blood sugar level in morning 
health-fitness-wellness

सकाळी Blood Sugar Lavel किती असावी? जाणून घ्या

मधुमेहींनी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे

सकाळ डिजिटल टीम

रक्तातील साखरेची पातळी वाढणे हे आरोग्याच्या दृष्टीने फारसे चांगले नसते. रिकाम्या पोटी साखर का वाढते.याविषयी लोकांमध्ये मतभेद आहेत. पण, अनेक लोकांची सकाळी रक्तातील साखरेची पातळी वाढते. असं एकदम का होतं. असा प्रश्न यामुळे निर्माण होतो. सामान्यपणे सकाळी Blood Sugar Level किती असावी? असा प्रश्न यामुळे पडतो. मधुमेहाचा मूत्रपिंड, हृदय, डोळे, त्वचा आणि मेंदूवरही परिणाम होतो. त्यामुळे मधुमेहींनी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे.

सकाळी इतके असावे प्रमाण

एका अहवालानुसार, सकाळी रिकाम्या पोटी साखरेचे प्रमाण सामान्य असणे खूप गरजेचे असते. कारण वाढलेल्या साखरेमुळे अनेक प्रकारच्या गंभीर आरोग्य समस्या निर्माण होतात. सकाळी रिकाम्या पोटी सामान्य रक्तातील साखरेची पातळी 70-100 mg/dl असावी, असे मानले जाते. जर साखरेची पातळी 100-125mg/dl झाली तर ते धोकादायक असते. रक्तातील साखरेची पातळी 126mg/dl पेक्षा जास्त मधुमेहाच्या श्रेणीत येते. अशावेळी तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागतो. नाहीतर परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता असते.

Diabetes care

असे राखा योग्य नियंत्रण

-रात्री जेवणाची योग्य वेळ पाळा. शक्यतो लवकर जेवण्याचा प्रयत्न करा. तसेच हेल्दी पदार्थ खा.

- खाल्ल्यानंतर चालण्याचा व्यायाम करणे गरजेचे आहे.

- रात्री चमचमीत पदार्थ, कार्बोहायड्रेट्स, कार्ब्सयुक्त पदार्थ खाऊ नका. यामुळे सकाळी साखरेची पातळी वाढण्याची शक्यता जास्त असते.

- स्वत:ला हायड्रेट ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी जास्तीत जास्त पाणी प्या.

- नाश्ता आवर्जून करा. त्यात पौष्टीक पदार्थ खाण्यावर भर द्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुण्यात वर्दळीच्या रस्त्यावर "ड्रंक अँड ड्राइव्ह"चा थरार; मद्यधुंद चालकाने आधी दुचाकीला धडक दिली अन् मग...

Latest Marathi News Live Update: माढा तालुक्यातील पूरग्रस्त १८ गावांना विविध समाजसेवी संस्थांकडून मदतीचा ओघ

Amit Shah: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार! अमित शहांनी राज्य सरकारने दिले मोठे आश्वासन, म्हणाले...

West Bengal Rains : पश्चिम बंगालमध्ये पावसाचा कहर; दार्जिलिंगमधील भूस्खलनात आतापर्यत १८ जणांचा मृत्यू, पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

INDW vs PAKW: पाकिस्तानी कर्णधाराने चालू सामन्यात स्प्रे मारला, नंतर सर्वच खेळाडूंना मैदानाबाहेर काढलं; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT