Corona In Children 
health-fitness-wellness

तिसरी लाट मुलांसाठी घातक; कोरोना काळात घ्या 'ही' काळजी

कोरोनाचा लहान मुलांमधील वाढता संसर्ग टाळण्याचा बालरोगतज्ञांचा इशारा

शर्वरी जोशी

देशात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलं आहे. या लाटेचा प्रादुर्भाव कमी होत नाही, तोच आता तिसरी लाटदेखील (covid 3rd wave) येणार असल्याचं म्हटलं जात आहे. विशेष म्हणजे या तिसऱ्या लाटेचा परिणाम लहान मुले (children) व तरुणांवर अधिक होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळेच या काळात लहान मुलांची काळजी घेणं अत्यंत गरजेचं असल्याचं बालरोगतज्ज्ञांनी (experts) म्हटलं आहे.(children below 18 years risk covid 3rd wave experts explain)

कोविडच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुस-या लाटेत ताप, अतिसार, सर्दी आणि खोकला यांसारखी लक्षणे दिसून आली. घरातल्या प्रौढ व्यक्तींमध्ये तीव्र लक्षणे असल्याने, मुलांना देखील त्याचा संसर्ग होऊ शकतो. जरी लहान मुलांना जास्त त्रास होत नसला तरीदेखील ते संसर्गाचे वाहक ठरू शकतात. बालरोगतज्ज्ञांच्या मतानुसार, ० ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी तिसरी लाट अधिक गंभीर असू शकते. १२ ते १८ वयोगटातील मुलांना देखील लस मिळावी याकरिता असलेल्या प्रस्तावाला अजून मान्यता मिळालेली नाही. रोग बरा करण्यापेक्षा प्रतिबंधांत्मक उपायांचा अवलंब करूने अधिक उत्तम ठरते.

मुलांसाठी 'या' गोष्टी करा फॉलो

१. लहान मुलांचे हात सातत्याने धुवा. त्यांना सॅनिटायझर व साबणाचा वापर कसा करावा याचं मार्गदर्शन करा.

२. मुलांसमोर शिंकतांना व खोकतांना तोंडावर रुमाल अथवा टिश्यू पेपर धरावा. तसंच एकदा वापरलेला टिश्यू पेपर पुन्हा वापरु नये.

३. समोरच्या व्यक्तीशी बोलताना कमीतकमी ६ फूट अंतर राखावे. विशेषत: आजारी असलेल्यांनी इतर व्यक्तींच्या संपर्कात येणे टाळावे. तसंच मुलांपासून दूर रहावे.

४. अस्वच्छ हातांनी आपले डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करू नका, जर आपण वारंवार स्पर्श केला तर विषाणु संसर्गाचा धोका अधिक वाढतो.

५. जर तुमच्या मुलांना ताप, खोकला तसेच श्वास घेण्यास त्रास होत असेल तर डॉक्टरांशी सल्लामसलत करुन त्यातील लक्षणांविषयी माहिती द्या. वेळीच तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या व उपचारास विलंब करू नका.

६.आपल्या मुलांच्या लसीकरणाचे वेळापत्रक चुकवू नका. जर एखादा डोस घेण्यात विलंब होत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रलंबित डोस लवकरात लवकर घेण्यात यावा.

७. निरोगी आतडे मुलांमध्ये रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत करते. दह्यासारख्या पदार्थात प्रोबायोटिक्स भरपूर असतात जे आतडे निरोगी ठेवण्यास मदत करतात. मुलांना सतत एकाच जागी बसवून न ठेवता त्यांच्या शारीरिक हालचाली वाढवून त्यांना सक्रिय राहण्यासाठी प्रोत्साहित करा आणि वैयक्तिक स्वच्छता राखण्याविषयी मुलांना सूचना द्या.

७.कच्चे अथवा अर्धवट शिजविलेल्या मांस मुलांना देऊ नका.

८. स्वत: च्या मर्जीने औषधे घेण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

(डॉ. तुषार पारेख हे खरडी,पुणे येथील मदरहुड हॉस्पिटलमध्ये बालरोग तज्ज्ञ आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Female Doctor Case: पीएसआय आणि अन्य आरोपीनं महिला डॉक्टरचा छळ का केला? पीडितेच्या भावानं खरं कारणच सांगितलं, वाचा इनसाईड स्टोरी...

Mumbai News: रोजंदारी कामगारांची दिवाळी अंधारात! आरोग्य विभागाकडून बोनसचा प्रस्ताव रखडला

Weekly Horoscope 27 October to 2 November: हंस राजयोग कर्क राशीसह 5 राशींचे भाग्य उजळेल, अपूर्ण इच्छा होईल पूर्ण

BEL Recruitment 2025: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये ट्रेनी इंजिनिअर पदांसाठी भरती जाहीर; जाणून घ्या अर्ज करण्याची अंतिम तारीख

Satara Female Doctor Case : साताऱ्यातील डॉक्टर तरुणीच्या प्रकरणात वांरवार फोन करणारा खासदाराचा पीए कोण? कुटुंबियांचे गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT