Vaccination to Children
Vaccination to Children Sakal
health-fitness-wellness

लहान मुलांसाठी जगभरात कोविडच्या 'या' लसी आहेत उपलब्ध

सकाळ डिजिटल टीम

जवळजवळ एक वर्षानंतर, 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी कोविड-19 लसीकरण मोहीम जोरात सुरू झाली. सोमवार ३ जानेवारीपासून सुरू झालेल्या या लसीकरणात साधारण 40 लाखांहून अधिक मुलांना त्यांचा पहिला डोस मिळाला आहे.

गेल्या दोन वर्षांत कोरोनाच्या साथीमुळे जगावर मोठा परिणाम झाला आहे. त्यातून आता ओमिक्रॉनमुळे (Omicron) पुन्हा धास्ती वाढली आहे. त्यामुळे सरकार आणि लोकांसाठी परिस्थिती हाताळणे अधिक कठीण झाले आहे.

जानेवारी 2020 मध्ये, कोरोनाव्हायरस ( COVID-19 vaccines) लस भारतात आली. त्यामुळे अनेकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. तेव्हा लहान मुलांसाठी लस उपलब्ध नव्हती. पण आखा जवळजवळ एक वर्षानंतर, 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी कोविड-19 लसीकरण मोहीम जोरात सुरू झाली. सोमवार ३ जानेवारीपासून सुरू झालेल्या या लसीकरणात साधारण 40 लाखांहून अधिक मुलांना त्यांचा पहिला डोस मिळाला आहे.

भारताबरोबरच अनेक देशांनी विशिष्ट वयोगटातील मुलांना COVID लस देण्यास सुरुवात केली आहे. यूएस फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन (FDA) ने एक पाऊल पुढे टाकत 12 ते 15 वयोगटातील मुलांना बूस्टर शॉट्स वापरण्यास अधिकृत केले आहे. त्यांनी दुसऱ्या - तिसऱ्या शॉटमधील अंतर पाच महिन्यांपर्यंत कमी केले आहे. त्यामुळे आतापर्यंत मुलांसाठी असलेल्या सर्व उपलब्ध कोरोना व्हायरस लसींवर एक नजर टाकूया. (COVID-19 Vaccines For Kids)

vaccination

भारतात कोव्हॅक्सिन (Covaxin Approved in India)

भारताने पाच कोविड-19 लसींना मान्यता दिली आहे. यात भारत बायोटेकची कोवॅक्सिन, झायडस कॅडिलाची ZyCoV-D, सीरम इन्स्टिट्यूटची कोवोव्हॅक्स, बायोलॉजिकल ईची RBD आणि जॉन्सन अँड जॉन्सन आणि Ad 26COV.2S अशा लसी आहेतय पण, सध्या मुलांसाठी भारत बायोटेकचा कोवॅक्सिन हा एकमेव लसीचा पर्याय उपलब्ध आहे. या लसीला 12 ते 18 वर्षे वयोगटातील आपत्कालीन परिस्थितीत वापरासाठी मान्यता देण्यात आली आहे.

स्वित्झर्लंड, इटलीमध्ये मोडरेना शॉर्ट (Moderna shot)

स्वित्झर्लंडने 12 ते 15 वयोगटातील मुलांसाठी Pfizer आणि Moderna COVID-19 या दोन्ही लसींना मान्यता दिली आहे. इटलीने 12-17 वयोगटातील मुलांसाठी Moderna च्या लस वापरण्यास मान्यता दिली आहे.

child vaccination

यूएस आणि EU-राष्ट्रांमध्ये फायझर-बायोटेक लस (Pfizer-BioNTech vaccine in the US and EU-nations)

मुलांसाठी युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आणि युरोपियन युनियन देशांमध्ये, Pfizer-BioNTech COVID-19 लस उपलब्ध आहे. युरोपियन मेडिसिन एजन्सीने Pfizer-BioNTech ची कमी-डोस असलेली लस ५ ते ११ वयोगटासाठी वापरण्यास मान्यता दिली आहे, तर यूएस अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) . 5 ते 18 वयोगटातील मुलांसाठी Pfizer-BioNTech कोविड-19 लसीचा वापर अधिकृत केला आहे.

चीनची सिनोफार्म - सिनोव्हॅक लस(China's Sinopharm and Sinovac vaccine)

चीनमध्ये सिनोफार्म आणि सिनोव्हॅक या दोन लसी दिल्या जात आहे. तेथे लहान मुलांच्या लसीकरणास सुरूवात झाली आहे. तर, इंडोनेशियाने सहा वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठी सिनोव्हॅकचे लस अधिकृत केली आहे. अर्जेंटिनात तीन वर्षांपेक्षा लहान मुलांना सिनोफार्मची लस देत आहे. मध्य पूर्व मध्ये, बहरीनने 3-11 वयोगटातील मुलांसाठी सिनोफार्म लस मंजूर केली आहे.

क्यूबात अब्दाला -सोबेराना या दोन स्वदेशी लसी (Cuba's two homegrown vaccines Abdala and Soberana)

क्यूबाने सप्टेंबरमध्ये 2 ते 10 वयोगटातील मुलांसाठी अब्दाला आणि सोबेराना या दोन स्वदेशी लसी देण्यास सुरूवात केली आहे, डेल्टा प्रकाराचा प्रसार रोखण्यासाठी हा आवश्यक उपाय असल्याचे सांगितले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi in Dharashiv: अमेरिकेत व्हाईट हाऊसमध्ये जेवणाच्या टेबलवर होतं 'सूपरफूड'; मोदींनी सांगितला किस्सा

T20 WC 24 South Africa Squad : दक्षिण आफ्रिकेने टी-20 वर्ल्ड कपसाठी संघाची केली घोषणा! 2 अनकॅप्ड खेळाडूंची ताफ्यात एन्ट्री

Indian Navy: "कोणत्याही आव्हानासाठी नौदल कायम सज्ज," पदभार स्वीकारताच नवे नौदल प्रमुख गरजले

Latest Marathi News Live Update : काँग्रेस जनतेची संपत्ती, त्यांच्या व्होटबँकेला वाटणार, मोदींचा आरोप

Swapnil Joshi: स्वप्नील जोशीच्या मुलांचा 'नाच गं घुमावर' भन्नाट डान्स; पहा व्हिडीओ

SCROLL FOR NEXT