health-fitness-wellness

प्रोटीन शेक पिताना करु नका 'या' चुका, नाहीतर...

प्रोटीन शेक पिताना केलेली 'ही' चूक पडेल महागात

शर्वरी जोशी

वर्कआऊट केल्यानंतर प्रोटीन शेक protein shake घेण्याकडे अनेकांचा कल असतो. प्रोटीन शेक घेतल्यामुळे फिट राहण्यास आणि पिळदार शरीरयष्टी होण्यास मदत मिळते असं म्हटलं जातं. त्यामुळे अनेक तरुण आणि तरुणीदेखील प्रोटीन शेकचं सेवन करतात. आजकाल बाजारात विविध प्रकारचे, फ्लेवर्सचे प्रोटीन शेक बाजारात मिळतात. मात्र, हे प्रोटीन शेक तयार करताना अनेक जण काही लहान लहान चुका करतात. ज्यामुळे पुढे जाऊन त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. म्हणूनच, प्रोटीन शेक तयार करताना कोणत्या चुका टाळायला हव्यात ते पाहुयात. (common-mistakes-related-to-making-protein-shake)

१. प्रमाणापेक्षा जास्त पावडर वापरणे-

प्रोटीन शेक करताना जास्त पावडर टाकली तर त्याचा अधिक फायदा होईल असा अनेकांचा समज असतो. मात्र, हा समज अत्यंत चुकीचा आहे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केला तर त्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे प्रोटीन पावडर कायम प्रमाणातच वापरावी. तसंच प्रोटीन मिळवण्यासाठी तुम्ही चिकन आणि अन्य प्रोटीनयुक्त पदार्थ खाऊ शकता.

२. अतिरिक्त पदार्थांचं सेवन -

काही जणांना झटपट रिझल्ट हवा असतो. त्यामुळे अनेक जण प्रोटीन शेकमध्ये बदाम, नट्स, बेरीज किंवा अन्य पदार्थ मिक्स करत असतात. परंतु, प्रोटीन शेकमध्ये असे पदार्थ मिक्स केल्यामुळे त्याचा फायदा वाढण्याऐवजी कमी होतो. त्यामुळे जर मसल्स वाढवायचे असतील तर प्रोटीन शेक करताना त्यात कमी साखरयुक्त पदार्थांचा समावेश करावा.

३. जेवणाऐवजी प्रोटीन शेक पिणे -

काही जण सकाळचा नाश्ता किंवा दुपारी जेवण न करता त्याऐवजी केवळ प्रोटीन शेक पितात. परंतु, हे शरीरासाठी योग्य नाही. फक्त प्रोटीन शेक प्यायल्यामुळे शरीराला आवश्यक असणारे पोषकघटक मिळत नाहीत. त्यामुळे प्रोटीन शेक जरी पीत असलात तरीदेखील नियमित जेवण आणि नाश्ता करणं गरजेचं आहे.

४. योग्य वेळी सेवन करा -

मनात आलं आणि मग प्रोटीन शेक घेतलं असं करु नका. प्रोटीन शेक घेण्याचीही एक वेळ असते. त्या वेळेनुसारच त्याचं सेवन करा. वर्कआऊट केल्यानंतर एका तासाच्या आत प्रोटीन शेक पिणं शरीरासाठी फायदेशीर असतं.त्यामुळे त्याच वेळात ते घ्यावं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Santosh Deshmukh Case: ''संतोष देशमुख प्रकरणातल्या आरोपींनी राबवलं ऑपरेशन डी-टू'', उज्वल निकमांनी घेतलं थेट पाकिस्तानचं नाव

Trip Locations : गुगलवर वर्षभरात सर्च झालीत टॉप 5 ठिकाणे, दोन दिवसांची सुट्टी घेऊन प्लॅन करा ट्रीप, खर्चही एकदम कमी

Latest Marathi News Live Update : वर्ध्यात सामान्य रुग्णालयात आग, सुदैवाने कुणालाही इजा नाही

ICC Rankings: वर्ल्ड कप स्टार दीप्ती शर्मा नंबर १! ऑस्ट्रेलियान खेळाडूला धक्का; पण, स्मृती मानधनाने गमावला ताज

नियती इतकी निर्दयी कशी? अपघात आई-वडिलांचं छत्र हरवलं, निरागस लेकरांनी एकमेकांना सावरलं; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT