mucormycosis mucormycosis
health-fitness-wellness

लस घेतल्यानंतर म्युकोरमायकोसिसचा धोका होतो कमी?

जाणून घ्या, तज्ज्ञ काय म्हणतात...

सकाळ डिजिटल टीम

गेल्या दीड वर्षांपासून प्रत्येक जण कोरोना विषाणूसोबत लढा देत आहे. विशेष म्हणजे या विषाणूवर यशस्वीरित्या मात केलेल्या अनेक रुग्णांमध्ये पोस्ट कोविडची समस्या निर्माण होत आहे. यामध्येच म्युकोरमायकोसिसचे सर्वाधिक रुग्ण आढळून आल्याचं पाहायला मिळालं. म्हणूनच, कोविड आणि पोस्ट कोविडची समस्या टाळायची असेल तर लवकरात लवकर प्रत्येकाने लस घेणं अत्यंत गरजेचं आहे. विशेष म्हणजे ज्या रुग्णांनी कोविडची लस घेतली आहे त्यांच्यामध्ये म्युकोरमायकोसिस होण्याचा धोका कमी असल्याचं नुकतंच समोर आलं आहे. न्यूबर्ग डायग्नॉस्टिक्स पॅनलने अलिकडेच एका चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. या चर्चासत्रामध्ये तज्ज्ञांनी हे मत मांडलं आहे. (corona-vaccine-vaccination-reduces-mucormycosis-risk)

अलिकडेच कोविडसंदर्भात एका चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. या चर्चासत्रामध्ये देशातील अनेक तज्ज्ञ डॉक्टरांनी सहभाग घेतला होता. यामध्ये त्यांनी लसीकरणाचं महत्त्व आणि कोविडची समस्या टाळण्याचे उपाय यावर चर्चा केली.

"मार्च महिन्यात म्युकरमायकोसिसचा पहिला रुग्ण आढळून आला. सुरुवातीच्या काळात म्युकोरमायकोसिसचे २ ते ३ रुग्ण होते. त्यानंतर त्यांच्यात वाढ होऊन हा आकडा १० ते १५ पर्यंत पोहोचला. इतकंच नाही तर म्युकोरमायकोसिसमुळे जवळपास ४० ते ५० टक्के लोकांना त्यांचे प्राण गमवावे लागले. विशेष म्हणजे काळ्या बुरशीवर ठोस औषध उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांची व मृतांची संख्या वाढली", असं चेन्नईमधील मद्रास ईएनटी रिसर्च फाउंडेशनचे संस्थापक, ओटोऱ्हायनोलॅरिंगोलॉजिस्ट प्राध्यापक डॉ. मोहन कामेश्वरन यांनी सांगितलं.

पुढे ते म्हणतात, "माझ्याकडे आलेल्या रुग्णांपैकी जवळपास ६० ते ७० रुग्णांनी कोविड लस घेतली नव्हती. तर ३० टक्के लोकांनी लशीचा एक डोस घेतलेला आणि ५ टक्के लोकांनी दोन्ही डोस घेतले होते. विशेष म्हणजे ज्यांनी लशीचे दोन्ही डोस घेतले आहेत त्यांच्यात कोरोना होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. परिणामी, अशा व्यक्तींना म्युकोरमायकोसिसचा धोकाही नाही."

दरम्यान, हळूहळू आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. मात्र, कोविडवर मात केलेल्या अनेक रुग्णांमध्ये आता पोस्ट कोविडची समस्या निर्माण होताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये पुन्हा एकदा भीतीचं वातावरण पसरलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GST 2.0 : नवी गाडी घेताय? जरा थांबा! सेकंडहँड गाड्याही स्वस्त, 'ही' कंपनी देत आहे २ लाखांपर्यंत सूट...

IPhone 17 Crowd: आयफोन १७ विक्री सुरू; बीकेसीच्या स्टोअरबाहेर तुफान गर्दी, रांगेत धक्काबुक्की अन् हाणामारीचा थरार!

RBI Recruitment 2025: रिझर्व बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! ग्रेड-बी ऑफिसर पदासाठी १२० जागांची भरती सुरू; जाणून घ्या पगार आणि अर्ज प्रक्रिया

Latest Marathi News Updates : शरद पवारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन

Latur News: प्रसूतीसाठी दाखल झालेल्या माता अन् बाळाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT