beware Persistent thirst can be a symptom of a serious illness Marathi story
beware Persistent thirst can be a symptom of a serious illness Marathi story 
health-fitness-wellness

सतत तहान लागणे असू शकते गंभीर आजाराचे लक्षण, वेळीच घ्या काळजी

सकाळ डिजिटल टीम

आपल्या शरीराचे संतुलन बनवण्यासाठी पाणी ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. शरीरीत पाण्याचे प्रमाण संतुलन बिघडल्यास आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. दरवेळी आपले शरीराला पाण्याची कमतरता पडली खी आपल्याला तहान लागते. मात्र जर एखाद्या व्यक्तिला गरजेपेक्षा जास्त तहान लागत असेल तर मात्र हे गंभीर आजाराचे लक्षण असू शकते. 

बऱ्याच वैद्यकीय संशोधनानुसार निरोगी व्यक्तीसाठी दररोज सरासरी 2 ते 3 लिटर पिण्याचे पाणी पुरेसे आहे. शरीराच्या आवश्यकतेचे हे प्रमाण विशिष्ट परिस्थितीत कमी होऊ शकते किंवा वाढू शकते. जेव्हा आपण जास्त शारीरीक काम करतो किंवा वातावरण उष्ण असल्यास आपल्याला नेहमीपेक्षा जास्त पाण्याची गरज भासते. तर काही आजारांमध्ये देखील लोकांना पुन्हा तहान लागते. आपल्याला सारखी तहान का लागत आहे हे समजून घेणे महत्वाचे आहे.

जास्त तहान लागण्याच्या स्थितीस मेडिकल टर्ममध्ये 'पॉलीडिप्सिया' म्हणतात. या स्थितीत संबंधित व्यक्ती जास्त पाणी पिते. त्याचे कारण शरीरात सोडियमची कमतरता हे असू शकते. मळमळ किंवा उलट्या अशी लक्षणे देखील उद्भवू शकतात. या व्यतिरिक्त तुम्हाला जास्त लघवी होण्याच्या समस्येलाही तोंड द्यावे लागेल. परंतु असे काही रोग आहेत ज्यात पॉलीडिप्सिया म्हणजे अत्यधिक तहान हे मुख्य लक्षण आहे.

मधुमेह

आजकाल प्रत्येक वयोगटात कोणालाही मधुमेह हा आजार होत आहे. याचे मुख्या कारण बिघडलेली जीवनशैली किंवा अनुवांशिक कारणे असू शकतात. वारंवार तहान लागणे हे ते ओळखण्याचे एक प्रमुख वैशिष्ट्य आहे. किंवा उलट्या अशी लक्षणे देखील उद्भवू शकतात. या व्यतिरिक्त तुम्हाला जास्त लघवी होण्याच्या समस्येलाही तोंड द्यावे लागेल. परंतु असे काही रोग आहेत ज्यात पॉलीडिप्सिया म्हणजे अत्यधिक तहान हे मुख्य लक्षण आहे.

शरीरात पाण्याचा अभाव

शरीरात पाण्याची कमतरता होण्यामागे अन्नातून विषबाधा, हीटवेव्ह, डायरिया, इन्फेंक्शन, ताप किंवा जळजळ ही मुख्य कारणे आहेत. वारंवार तहान, कोरडे तोंड, थकवा, उलट्या होणे, मळमळ आणि अशक्त होणे ही डिहायड्रेशनची लक्षणे आहेत. डिहायड्रेशनच्या रुग्णाला योग्य प्रमाणात पाणी आणि आवश्यक इलेक्ट्रोलाइट्स देऊन बरे करता येते. परंतु काहीवेळा दुर्लक्ष केल्यास ते मृत्यूला कारणीभूत ठरू शकते.

चिंता वाटणे (anxiety)

सामान्यतः या आजारात हृदयाचा ठोका वाढणे, अस्वस्थता आणि अत्यंत चिंताग्रस्त होणे अशी लक्षणे दिसतात.  अशा परिस्थितीत तोंडही कोरडे होते, ज्यामुळे ती व्यक्ती जास्त पाणी पिते. अशा परिस्थितीत काही एंजाईम्स तोंडात तयार झालेल्या लाळचे प्रमाणही कमी करतात, ज्यामुळे जास्त तहान देखील येऊ शकते.

अपचन

जास्त वेळा तेलकट किंवा मसालेदार अन्न खाल्ल्यानंतर ते अन्न सहज पचत नाही. शरीराला अन्न पचवण्यासाठी जास्त पाण्याची आवश्यकता असते. यामुळे शरीरात पाण्याची कमतरता उद्भवते आणि हे देखील जास्त तहान लागण्याचे कारण देखील असू शकते.

जास्त घाम येणे

विशेषत: उष्ण आणि दमट हवामानात जास्त घाम येणे. आपले शरीर तापमान संतुलित करण्यासाठी अधिक पाण्याची गरज पडचे. यामुळे आपल्यालाही जास्त तहान लागते.

उपाय काय आहे?

जास्त तहान लागत असेल तर त्यासाठी पहिला उपाय हा तुम्ही स्वतः त्यावर नियत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा.. एकाचवेळी जास्त पाणी पिणे टाळावे. अशा वेळी घरगुती उपचार देखील प्रभावी ठरु शकतात. जसे की, आवळा पावडर आणि मध यांचे मिश्रण किंवा बडीशेप वाटून खाल्ल्याने तहान कमी होऊ शकते. तसेच एक चमचा मिरपूड पावडर 4 कप पाण्यात उकळा आणि थंड करा, यामुळे तुम्हाला तहान लागणार नाही. जर जास्त होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Political Murder: धाराशिवमध्ये मतदान केंद्राबाहेर राजकीय कार्यकर्त्याची हत्या; चार जणांवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update: इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट जवळ आली - नरेंद्र मोदी

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सोलापुरात राम सातपुते आणि काँग्रेसमध्ये बाचाबाची

Fact Check : कोरोना लसीसंदर्भातील बातम्यांमुळे लस प्रमाणपत्रात बदल करण्यात आले नाहीत; व्हायरल होत असलेला दावा चुकीचा

जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश! चकमकीत लष्करचा प्रमुख बासित अहमद डारसह तीन दहशतवादी ठार

SCROLL FOR NEXT