्ही तो दुसऱ्यातून काढून घेण्याचा प्रयत्न करत आहात आणि ती व्यक्ती तुमच्यातून तो काढून घेण्याचा प्रयत्न करत आहे. असे असेल तर ही नक्कीच एक लढाई होणार यात शंकाच नाही. नाती खरोखरच सुंदर व्हायची असतील. तर एखाद्याने दुसऱ्या‍कडे पाहण्याआधी त्यांनी आत वळून स्वत:कडे लक्षपूर्वक पाहणे खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही स्वत:च आनंदाचा स्रोत बनलात आणि तुमचे नातेसंबंध तुमचा हा आनंद वाटून घेण्याबद्दल असतील आणि दुसऱ्यातून आनंद पिळून काढण्याबद्दल नसेल, तर तुम्ही कुणाहीबरोबर सुंदर आणि अद्भुत नातेसंबंध प्रस्थापित करू शकता.

तुम्ही इतरांना आनंद देत असाल, तर जगात असे कोणी असेल का ज्याला तुमच्याशी काही समस्या असेल? नाही. तुम्ही त्यांच्यातून आनंद मिळविण्याचा प्रयत्न करत आहात, येथेच मोठी समस्या आहे. नातेसंबंध एक समस्या बनले आहेत, कारण तुम्ही त्यांचा उपयोग तुमचे आयुष्य समृद्ध करण्यासाठी वापरत नाही. उलट तुमच्या आयुष्यातली पोकळी भरून काढायचा प्रयत्न करत आहात. 

तुमचे नाते एखाद्या व्यक्तीतून काहीतरी प्राप्त करण्याबद्दल असल्यास  तुम्ही ते कितीही व्यवस्थितपणे हाताळेत, तरी सतत त्रास होणारच. तुमचे नाते तुमच्या सहवासात असलेल्या व्यक्तीसाठी अर्पण असल्यास  सर्वकाही अद्‌भुत आणि विलक्षण असेल.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Education : विधान परिषदेत शिपायाच्या कंत्राटी पदावरून पेच; सत्ताधारी शिक्षक, पदवीधर आमदारांनीच केला सभात्याग

Ashadhi Ekadashi 2025: मुखात तुझे नाव, डोळ्यात तुझे गाव;डिगडोहमध्ये ‘विठ्ठल रखुमाईचा दर्शन सोहळा, माऊली ग्रुपचा उपक्रम

Ahilyanagar: 'श्रीरामपूरकरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्वागत'; ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोष

Pune Crime : सोसायट्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर, कोंढव्यातील घटनेनंतर भीती; सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा यंत्रणेवरही प्रश्‍नचिन्ह

Ashadhi Wari 2025:'वरुणराजाच्या साक्षीने संत भेटीचा सोहळा'; बोंडले येथे संत तुकाराम महाराज व संत सोपानदेव महाराज यांची भेट

SCROLL FOR NEXT