Protein Powder Gym Trainer esakal
health-fitness-wellness

'बॉडी' बनविणाच्या नादात आरोग्याशी 'खेळ'; 'स्टेरॉइड्स'चा शरीरावर घातक परिणाम, रोगप्रतिकार शक्ती गमावण्याची भीती

पिळदार शरीर करण्याच्या फंदात तरुणांकडून स्टेरॉइड्स, प्रोटीन पावडरचा (Protein Powder) ‘शॉर्टकट’ वापरला जात आहे.

सकाळ डिजिटल टीम

बॉडी बिल्डिंगच्या शॉर्टकटसाठी घातक स्टेरॉईडचा वापर शहरातील काही जिममध्ये होत आहे.

-गौरव डोंगरे

कोल्हापूर : पिळदार शरीर करण्याच्या फंदात तरुणांकडून स्टेरॉइड्स, प्रोटीन पावडरचा (Protein Powder) ‘शॉर्टकट’ वापरला जात आहे. झटपट बॉडीच्या या अट्टहासाने सेवन केल्या जाणाऱ्या औषधांनी रोगप्रतिकार शक्ती गमावण्याची भीती असते. शरीरसौष्ठव स्पर्धेतील (Bodybuilding Competition) ईर्ष्येतून दीर्घकाळालीन नुकसान ओढावून घेतले जात आहे. कोल्हापुरात जिम ट्रेनरकडूनच (Gym Trainer) घातक औषधे देण्याचा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांकडून याची पाळेमुळे शोधण्यास सुरुवात झाली आहे.

जिल्ह्यातील जिममध्ये व्यायाम करणारी तरुणाई ही सुदृढ शरीर बनविण्यासाठी ‘मेफेनटेरमाईन सल्फेट’सारखे घातक असणारे औषधाचा वापर होत असल्याचे कळंबा (ता. करवीर) गावात मुख्य रस्त्यावर असलेल्या फिटनेस जिमवरील छाप्यात स्पष्ट झाले. बॉडी बिल्डिंगच्या शॉर्टकटसाठी घातक स्टेरॉईडचा वापर शहरातील काही जिममध्ये होत आहे. पालिकेच्या एका जिममध्येच सध्या वापर चर्चेत आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी (Kolhapur Police) औषध विक्री करणाऱ्या काही संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.

मांसपेशी वाढवण्यासाठी आहारातून प्रथिने मिळणे उत्तम मानले जाते. योग्य आहारातून प्रोटीन, कार्बन्स, मिनरल, व्हिटॅमिन, फायबर असा सर्व समावेशक आहार घ्यावा लागतो, योग्य ७-८ तास झोप, व्यायामासाठी योग्य तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे. उत्तेजक द्रव्ये घेणाऱ्यांना केवळ शारीरिक नव्हे तर मानसिक परिणाम होतात.

-विजय मोरे, भारत श्री, विजेते शरीरसौष्ठवपटू

जोर, बैठका, पुशअप्ससारखा व्यायाम सुरुवातीला केला पाहिजे. शरीराची ताकद वाढविण्यासाठी घरगुती आहार पद्धतीही अवलंबू शकतो, परंतु योग्य सल्ला न घेता अनेकजण चुकीची औषधे घेऊन कायमस्वरूपी नुकसान करून घेतात.

-राजेश वडाम, शरीरसौष्ठवपटू

‘स्टेरॉइड्स’चा शरीरावर घातक परिणाम

अॅनाबॉलिक-अँड्रोजेनिक स्टेरॉइड्स असलेली पावडर जास्त प्रमाणात किंवा तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय सेवन करत राहिल्यास हृदयविकाराचा धोका संभवतो. गंभीर प्रकरणांमध्ये हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. हृदयासोबत यकृताच्या आजारांचा धोका वाढतो. पुरुषांमध्ये संप्रेरक असंतुलन होऊन प्रजनन क्षमतेवर नकारात्मक परिणाम, शुक्राणूंचे प्रमाण कमी होऊ शकतात.

व्यायामानंतर हा आहार घ्या...

प्रथिनांचा सेवन केल्याने व्यायाम केल्यानंतर शरीराची झालेली झीज भरून काढण्याचे काम प्रथिने करतात. व्यायाम केल्यानंतर २५ मिनिटांच्या आत प्रथिने घ्यायला हवे. आपण जर शाकाहारी असाल, तर भाजलेले शेंगदाणे, काजू, बदाम, कच्चे सोयाबीन, पालक भाजी, पनीर, दूध घेऊ शकता. या पदार्थांमध्ये प्रथिने असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tejashwi Yadav FIR : तेजस्वी यादवसह चौघांविरोधात 'FIR' दाखल; जाणून घ्या, नेमकं काय प्रकरण?

Photography Competition : पर्यटनस्थळे ‘क्लिक’ करा, पाच लाखांचे बक्षीस मिळवा; शंभूराज देसाई यांची माहिती

Government Websites : सर्व सरकारी संकेतस्थळे आता होणार मराठीत!

Ashish Shelar : ठाकरेंनी आले‘पाक’ खाणे बंद करावे

CM Devendra Fadnavis : पाच लाखांवरील उपचारांसाठी निधी; उपचारांची संख्या दोन हजारांवर वाढणार

SCROLL FOR NEXT