Preparation for Exam Sakl
health-fitness-wellness

घडण-मंत्र : तयारी परीक्षेची...

शाळा आणि शिक्षण म्हटल्यावर परीक्षा आलीच. या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जी गोष्ट निश्चितपणे सामोरी येणार आहे, वारंवार येणार आहे त्याची चांगली तयारी केलेली बरी.

सकाळ वृत्तसेवा

शाळा आणि शिक्षण म्हटल्यावर परीक्षा आलीच. या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जी गोष्ट निश्चितपणे सामोरी येणार आहे, वारंवार येणार आहे त्याची चांगली तयारी केलेली बरी.

- डॉ. भूषण शुक्ल

शाळा आणि शिक्षण म्हटल्यावर परीक्षा आलीच. या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जी गोष्ट निश्चितपणे सामोरी येणार आहे, वारंवार येणार आहे त्याची चांगली तयारी केलेली बरी. स्व-इच्छा, कष्ट करण्याची तयारी आणि परीक्षेचे तंत्र या तीन कळीच्या गोष्टी आहेत, असे आपण मागील लेखात बघितले आणि त्यातले अडथळे तपासले. आता आपण ही तयारी लहानपणापासून कशी करायची आणि पालकांनी काय करायचे हे बघुया.

इच्छा - लहान मुलांना सर्व गोष्टी मोठ्यांबरोबर करायची हौस असते. अनेक मुलांनी मिळून गटात काम करायला त्यांना आवडते. याचा वापर करूनच, त्यांना उत्साह वाटेल अशा ‘प्ले-वे’ म्हणजे खेळकर पद्धतीने शाळेत सुरवातीला शिकवले जाते. हे घरी करून घेण्यासाठी त्यांना ‘रोल प्ले’ करू देणे आणि आपण विद्यार्थी किंवा मित्र म्हणून बसणे अशी सुरवात करता येते. हळूहळू, शेजारी बसून गृहपाठ करून घेणे किंवा उजळणी करून घेणे असेही करता येते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हे सर्व करताना आपला चेहरा हसरा असणे आणि हालचाली सहज खेळकर असणे महत्त्वाचे आहे. आवाजही सहज असेल, तर मुले उत्साहाने तयार होतात. रोज २०-३० मिनिटे अभ्यास करायची सवय अशी लावता येते. इच्छा आणि सहज सवय यांची अशी सांगड घातली तर पुढचा खूप त्रास वाचतो.

कष्ट - नवीन शिकताना अडथळे हे येणारच. पटकन न जमणारी गोष्ट समोर येणारच. काही मुले अशा अडथळ्यांना आनंदाने भिडतात, मदत घेतात पण चिकाटी सोडत नाहीत. खूपशी मुले मात्र थोडासाही अडथळा आला, की तो विषयच सोडून देतात. या कारणासाठी लहानपणी अभ्यास करताना कोणीतरी शेजारी असल्यास मदत होते. काही शंका वेळच्या वेळी सुटल्यास अभ्यासाचा प्रवास चालू राहतो आणि धीर वाढतो. अनेक पालक हे काम इंटरनेट किंवा शिकवणीच्या शिक्षकांवर सोडून देतात. निदान चौथीपर्यंतचा अभ्यास सर्व शिक्षित पालकांना सहज जमतो. त्यामुळे ही तीन चार वर्षे मुलांबरोबर जरूर बसावे. कामामुळे अगदीच शक्य नसल्यास रोज एकदा आढावा घ्यायला आणि मदत करायला वेळ ठेवावा. फक्त मदत ही पटकन असावी. त्या निमित्ताने सर्व मुळापासून उकरून काढणे किंवा तत्त्वज्ञान पाजळत बसणे टाळलेलेच बरे. एकट्याने कष्ट करणे कंटाळवाणे असते, त्यामुळे शक्य असल्यास मित्र-मंडळींना एकत्र अभ्यास करू द्यावा. एकत्र अभ्यास करणे ही सुपर पॉवर आहे.

तंत्र - दर वर्षीच्या अभ्यासात काही भाग हा पुढच्या शिक्षणात उपयोगी असतो. आणि काही भाग हा त्या वर्षापुरताच मर्यादित असतो. अभ्यासात खूप रस नसणाऱ्या मुलांना हे नीट ओळखून अभ्यास करायला शिकवता येते. अशा वेळेस शाळेतील अनुभवी शिक्षकांची खूप मदत होते. लहानपणी शिकायची आणि आयुष्यभर उपयोगी पडणारी गोष्ट म्हणजे विचारलेल्या प्रश्नांचा नेमका अर्थ समजणे. उत्तरे घोटून घेण्याच्या पद्धतीत हा महत्त्वाचा भाग राहून जातो. मग तोच प्रश्न वेगळ्या कपड्यात समोर आला की अनोळखी वाटतो. हाच प्रश्न कोणत्या वेगवेगळ्या स्वरूपात विचारता येतो, याची चर्चा गमतीदार असते. आणि गटामध्ये अभ्यास करताना याच्या शर्यती लावता येतात.

बहुपर्यायी प्रश्न स्पर्धापरीक्षांमुळे महत्त्वाचे झाले आहेत. त्यामध्ये या सवयीचा चांगला उपयोग होतो आणि अभ्यासाचा कंटाळा थोडा कमी होतो. शाळेतले अनुभवी शिक्षक या तंत्रांबद्दल खूप चांगली माहिती देतात. पालक-शिक्षक चर्चांमध्ये शिक्षकांशी बोलायचे खरे विषय आहेत. अशा उपयोगी गोष्टींची चर्चा होण्याऐवजी माझे मूल नीट डबाच संपवत नाही, मोबाईलवर खेळत बसते, त्याला समजावून सांगा अशा गोष्टीत पालकसभेचा वेळ घालवतात, अशी शिक्षकांची तक्रार असते.

प्रत्यक्ष परीक्षा समोर आल्यावर अनेक मुले घाबरून जातात आणि अजून चुका करतात. परीक्षेची भीती सुरवातीपासूनच कमी राहण्यासाठी काय करायचे हे पुढच्या लेखात बघूया.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur : शेतकऱ्यानं म्हशी घ्यायला ७ लाख साठवले, सहावीत शिकणाऱ्या लेकानं गेमवर ५ लाख उडवले; बँक स्टेटमेंट बघून बसला धक्का

Latest Maharashtra News Updates : मुंबईत वाहतूक ठप्प! मोनो रेल सेवा बंद, मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाडाने प्रवाशांचे हाल

Viral Video : सुनेची आईसोबत मिळून सासुला बेदम मारहाण; झिंज्या पकडल्या, उचलून आपटलं अन्... व्हिडिओ व्हायरल

CA Result Success Story: अभ्यासातील सातत्य, जिद्दीच्या बळावर साकारले स्वप्न; राजनवर कौतुकाचा वर्षाव; सीए परीक्षेत ६०० पैकी मिळविले ५१६ गुण

Oneplus Nord CE 5 : वनप्लस Nord CE 5 लवकरच होणार लॉन्च; 7100mAh दमदार बॅटरी, आकर्षक फीचर्स अन् किंमत फक्त..

SCROLL FOR NEXT