Be careful when using sanitary napkins 
health-fitness-wellness

Sanitary Napkins वापरल्यामुळे खरंच कर्करोग होतो? जाणून घ्या महत्वपूर्ण माहिती एका क्लिकवर

Balkrishna Madhale

सातारा : मासिक पाळीच्या वेळी योग्य सॅनिटरी नॅपकिनचा वापर न केल्याने संक्रमण आणि इतर अनेक आजार उद्भवू शकतात, परंतु कर्करोगाचा धोका आहे का? याबाबत आम्ही तुम्हाला महत्वपूर्ण माहिती देणार आहोत, जेणे करुन तुमचे आरोग्य सुरक्षित राहिल.

अकरा ते बारा वर्षांच्या मुलींमध्ये मासिक पाळीच्या समस्या सुरू होतात. तिला प्रत्येक महिन्याच्या 'त्या' कालावधीत सॅनिटरी नॅपकिन किंवा पॅडवर अवलंबून रहावे लागते. आजकाल बाजारात अनेक पर्याय उपलब्ध आहेत. जसे की, टॅम्पॉन (Tampons) आणि मासिक पाळीचा कप (Menstrual Cup). मात्र, असे असूनही मोठ्या संख्येने महिला मासिक पाळीच्या वेळी कपडे किंवा सॅनिटरी नॅपकिन्स वापरतात. अशा परिस्थितीत सॅनिटरी नॅपकिन वापरल्यामुळे खरोखरच कर्करोगाचा धोका निर्माण होऊ शकतो का? हे जाणून घेणे देखील महत्वाचे आहे.

सिंथेटिक सॅनिटरी नॅपकिन ठरु शकतो धोका

काही स्त्रीरोगतज्ज्ञांच्या मते, सॅनिटरी नॅपकिनचा अधिक वापर गर्भाशयातील पिशवीस धोकादायक ठरु शकतो आणि त्याने गर्भाशयाला कर्करोग होऊ शकतो, हे पूर्णपणे चुकीचे आहे आणि हा दावा सिद्ध करण्यासाठी वैज्ञानिक तथ्य किंवा संशोधन उपलब्ध झालेले नाही. तथापि, काही डॉक्टर आणि तज्ञांच्या मते, आजकाल बाजारात प्लॅस्टिक आणि कृत्रिम सॅनिटरी नॅपकिन्स विकल्या जात आहेत. त्यांचा वापर जननेंद्रियाच्या कर्करोगासाठी धोकादायक आहे. कारण, सिंथेटिक सॅनिटरी नॅपकिन्स डायबॉक्सिन (dioxin) शोषक एजंट म्हणून वापरतात. जे हळूहळू वेळोवेळी शरीरात जमा होतात. यामुळे गर्भाशयाचा कर्करोग होण्याची शक्यता आहे.

खाज सुटण्याचा धोका 

डब्ल्यूएचओ (WHO) डायऑक्सिनला प्रदूषक आणि कर्करोग मानतो. याचे कारण म्हणजे शरीरावर खाज सुटणे किंवा अॅलर्जीचा धोका निर्माण होणे. यामुळे कर्करोगासारख्या गंभीर समस्या देखील उद्भवू शकतात. या व्यतिरिक्त डायऑक्सिन देखील शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीस दडपण्यासाठी कार्य करते. यामुळे संक्रमणाचा धोका लक्षणीय प्रमाणात वाढतो. म्हणून, जर आपण मासिक पाळीच्या वेळी सॅनिटरी नॅपकिन्स वापरताना स्वच्छतेच्या दृष्टीने सल्ले घेत असाल, तर आपण आजारी पडणे टाळू शकता.

- मासिक पाळीदरम्यान जास्त मासिक पाळी येत असल्यास, दर 3 ते 4 तासांनी सॅनिटरी नॅपकिन बदलावा.

- दीर्घकाळापर्यंत एकच सॅनिटरी नॅपकिन वापरणे बॅक्टेरिया (Bacterial Infection) संसर्गाच्या किंवा इतर प्रकारच्या आजारांच्या उच्च जोखमीशी संबंधित आहे, त्यामुळे नॅपकिन वेळोवेळी बदलावे. 

- बायोडिग्रेडेबल, केमिकल फ्री आणि सेंद्रिय सॅनिटरी नॅपकिन वापरा.

- सुगंध (Fragrance) असलेल्या नॅपकिन्सचा वापर न करणे अधिक चांगले ठरेल.

- स्वच्छतेवर अधिक भर देणे महत्वाचे आहे, कारण कोणताही संसर्ग आजार उद्भवू शकतो.

- पुनर्वापर करण्यायोग्य सॅनिटरी नॅपकिन वापरत असल्यास, ते पूर्णपणे स्वच्छ करा आणि नंतर वापरा. यामुळे संक्रमणाचा धोका कमी होतो.

डिसक्लेमर

वरील लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य माहितीच्या आधारावर आहे. याबाबत अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

संपादन : सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Closing: सेन्सेक्स 176 अंकांनी घसरणीसह बंद; मेटल आणि आयटीमध्ये जोरदार विक्री, कोणते शेअर्स वाढले?

IND vs ENG 3rd Test: जसप्रीत बुमराह IN, मग कोण OUT? लॉर्ड्स कसोटीसाठी इरफान पठाणने निवडली Playing XI; अशीच असेल टीम इंडिया

EMI Debt Trap: मध्यमवर्ग ईएमआयच्या जाळ्यात; 5 पैकी 3 लोकांवर तीनपेक्षा जास्त कर्ज, काय आहे कारण?

Latest Maharashtra News Live Updates: पूर्व विदर्भातील पूरस्थिती नियंत्रणात: एसडीआरएफ आणि एनडीआरए यंत्रणा सज्ज

Devendra Fadnavis : ''मीसुद्धा तो व्हिडीओ बघितला, पण...''; संजय गायकवाडांनी केलेल्या मारहाणीवर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

SCROLL FOR NEXT