नागपूर : भारतीय स्वयंपाक घरामध्ये हिंगाचा वापर फार पूर्वीपासून होतो. आपण अनेक पदार्थांमध्ये हिंग घालत असतो. यामध्ये अँटी-व्हायरल, अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी इंप्लामेटरी गुण असतात. त्यामुळे हिंग आपल्या आरोग्यासाठी चांगले असते. त्यामुळेच आपल्या स्वयंपाक घरामध्ये नेहमी हिंगाचा वापर केला जातो. मात्र, अनेकांना याचे फायदे माहिती नसतील. त्याबाबतच आज आपण जाणून घेऊयात.
पोटाच्या समस्यावर गुणकारी -
हिंग हे सर्वात चांगल्या उपायांपैकी एक आहे. पचनासंबंधी सर्व आजारांवर हिंग गुणकारी आहे. तसेच पोटावर येणारी सूज, गॅस, आतड्यांच्या सिंड्रोम अशा आजारांवर देखील हिंग रामबाण उपाय आहे.
इतर समस्यांसाठी -
हिंग नेहमी पचनासंबंधी समस्यांवर उपाय म्हणून वापरले जाते. मात्र, इतर समस्यांसाठीही हे गुणकारी आहे. हिंग ब्लड थिनरच्या रुपामध्ये काम करत असून उच्च रक्तदाबाचा त्रास देखील कमी करते. तसेच रक्तामध्ये तयार होणाऱ्या गुठळ्यांपासून देखील सुटका मिळते.
हिंग मासिक पाळीमध्ये देखील उपयोगी येते. प्रोजेस्टेरॉन या हार्मोनचा स्त्राव वाढविण्यासाठी मदत करतात. त्यामुळे रक्ताचा प्रवाह चांगला असतो. तसेच होणारा त्रास देखील थांबतो. हिंग डोकेदुखीमध्ये देखील उपयोगी ठरते.
अँटी व्हायरल आणि अँटी इंफ्लामेटरी गुण असल्यामुळे हिंग कफ, अस्थमा आणि ब्रोंकायटीस यासारख्या श्वसनासंबंधी आजारावर देखील लाभदायक आहे.
पाण्यासोबत हिंग -
एक ग्लास गरम पाण्यामध्ये अर्धा चमचा हिंग घाला. सकाळी उपाशीपोटी प्यायल्याने पचनासंबंधी सर्व समस्यांपासून सुटका मिळते. तसेच तुम्हाला डोकेदुखीचा त्रास असेल तर तो देखील कमी होतो आणि त्वचा उजाळण्यास देखील फायदेशीर असते.
ताकासोबत हिंग -
ताक हे पचनशक्ती आणि वजन कमी करण्यासाठी फायदेशीर असते. एका ग्लासमध्ये ताक घेऊन त्यात चिमूटभर हिंग घाला. त्यामुळे तुम्हाला गॅसचा त्रास होणार नाही. तसेच मासिक पाळीच्या वेळी होणारा त्रास देखील कमी होईल.
दुधासोबत हिंग -
गरम दुधामध्ये हिंगाचे काही तुकडे घाला आणि ते प्या. त्यामुळे सर्वच आजारांवर फायदा मिळतो. तसेच गॅसचा त्रास देखील कमी होतो.
(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.