Coronavirus, New Research, Unmarried  
health-fitness-wellness

Coronavirus: कोरोना अविवाहितांसाठी अधिक धोक्याचा! 

सकाळ ऑनलाईन टीम

Coronavirus New Research : कोरोना विषाणूनं अख्ख्या जगाला हैराण करुन सोडले आहे. कोरोनाग्रस्तांचाआकडा हळूहळू नियंत्रणात येत असला तरी अद्यापही कोरोनाचा धोका टळलेला नाही. यासंदर्भात विविध पातळीवर अभ्यासही सुरु आहे. जे लोक अविवाहित राहण्याचा विचार करतात त्यांना कोरोनाचा अधिक  धोका संभवतो, असे नव्या अभ्यासातून समोर येत आहे. एवढेच नाही तर विवाहितांच्या तुलनेत अविवाहित लोकांमध्ये कोरोनामुळे मृत्यू ओढावण्याची शक्यताही अधिक असते, असे नव्या रिसर्चमधून समोर येते. 

काय आहे या रिसर्चमागचे नेमंक कारण 

अविवाहित लोकांची जीवनशैली ही याच मुख्य कारण असल्याचा उल्लेख अभ्यासात करण्यात आला आहे. लाइफ स्टाइलमुळे  विवाहितांच्या तुलनेत अविवाहित लोकांनी रोगप्रतिकारक क्षमता कमी असते. त्यामुळे कोरोना प्रादुर्भावाचा होण्याची अधिक भीती अशा लोकांना असते. रोग प्रतिकार शक्ती कमी असल्यामुळे अविवाहित लोकांमध्ये कोरोनाची लागण होण्याची अधिक शक्यता असते.  

एका सत्रात केवळ शंभर जणांनाच लस;केंद्राकडून लसीकरणाची तयारी सुरु​​

काही लोक विवाह का करत नाहीत?

'द नेचर' जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार, सारखे सारखे आजारी असल्यामुळे काहींच्या मानसिकतेवर परिणाम होतो. त्यामुळे आयुष्याच्या जोडीदाराबाबतचे त्यांचे आकर्षण कमी होते. विवाह आणि रिलेशनमध्ये रस नसण्यामागे हे एक कारण असू शकते.  

अविवाहितांना कोरोनाचा अधिक धोका
स्वीडन यूनिवर्सिटी ऑफ स्टॉकहोमच्या शास्त्रज्ज्ञांनी केलेल्या अभ्यासात कोरोनाची लागण झालेल्या आणि यामुळे मृत ओढावलेल्या लोकांच्या आर्थिक, सामाजिक,मानसिक आणि शारिरीक परिस्थितीसह जीवनाच्या अनेक पैलुंचा अभ्यास करुन काही निष्कर्ष काढण्यात आले आहेत. यातून अनेक गोष्टी समोर आल्या आहेत.  

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अशिक्षित आणि अल्प उत्पन्न गटातील लोकांनाही अधिक धोका

विवाहितांच्या तुलनेत अविवाहितांना कोरोनाची अधिक भीती आहे. याशिवाय कमी शिक्षण झालेल्या आणि उत्पन्न कमी असलेल्या लोकांनाही कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची अधिक शक्यता असते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हा रिसर्च संपूर्ण भारतातील लोकांना लागू होत नाही. कारण देशात शिक्षण आणि उत्पन्न आणि अविवाहित असलेल्या व्यक्तीला कुटुंबियांचे पाठबळ मिळते.  

Disclaimer: कोरोनासंदर्भातील सुरु असलेल्या वेगवेगळ्या रिसर्चमधून येणाऱ्या माहितीच्या आधारावर हा लेख लिहिलेला आहे. आरोग्यसंदर्भातील कोणत्याही समस्येसाठी कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.) 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harmanpreet Kaur : आम्ही करून दाखवलं, जेमिमाने तर...! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयानंतर काय म्हणाली कर्णधार हरमनप्रीत कौर?

Beed Crime : बीडमध्ये चाललंय काय? दारू सुटावी म्हणून व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केले अन् सकाळी झाला मृत्यू; अंगावर मारहाणीचे वळ

Panchang 31 October 2025: आजच्या दिवशी पांडुरंगाष्टक स्तोत्राचे पठण आणि ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा

Kolhapur Smshanbhoomi Viral Video : ग्रामपंचायतीच्या स्मशानभूमीत कन्नड संभाषण,'भूत बाटलीत बंद केलंय'; फोटो आणि व्हिडिओ पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Top 5 Countries: परदेशात शिक्षणाचं स्वप्न पूर्ण करा! हे आहेत 5 देश, जिथे भारतीय विद्यार्थी 30 लाखांच्या आत करू शकतात उच्च शिक्षण

SCROLL FOR NEXT