Cow Milk
Cow Milk Sakal
health-fitness-wellness

गायीचं दूध प्यायल्याने कोरोनापासून बचाव शक्य, अभ्यासात स्पष्ट

सकाळ डिजिटल टीम

Cow Milk Helps To fight with Covid Infection: कोरोनाचे प्रमाण कमी झाले असले तरी प्रत्येकाने तब्येतीची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याचा सल्ला डॉक्टर देतात. दूध हे नेहमीच आरोग्यासाठी चांगले मानले जाते. तज्ज्ञांच्या मते, गायीचे दूध पिणे आरोग्यासाठी सर्वात फायद्याचे असते. यामुळे प्रतिकारशक्ती वाढते, हाडे मजबूत होतात. तसेच काम करण्याची क्षमता वाढते. महत्वाचे म्हणजे कोरोनापासून बचावासाठी ते फायद्याचे ठरते.

गाईचे दूध कोरोना संक्रमणापासून बचावासाठी मदतीचे ठरते, असे ताज्या अभ्यासात समोर आले आहे. डेली मेलमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठातील संशोधकांनी नुकत्याच केलेल्या अभ्यासात असे आढळून आले आहे की, गायीच्या दुधात असलेल्या प्रोटीनमध्ये व्हायरसला प्रतिबंध करणारे गुणधर्म असतात. हे प्रोटीन एखाद्या व्यक्तीच्या शरीरातला कोरोना संसर्गाचा प्रसार रोखू शकते. या अभ्यासाचे निष्कर्ष 'जर्नल ऑफ डेअरी सायन्स'मध्ये प्रसिद्ध झाले आहेत.

cow milk is good health

अभ्यासातील निष्कर्ष

बहुतेक सस्तन प्राण्यांच्या दुधात लॅक्टोफिरन नावाचे प्रथिन आढळते. गायीच्या दुधात बोवाइन लॅक्टोफेरिन नावाचे प्रोटीन आढळते, असे संशोधकांना अभ्यासादरम्यान आढळून आले. हे प्रोटीन सूक्ष्मजंतू, विषाणू आणि इतर रोगांशी लढण्यास सक्षम आहे. चाचणी दरम्यान, असे आढळून आले की, हे प्रथिन SARS-CoV-2 विषाणूचा लक्ष्य पेशींमध्ये प्रवेश करण्यापासून रोखते. तसेच पेशींना विषाणूविरूद्ध लढण्यास मदत करते.

अभ्यासक काय म्हणतात?

याबाबत युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगनमध्ये इंटरनल मेडिसिन डिपार्टमेंटचे चीफ इन्वेस्टिगेटर जोनाथन सेक्स्टन म्हणाले, मानवी क्लिनिकल चाचण्यांदरम्यान, बोवाइन लॅक्टोफेरिनने अँटीव्हायरल एक्टीव्हिटी दाखवली. उदाहरणार्थ, बोवाइन लॅक्टोफेरिन असलेली औषधे व्हायरल इन्फेक्शनची तीव्रता कमी करण्यास मदत करतात. यामध्ये रोटाव्हायरस आणि नोरोव्हायरसचा समावेश आहे.

बोवाइन लॅक्टोफेरिनचा व्यापक अँटीव्हायरल प्रभाव, सुरक्षितता, कमीत कमी दुष्परिणाम आणि व्यावसायिक उपलब्धता लक्षात घेता, SARS-CoV-2 संसर्गाच्या उपचारात किंवा काळजीमध्ये त्याचा वापर करण्यासाठी अनेक शोधनिबंधाद्वारे सांगितले गेले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

LSG vs MI IPL 2024 Live : मुंबईच्या गोलंदाजांनी केला टिच्चून मारा; लखनौचा निम्मा संघ गारद, सामन्यात रंगत

SCROLL FOR NEXT