Tea 
health-fitness-wellness

वेलची चहा बनवण्याची ही आहे योग्य पद्धत; मधुमेहींसाठी हा चहा अत्यंत उपयुक्त

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : भारतीय लोकांच्या खाद्यपदार्थांमधील महत्त्वाची गोष्ट म्हणजे मसाले. प्रत्येक भारतीयाच्या किचनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मसाले हे असतातच असतात! वेलची हा त्यातलाच एक मसाल्याचा प्रकार. या वेलचीचा वापर सर्रासपणे मिठाई, हलवा यांसारख्या गोड पदार्थांमध्ये केला जातो. मात्र, वेलचीचा आणखी एक वापर बऱ्याच जणांना आवडतो तो म्हणजे चहामधील वेलचीची चव होय! जे व्यक्ती चहाचे शौकीन असतात, त्यांना चहामध्ये वेलची ही लागतेच लागते. कारण वेलचीच्या वापराने चहाचा स्वाद आणखीनच खुलतो. शिवाय वेलचीमध्ये अनेक पोषक घटक सापडतात, ज्यांमुळे शरीराला स्वस्थ राखण्यासाठी मदत मिळते. 

वेलचीवर झालेल्या अभ्यासानुसार, यामध्ये असलेल्या एँटीऑक्सिडंट, एँटी-इन्फ्लेमेटरी आणि हायपोलिपिडेमिकचे गुण रक्तातील साखरेचे प्रमाण योग्य ठेवण्यास मदत करतात. जर डायबेटीजचे पेशंट याचं सेवन करत असतील तर त्यांना निश्चितपणे याचा खूपच फायदा होऊ शकतो. 

चहामध्ये वेलचीचा वापर करण्याची योग्य पद्धत
1. काळ्या मिर्चचा वेलची चहा

  1.  इलायची
  2.  लवंग
  3. 1/2 इंच दालचीनी
  4. 2 कप पानी

चहा बनवायची पद्धत

  • वेलची काळ्या मिर्चचा चहा बनवण्यासाठी सर्वांत आधी एका भांड्यात पाणी टाकून गॅसवर गरम करा.
  • जेंव्हा पाणी चांगल्या पद्धतीने गरम होईल तेंव्हा त्यानंतर त्यात दुध, वेलची, लवंग, काळी मिर्च आणि दालचीनी टाकून अर्ध्या तासापर्यंत उकळून घ्या. 
  • जेंव्हा चहा चांगल्या पद्धतीने उकळला जाईल तेंव्हा तो गाळून आपण पिऊ शकतो.  

2. ब्लॅक टी

ब्लॅक टी बनवण्यासाठी साहित्य

  1. 2 वेलची
  2. 1/2 चमचे चहा पत्ती

चहा बनवायची पद्धत

  • ब्लॅक टी बनवण्यासाठी सर्वांत आधी एका भांड्याला गॅसवर गरम करा
  • जेंव्हा पॅन गरम होईल तेंव्हा त्यामध्ये पाणी, वेलची आणि चहा पत्ती टाकून काही वेळापर्यंत तापवा.
  • जेंव्हा चहा चांगल्या पद्धतीने उकळेल तेंव्हा तो गाळून तुम्ही पिऊ शकता. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT