drinking water importance information 
health-fitness-wellness

तुम्हाला सतत तहान लागते का ...? मग वाचाच

सकाळ वृत्तसेवा

पाण्याला जीवन मानले जाते. पाण्याशिवाय जगणे अशक्य आहे. माणासाला जगण्यासाठी पाण्याची गरज असते. शरीराला नेहमी पुरेशा पाण्याची आवश्यकता असते. अनेकदा काही कारणांमुळे सतत तहान लागत असेल तर या मागची कारणे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते. दररोज दिवसाला ३ लीटर पाणी पिणे गरजेचे असते. यामुळे शरीर हायड्रेट राहते. मात्र अनेकदा भरपूर पाणी पिऊनही तुम्हाला सतत तहान असल्यासारखे वाटते का? याचे उत्तर हो असेल तर या मागचे कारण जाणून घेणे महत्त्वाचे आहे. तुम्ही कितीही पाणी प्यायलात तरी तुम्हाला सतत तहान लागत असेल तर जाणून घ्या यामागची कारणे...

सतत तहान का लागते ?

तुम्ही उन्हात जर जास्त वेळ असाल तर तुम्हाला सतत तहान लागू शकते. जरी तुम्ही उन्हात काही काम करत नसलात तरी शरीरातून पाणी घामाच्या रूपात बाहेर निघते. त्यामुळे शरीराला सतत हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. आणि अतीच गरज असेल तरच उन्हाचे घराबाहेर पडा. जर तुम्ही औषधे घेत असाल तर तुमचे तोंड कोरडे होऊ शकते आणि या कारणामुळे तुम्हाला सतत तहान लागू शकते. त्यामुळे तुम्हाला जर ही समस्या जाणवत असेल तर याबाबत डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.

एवढे वापरा जेवणात मीठ

 तुम्ही जर जेवणात मिठाचा वापर अधिक करत असाल तर तुम्हाला सतत तहान लागू शकते. कारण मीठ पेशींमधील पाणी खेचून घेते. त्यामुळे पेशी मेंदूला तहान असल्याचा मेसेज पाठवतात आणि तुम्हाला तहान लागते. दररोज दिवसाला ५ ग्रॅमपेक्षा जास्त मीठ खाऊ नये. तसेच मीठाच्या अतिसेवनाने आरोग्याचेही नुकसान होते. शक्यतो कमी मिठाचा अन्नामध्ये वापर करावा. तुम्हाला सतत तहान लागत असेल अथवा सतत लघवी होत असेल तर हे डायबिटीजचे लक्षण असू शकते. त्यामुळे तुमच्यामध्येही हे संकेत दिसत असतील तर डायबिटीजची टेस्ट जरूर करून घ्या.तश्याप्रकारे वेळोवेळी पथ्य हि पाळावी लागतील. 

यामुळे शरीराला लागते पाण्याची गरज 

तुमचे तोंड जर कोरडे असेल तर तुम्हाला सतत तहान लागू शकते. जीभेच्या लाळग्रंथी हवी तितकी लाळ निर्माण करत नसल्याने तोंड सतत कोरडे जाणवते. यामुळे सतत तहान लागू शकते. सकाळच्या वेळेस धावत असाल तर तुमच्या शरीराला अधिक पाण्याची गरज असते. कारण धावताना शरीरातून अधिकाधिक घाम गाळला जातो त्यामुळे शरीराला पाण्याची गरज असते. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 News: शशांक सिंगने दोन सोपे झेल टाकले; अर्शदीप भडकला, पाँटिंग तापला... श्रेयस अय्यरने काय केले ते पाहा Video Viral

तन्वी कोलते ठरली 'Bigg Boss Marathi 6' ची महाविजेती, राकेशचं स्वप्न राहिलं अपूरं

IPL 2026 Point Table: अपराजित पंजाब किंग्स! अव्वल स्थानावरील पकड मजबूत; लखनौ सुपर जायंट्सची अवस्था काय? पाहा गुणतालिका

US-Iran War: डील करा नाहीतर...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अल्टिमेटम, संघर्षात निर्णायक टप्पा जवळ?

Akshaya Tritiya Gold Price : अक्षय तृतीयेला सोन्याच्या भावाने गाठला उच्चांक, खरेदीही मोठ्या उत्साहात; २०,००० कोटींच्या विक्रीचा अंदाज

SCROLL FOR NEXT