bitter foods benefits for life nagpur news 
health-fitness-wellness

कडू पदार्थ आवडत नसेल तरी आजच करा खायला सुरुवात, फायदे बघून तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : अनेकांना कडू पदार्थ खाणे आवडत नाही. आईने एक दिवस कारल्याची भाजी केली, तर काहीजण  लगेच तिला दुसरी भाजी बनवून मागतात. पण, कारल्यासारख्या कडू पदार्थांमध्ये व्हिटामीन, खनिज आणि फायबर अधिक प्रमाणात असते. त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते. तसेच आपल्या आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. त्यामुळे आपल्या आहारामध्ये जास्तीत जास्त कडू पदार्थांचा समावेश करा. फक्त कारलेच नाही, तर कैलोरी, आर्गुला, ब्रसेल्स स्प्राऊट्स आदी कडू भाज्यांचा आपल्या आहारामध्ये समावेश केल्यास चांगला फायदा मिळतो. चला तर पाहुयात या पदार्थांमुळे मिळणारे काही फायदे -

पचनशक्ती वाढवण्यास मदत - 
कडू पदार्थांमध्ये फायबरचे प्रमाण अधिक प्रमाणात असते. त्यामुळे आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. हे फक्त पचनशक्ती सुधारत नाही, तर पोटातील अॅसिडला कमी करण्याचे काम देखील करतात. यासोबत पदार्थांचे पचन करणाऱ्या एनजाईम वाढविण्याचे काम देखील करतात. 

रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यास मदत -
कडू पदार्थ आपली रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यास मदत करतात. यामध्ये जीवनसत्व आणि खनिजे असतात. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होण्यास मदत होते. तसेच आपल्या शरीरामध्ये अँटीऑक्सीडंट असतात. त्यामुळे हे दोन्ही शरीराचे आरोग्य सुधारण्यासाठी मदत करतात.

रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करण्यास मदत -
कडू पदार्थांचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. तसेच शरीरातील इंसुलिन वाढविण्यास मदत करते. त्यामुळे साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते. तसेच यामुळे काही हार्मोनची निर्मिती होते. 

हेल्दी त्वचा अन् केस -
कडू पदार्थांचे सेवन केल्याने फक्त पोटाचे विकार दूर होत नाहीत, तर चेहऱ्यावर चमक देखील येते. यामध्ये जीवनसत्व आणि खनिजे याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे चेहरा नैसर्गिकरित्या उजळण्यास मदत होते आणि केस देखील सुंदर, मुलायम होतात.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Venezuela Earthquake: काही मिनिटांत दोन महाभूकंप; इमारतींचे ढिगारे, १० हजार जणांचा मृत्यू झाल्याची भीती... क्षणात उद्ध्वस्त झालं शहर

Tukaram Mundhe: हॉटेलात मोफत अन् स्वच्छ पिण्याचं पाणी बंधनकारक, सुरक्षित अन्नासाठी कठोर नियम; तडजोड नाही, तुकाराम मुंढेंचा इशारा

Latest Marathi News Live Update : येत्या दोन दिवसांत कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता; 'आयएमडी’चा इशारा

Ketan Agarwal Case : चेतनच्या कृत्यामुळे कुटुंब धास्तावले; फ्लॅटला कुलूप लावून रातोरात झाले पसार!

US-Iran Conflict: डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का! इराणविरोधातील लष्करी कारवाई रोखणारा ठराव अमेरिकी सिनेटमध्ये मंजूर

SCROLL FOR NEXT