मिरगी मिरगी
health-fitness-wellness

औषधोपचार, शस्त्रक्रियेद्वारे मिरगीवर नियंत्रण मिळविणे शक्य

लहानपणापासून मिरगीचा विकार असेल तर व्यक्तिमत्त्व विकासात अडथळा निर्माण होऊ शकतो

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : मिरगी (Epilepsy) विकाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांच्या जीवनाची गुणवत्ता खालावते. लहानपणापासून मिरगीचा विकार असेल तर व्यक्तिमत्त्व विकासात अडथळा (Obstacles to personality development) निर्माण होऊ शकतो. रोजची कामे करण्यातही अडथळे येतात. अशा रुग्णांना आयुष्यभर मिरगीच्या औषधांवर जीवनमान व्यतीत करावे लागू शकते. जनसामान्यांना मिरगी हा आजही असाध्य आजार वाटतो. मात्र, मिरगी या विकारावर मात्र आता आधुनिक निदान पद्धती व औषधोपचार (Medication) आणि शस्त्रक्रियेने (Surgery) पूर्ण मात करणे शक्य असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

मिरगी या विकारावर शस्त्रक्रियेने मात करता येते, याबद्दल समाजात फारशी जागृती नाही. २०१६-१७ च्या आकडेवारीनुसार भारतात जवळपास ५० लाख मिरगीचे रुग्ण असू शकतात. त्यापैकी ५ लाख रुग्ण औषधोपचार घेत आहेत. त्यापैकी दोन लाख रुग्ण शस्त्रक्रियेसाठी पात्र आहेत. मात्र, दरवर्षी केवळ २ ते ३ हजार मिरगी संबंधित शस्त्रक्रियाच होतात. याबाबत जनजागृती करणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञ सांगतात. मिरगी दोन प्रकारची (Two types of epilepsy) असते.

पहिली म्हणजे फोकल अर्थात शरीराच्या एखाद्या अंगाला मिरगी येणे, दुसरी म्हणजे जनरलाईज म्हणजेच पूर्ण अंगाला मिरगी येऊन शुद्ध हरपणे; दोन्हीची कारणे भिन्न असतात. औषधे घेऊनही मिरगीवर नियंत्रण मिळत नाही किंवा ज्यांना औषधांचे दुष्परिणाम होत आहे, अशा रुग्णांच्या मिरगीच्या विकाराला मेडिकली रिफ्रॅटरी एपीलेप्सी असे म्हणतात.

या रुग्णांचे व्यवस्थित निदान करून शस्त्रक्रिया केली जाऊ शकते. शस्त्रक्रियेद्वारे फोकल एपिलेप्सी पूर्णपणे बरी होऊ शकते आणि औषधेही कालांतराने बंद केली जाऊ शकतात. परंतु, जनरलाईज एपिलेप्सीमध्ये शस्त्रक्रियेने मिरगीची तीव्रता वा वारंवारता कमी करता येऊ शकते. या आजाराला फिट, आकडी किंवा अपस्मार म्हणूनसुद्धा ओळखले जाते. अचानक शुद्ध हरपणे, फार थोड्या वेळेसाठी अपंगत्व येणे किंवा काही कारण नसताना शरीराचा, हात-पायाचा थरकाप उडणे ही नेहमी दिसणारी याची सामान्य लक्षणे आहेत.

लहानपणी त्वरित निदान करून मिरगीवरील शस्त्रक्रिया केल्यास मेंदूच्या वाढीस मदत होते व पुढे जाऊन अडचणी कमी होतात. औषधांवरील अवलंबित्व आणि पर्यायाने दुष्परिणाम कमी होतात. त्यामुळे पुढे शाळेत नियमित जाणे, पुढे रोजगार मिळवणेही शक्य होऊ शकते.
- डॉ. अक्षय पाटील, न्यूरोसर्जन, नागपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सूर्याची सुट्टी! कर्णधारपद अन् संघातली जागाही जाणार, टी२०चा 'नवा बॉस' कोण?

OBC कार्ड खेळत काँग्रेसचा मास्टरस्ट्रोक! बी. के. हरिप्रसाद बनले कर्नाटक काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष; डी. के. शिवकुमारांची जागा घेणार, सतीश जारकीहोळींचा पत्ता कट!

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील विविध घडामोडी वाचा एका क्लिकवर!

T20 Mumbai Women's league मध्ये फाल्कन्सच्या विजयात भारतीय स्टार सायली सातघरे अन् १४ वर्षीय स्वरा जाधव चमकली

Burning ST Bus : चांदवडजवळ ‘बर्निंग बस’चा थरार! चालक-वाहकांच्या प्रसंगावधानामुळे ५४ प्रवाशांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT