breast. feedingjpg
breast. feedingjpg 
health-fitness-wellness

स्तनपान बाळासाठी अमृत आणि आईसाठी समाधान

डॉ लीना धांडे अकॅडेमी, ऑफ पेडियाट्रिक्स नागपूर

स्तनपानाची माहिती गर्भावस्थेतच स्त्रीला दिली गेली पाहिजे, जेणेकरून तिची मानसिक तयारी होईल, स्तनाग्राच्या समस्या सोडवता येतील व ती सुरवातीपासूनच नवजात शिशूला आत्मविश्वासाने दूध पाजू शकेल. बाळ जन्माला आल्यानंतर अर्ध्या तासाच्या आतच स्तनपानाची सुरुवात झाली पाहिजे.

ज्या स्त्री चे c-section झाले आहे तिने लवकरात लवकर स्तनपान सुरू केले पाहिजे. जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशक तत्त्वानुसार जन्म झाल्यानंतर बाळाला लवकरात लवकर आईच्या छातीवर स्तनपानासाठी दिले पाहिजे. ती त्यावेळेस डिलिव्हरी टेबलवरच असल्यामुळे कोणी मदतनीस असल्यास बाळाला दूध पाजणे सोपे जाते. या नंतर बाळाला दूध त्याच्या मागणीनुसार दिले पाहिजे,

बळजबरी दूध देऊ नये. एकदा सुद्धा बाळाला वरचे दूध दिल्यास आईचे दुधाचे प्रमाण कमी होत असते आणि म्हणून आईने बाळाला पहिले सहा महिने, निव्वळ स्तनपान केले पाहिजे म्हणजे फक्त स्तनपान केले पाहिजे... कडक उन्हाळ्यातसुद्धा पाणी देऊ नये...इतर कुठलाही पदार्थ जसे दूध, मध, डब्याचे दूध काहीसुद्धा देऊ नये. कुठल्याही परिस्थितीत बाटलीने अर्भकाला दूध देऊ नये. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, जसे मातेचा मृत्यू झाल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने वाटी चमच्याने उपलब्ध दूध द्यावे परंतु बाटलीने अजिबात देऊ नये.

स्तनपान व पूरक आहार
पहिले ६ महिने पूर्ण होईस्तोवर बाळाला निव्वळ स्तनपान करणे आवश्यक आहे, म्हणजेच बाळाला फक्त आणि फक्त मातेचेच दूध दिले पाहिजे. अन्य कुठलेही दूध किंवा इतर पदार्थ द्यायला नको, पाणी सुध्दा नाही.

६ महिने पूर्ण झाल्यावर बाळाला पूरक आहाराची आवश्यकता भासते. दर आठवड्याला एक नवीन मऊ शिजविलेला पदार्थ समाविष्ट करावा, प्रत्येक पदार्थाची चव नावीन्यपूर्ण व सौम्य असली पाहिजे. पदार्थ चमच्यात घेऊन तिरपा केल्यास सांडला नाही तर तो योग्य घनतेचा आहे असं समजावे. आहारात विविधता ठेवावी जसे खिचडी, खीर, वरण पोळी, दहीभात, इडली, निरनिराळ्या भाज्या भातात चुरून टाकाव्या. अशा प्रकारे हळूहळू स्तनपान कमी करीत पूरक आहाराची मात्रा वाढवावी.

बाळ दोन वर्षाचे होईपर्यंत स्तनपान चालू ठेवावे. अखेरच्या काही महिन्यात केवळ रात्रीच स्तनपान करावे. शिशू एक वर्षाचा झाला की त्याचा आहार मातेच्या आहाराच्या अर्धा तरी असावा. सुरुवातीला मऊ पदार्थ दिले तरी हळू हळू पदार्थ अधिक घट्ट करावे. दात येऊ लागल्याने बाळ ते चावून खाण्यास सक्षम असतो. बाळाचा आहार संपूर्ण व संतुलित असावा.

स्तनपान- फायद्याचा सौदा!
मातेचे दूध बाळाला पाजणे म्हणजेच स्तनपान करणे होय. मातेचे दूध बाळाला थेट स्तनापासून पाजू शकतो किंवा त्याला पिळून वाटी चमच्याने सुद्धा पाजले तरी त्याला स्तनपानाचा एक प्रकार समजला जातो. मातेचे दूध हे सर्वांगाने परिपूर्ण असते, बाळाकरिता एक प्रकारचा संतुलित आहार असतो. यामध्ये सर्व पोषक तत्त्व योग्य प्रमाणात असतात याशिवाय हे दूध मातेच्या स्तनातून स्रवत असल्यामुळे त्याचे तापमान सुद्धा बाळाच्या दृष्टीने सुयोग्य असते. ते मातेच्या स्तनातून थेट बाळाच्या तोंडात जात असल्यामुळे त्याच्या स्वच्छतेसाठी व निर्जंतुकीकरण करण्यासाठी काहीच त्रास नाही घ्यावा लागत हे लक्षात घेण्यासारखे आहे.

ज्या माता बाटलीने दूध पाजतात त्यांना बाटलीची स्वच्छता ठेवणे पर्याप्त असते आणि जर त्यांनी ते नीट नाही केले तर बाळाला जंतुसंसर्ग होऊन पातळ संडास इत्यादी होऊ शकते. स्तनपान न करणारी माता व कुटुंब बाळाच्या पोषणाकरिता गायीचे किंवा इतर प्राण्याचे दूध, दूध पावडर, बाटली, इंधन इत्यादी अनेक गोष्टींवर खर्च करीत असतात.
स्तनपान केल्यामुळे माता व कुटुंबाचा वेळ, पैसा, इंधन इत्यादीची बचत होते. संपूर्ण जगाचा विचार केला तर मातेच्या दुधाचे पर्यायी पावडर व बाटल्या बनविणारे उद्योग वसुधेवर मोठ्या प्रमाणात प्रदूषण करित आहेत.

मातेच्या दुधाचा एक अद्वितीय गुणधर्म आहे त्यातून बाळाला मिळणारी रोग प्रतिकारशक्ती. मातेनी आयुष्यभर ज्या विविध रोगांचा सामना केला त्यांच्या विरुद्ध तिच्या शरीरात प्रतिकारशक्ती निर्माण होते. स्तनदा माता आपल्या दुधातून ही शक्ती आपल्या शिशूला मुबलक प्रमाणात हस्तांतरित करत असते. म्हणुनच तर मातेचे दूध जिवंत समजले जाते. नवजात शिशूमध्ये जात्याच रोगप्रतिकारशक्ती कमी असते, ही शक्ती कमी वजनाच्या व कमी दिवसांच्या अर्भकांच्या बाबतीत आणखीनच प्रकर्षाने कमी असते. अशा मध्ये स्तनपान शिशू करिता कवच कुंडले ठरतात!
बालकांमध्ये पहिली पाच वर्षे विशेषतः जन्मानंतर पहिल्या महिन्यात मृत्युदर सर्वाधिक असतो. तो आटोक्यात आणण्यासाठी स्तनपान सर्वोत्तम शस्त्र आहे. बाळा चे आजारी पडण्याचा व मृत्युमुखी पडण्याचा दर कमी झाल्यास कुटुंबाचा व पर्यायाने देशाचा कोट्यवधी रुपयांचा फायदा आहे.

संपादन - स्वाती हुद्दार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT