clean to your legs beneficial to sleep also in kolhapur 
health-fitness-wellness

रात्री झोपण्यापूर्वी पाय स्वच्छ धुण्याने होतात फायदे ; कोणते ते वाचा

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : घरातले काम असो किंवा ऑफिसचे या काही दिवसांत घरीच चालू असलेल्या कामाने खूप दबाव आणि थकायला होते. चांगले जेवण, थोडा व्यायाम,आणि चांगली झोप घेणं हे सध्याचा काळात थोड कठीण झाले आहे. तसे पहायला गेले तर यावर बरेच उपाय शोधून ठेवले आहेत. पण तरीही तुम्ही आम्हीही काही उपाय सुचवत आहोत. रात्री झोपण्यापूर्वी आपल्या पायाचे तळवे स्वच्छ धुवून झोपा. तुम्हाला चांगली झोप येण्यास नक्कीच मदत होईल. त्याचबरोबर पचनक्रिया होण्यास ही मदत होईल. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की, पचन क्रियेचे आणि आप्या आरोग्याच डायरेक्ट कनेक्शन आहे.

चांगली ऊर्जा मिळते

पायांना आराम झोपल्यानंतरच मिळतो. जितका वेळ काम करत राहाल तितका वेळ पाय जमिनीवर रहातील. त्यामुळे पायांना आराम मिळणे अवघड असते. त्यामुळे रात्री झोपताना पायांचे तळवे स्वच्छ धुतल्याने पायांना आराम पडतो. आणि शरीराला ही आराम मिळतो.

शरीराचे तापमान बरोबर राहण्यास मदत होते
     
शरीराचे तापमान बरोबर राखण्यासाठी पायांचा सर्वांचत मोठा सहभाग असतो. त्यामुळे आयुर्वेदामध्ये पायांची स्वच्छता राखण्यावर अधिक भर दिला आहे. दिवसभर पाय बूट किंवा चप्पलमध्ये असल्याने, चप्पल काढल्यानंतर एक प्रकरची जलन होते. त्यामुळे कधीही बाहेरून आल्यानंतर झोपण्यापूर्वी स्वच्छ पाय धुवून झोपावे.

तळव्यांमध्ये अक्यूप्रेशर असतात
 

आपल्या पायांच्या तळव्यांमध्ये पूर्ण शरीराचे अक्यूप्रेशर पॉइंट असतो. जेव्हा पाय धुवत असताना ते रगडले जातात. या क्रियांमध्ये त्यातील तणाव कमी होतो. त्यामुळे मानसिक संतुलन राहते. चांगली झोप येण्यासाठी मानसिक संतुलन व्यवस्थित राहणे गरजेचे आहे.

पायांकडे दुर्लक्ष करू नका

ज्या पद्धतीने तुम्ही तुमच्या शरीराची, चेहऱ्याची देखभाल करता. त्याच पद्धतीने पायांची देखभालही करा. त्यामुळे पायांची काळजी घ्या. रात्री झोपताना पाय स्वच्छ धुवून झोपा. त्यामुळे तुमच्या मास पेशींना आणि जोडपेशींना आराम मिळेल. त्यामुळे तुम्हाला रात्री चांगली झोप लागेल. पायांत सूज वैगेरे असेल तर गरम पाण्यामधे मीठ  20 ते 25 मिनिट पाय ठवून बसा त्यामुळे आराम मिळेल.

पायांच्या काळजीसाठी आणखी काही उपाय


1.पायांना आठवड्यातून एक वेळ गरम पाण्याने स्वच्छ धुवावे.

2.स्वच्छ करत असताना पाय आणि बोटांमधील जागा धुण्यास विसरू नका.

3.पाय धुतल्यानंतर हलक्या हातानी पुसून त्यांना मऊ हातानी मॉलिश करा.

4.पायांची त्वचा आहे म्हणून त्याला जोर जोरात पुसण्याची चुकी करू नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोबाईल हॅक झाल्याची भीती, फार्मसीच्या २० वर्षीय तरुणानं जीवन संपवलं; एकुलत्या एक लेकाच्या मृत्यूनं आई-वडिलांचा आक्रोश मन हेलावणारा

CA Exam Result: 'सीए परीक्षेत सांगलीतील २० जणांचे उल्‍लेखनीय यश'; गेली काही वर्षे विद्यार्थ्यांचे यशात सातत्य

Eco Friendly Bill: ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पाच लाख ग्राहकांनी घेतला फायदा

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : पुण्यात २६ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT