covid 19, covid 19 vaccine, serum institute, clinical trial  
health-fitness-wellness

Covid-19 : दोन वेगवेगळ्या लशींचे डोस घेतल्यास काय होतं?

दोन वेगवेगळ्या लशींचे डोस घेतले तर चालतं का?

शर्वरी जोशी

सर्वत्र हाहाकार माजवणाऱ्या कोरोना विषाणूवर अद्यापतरी कोणतंही ठोस औषध किंवा उपाय सापडलेला नाही. मात्र, या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बाजारात कोव्हिशिल्ड (covishield) आणि कोव्हॅक्सिन (covaxin) या दोन लशी उपलब्ध झाल्या आहेत. सध्या देशातील प्रत्येक नागरिकांचं लसीकरण करण्यात येत असून लशींचे दोन डोस घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्यातच दोन्ही डोस हे एकाच लशीचे घेणं आवश्यक आहे. मात्र, जर एक डोस कोव्हिशिल्डचा (covishield) आणि दुसरा कोव्हॅक्सिनचा (covaxin) घेतला तर चालेल का?असा नवा प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे. त्यामुळेच ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापकांनी याविषयी संशोधन केलं आहे. (covid 19 what happens when you take two shots of a different vaccine this was-revealed in research)

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापकांचा हा रिसर्च 'द लान्सेंट मेडिकल जर्नल'मध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. त्यानुसार, दोन वेगवेगळ्या लसींचे डोस घेतल्यास त्याचा काही काळ शरीरावर विपरित परिणाम होऊ शकतो. "ज्या नागरिकांना पहिला डोस एस्ट्रोजेनेकाचा व दुसरा डोस फायझर इंकचा दिला त्यांच्यामध्ये अन्य समस्या निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. परंतु, हा त्रास काही काळापूरता मर्यादित होतो."

"खरंतर हे फार पेचात पाडणारं संशोधन आहे आणि आपल्याला अपेक्षित आहे तेच समोर येईल असंदेखील यात नाही. लसीकरण हे विषाणूविरोधात लढणारं एक माध्यम आहे. त्यातून तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवली जाते. दोन वेगळे डोस दिल्यामुळे त्याचे काही काळ परिणाम जाणवतात. परंतु, हे तात्पुरत्या स्वरुपाचे असतात. दोन वेगळे डोस घेतल्यामुळे डोकेदुखी, शारीरिक थकवा या गोष्टी जाणवतात. दोन वेगळे डोस घेतलेल्या १० टक्के व्यक्तींमध्ये डोकेदुखीसारखी समस्या जाणवली. तुलनेने एकाच लसीचे दोन डोस घेतलेल्या ३ टक्के नागरिकांमध्ये ही समस्या जाणवली," असं ऑक्सफर्ड पीडियाट्रिक्स आणि वॅक्सिनोलॉजीचे प्राध्यापक मॅथ्यू स्नेप यांनी सांगितलं.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी परतूर (जि. जालना) अंतर्गत श्रीष्टी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात खांडवी येथील एका ७२ वर्षीय नागरिकाला लसीचा पहिला डोस ‘कोव्हॅक्सिन’ (covaxin dose) दिल्यानंतर दुसरा डोस ‘कोव्हिशिल्ड’चा (covishield) दिल्याचा प्रकार समोर आला होता. या नागरिकाला दुसऱ्या डोस दिल्यानंतर तीन दिवसांनी त्याची रिॲक्शन जाणवली. हाताला पुरळ, तीव्र ताप व अशक्तपणा जाणवत होता. त्यामुळे सर्वत्र भीतीचं वातावरण पसरलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut : कर्जाच्या पैशातून मोदींचा केक कापणार? वाढदिवस साजरा करणे म्हणजे आर्थिक गुन्हा, संजय राऊतांचे राज्य सरकारवर ताशेरे

Latest Marathi News Updates : कांद्याचे दर घसरले, शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन

जरा आवरा अन् Google Gemini ला स्वत:चे पर्सनल फोटो देण्यापूर्वी ही बातमी वाचा... नाहीतर वेळ निघून जाईल, तज्ज्ञांचा इशारा

कलाकार हवा तर असा ! दशावतारचं यश पाहून हिंदी मीडियाने केलं दिलीप प्रभावळकरांचं कौतुक "बॉलीवूडला लाज वाटायला.."

Rahuri Accident: 'दुचाकींच्या अपघातात एक ठार, एक जखमी'; दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर भीषण धडक

SCROLL FOR NEXT