गुळ esakal
health-fitness-wellness

गुळासोबत 'या' गोष्टी खा आणि आजारांपासून दूर राहा.

सकाळ डिजिटल टीम

हिवाळ्यात (WINTER) गुळ (JAGGERY) खाणे शरीरासाठी खूप फायदेशीर मानले जाते. पोषणतज्ज्ञ हिवाळ्यात गुळ खाण्याचे अनेक फायदे सांगतात. हे सुपरफूड (SUPERFOOD) केवळ चयापचय आणि प्रजनन क्षमता सुधारत नाही, तर हाडे मजबूत देखील करते. साखरेमुळे लोकांच्या आरोग्याला हानी पोहोचते, त्यामुळे गूळ साखरेला उत्तम पर्याय ठरू शकतो. यामध्ये व्हिटॅमिन-बी, कॅल्शियम, जस्त, तांबे आणि फॉस्फरस यांसारखी अनेक मिनसल्स आढळतात. त्यामुळे गुळ शरीरासाठी हितकारक ठरतो. परंतु जर गुळामध्ये काही खास गोष्टी मिसळल्या तर गुळाचे फायदे दुप्पट होतात.

गुळासोबत तूप- शुद्ध तुपासोबत गुळाचे सेवन केल्याने बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळतो. जेवणानंतर एक चमचा गूळ आणि तूप खाल्ल्याने आपली पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.

गुळासोबत धने- पोषणतज्ञांच्या मते, धन्यासोबत गुळ खाल्ल्याने मासिक पाळीवेळी होणारा रक्तस्त्राव कमी होतो आणि वेदनांमध्ये आराम मिळतो. याशिवाय गुळ आणि धने यांचे मिश्रण मासिक पाळी सुरू करण्यासाठी उपयुक्त आहे. पीसीओडीमध्ये (PCOD) महिलांसाठी देखील हे मिश्रण चांगले मानले जाते.

गुळासोबत बडीशेप- ज्यांच्या तोंडाला दुर्गंधी येते त्यांच्यासाठी गुळ आणि बडीशेप यांचे मिश्रण खूप चांगले ठरू शकते. हे मिश्रण आपल्या तोंडाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

गुळ आणि मेथीचे दाणे- मेथीचे दाणे गुळासोबत खाणे केसांच्या आरोग्यासाठी खूप चांगले असते. यामुळे आपले केस मजबूत आणि चमकदार होतात तसेच केस अकाली पांढरे होण्यापासून वाचतात.

गुळ आणि डिंक- गुळ आणि डिंक यांचे मिश्रण स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी चांगले मानले जाते. हे स्त्रियांमध्ये लेक्टेशन एजंटच्या रुपात मदत करते. एवढेच नाही तर गुळ आणि डिंकाचे सेवन केल्याने आपली हाडे मजबूत होतात.

गुळ आणि अळीवाच्या बिया- गुळ आणि अळीवाच्या बियांचे मिश्रण शरीरात फॉलिक अॅसिड आणि लोह शोषण्यास मदत करते. याचे नियमित सेवन केल्याने केसांची वाढही होते.

गुळासोबत तीळ- गुळासोबत तिळाचे सेवन केल्याने सर्दी, खोकला आणि फ्लूसारख्या समस्यांपासून बचाव होतो.

गुळसोबत शेंगदाणे- भुईमूग आणि गुळाचे मिश्रण केवळ चवीलाच चांगल असतं असं नाही, तर ते ताकदही वाढवतं. भूक शांत ठेवण्यासाठी देखील ते खूप प्रभावी आहे.

गुळासोबत हळद- गुळासोबत हळद खाल्ल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. एवढेच नाही तर हे मिश्रण हिवाळ्यात आजारांपासून वाचवण्याचे काम करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT