health-fitness-wellness

Fact Check: घरगुती उपचारांमुळे कोरोना बरा होतो? सत्य आलं समोर

काही वेळा घरगुती उपायदेखील ठरु शकतात घातक

शर्वरी जोशी

दीड वर्षापूर्वी देशात शिरकाव केलेल्या कोरोना विषाणूची (Coronavirus) दुसरी लाट आता हळूहळू ओसरत आहे. मात्र, या विषाणूचा प्रादुर्भाव जरी कमी झाला असला तरी हे संकट पूर्णपणे टळलेलं नाही. त्यामुळेच प्रशासन लसीकरणावर मोठ्या प्रमाणावर भर देत आहे. सोबतच नागरिकांना स्वत:ची व कुटुंबाची काळजी घेण्याचा सल्ला देत आहे. त्यातच सोशल मीडियावर कोरोना बरा करण्याचे अनेक घरगुती उपाय व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे अनेक जण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय थेट हे उपाय करत आहेत. मात्र, प्रत्येकवेळी करण्यात येणारा घरगुती उपाय फायदेशीर ठरेलच असं नाही. त्यामुळेच पीआयबी फॅक्ट चेकने (PIB Fact Check) व्हायरल होणाऱ्या या दाव्यांमागील सत्य समोर आणलं आहे. (fact-check-can-home-remedies-cure-covid-19-many-of-the-viral-solutions-turned-out-to-be-false)

चहा प्यायल्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखता येऊ शकतो असा दावा सोशल मीडियावर करण्यात आला आहे. परंतु, पीआयबीने यामागील सत्य समोर आणलं आहे. व्हायरल होत असलेला दावा पूर्णत: खोटा आहे. चहा प्यायल्याने कोविडचा संसर्ग कमी होईल असे कोणतेही शास्त्रीय पुरावे नाहीत.

तसंच विड्याच्या पानामुळेही कोरोना होत नाही असं सांगण्यात येत आहे. मात्र, हा दावादेखील पीआयबीने फेटाळून लावला आहे. विड्याच्या पानामुळे कोरोना बरा होईल यासाठीदेखील कोणताही वैज्ञानिक आधार नाही, हे पीआयबीने स्पष्ट केलं आहे.

पीआयबीने ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर करत घरगुती उपायांविषयी करण्यात आलेले दावे खोटे असल्याचं स्पष्ट केलं आहे. तसंच, "कोरोनावर कोणतेही उपचार करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. तसंच बऱ्याचदा घरगुती उपाय फायदेशीर ठरण्याऐवजी घातकही ठरु शकतात", असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.दरम्यान, मध्यंतरी सोशल मीडियावर कोरोनावरील अनेक घरगुती उपाय व्हायरल झाले होते. विशेष म्हणजे अनेक जण या व्हायरल मेसेजची सत्यता न पडताळाता केवळ घरगुती उपाय म्हणून हे उपचार करत होते.

दरम्यान, मध्यंतरी सोशल मीडियावर कोरोनावरील अनेक घरगुती उपाय व्हायरल झाले होते. विशेष म्हणजे अनेक जण या व्हायरल मेसेजची सत्यता न पडताळाता केवळ घरगुती उपाय म्हणून हे उपचार करत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: जरांगेंचं उपोषण सुरु असताना नाशिकमध्ये मराठा समन्वयकांची पत्रकार परिषद; SEBC आरक्षणावर ठाम!

करोडपती सासऱ्याने असं काय केलं की ३० वर्षीय सुनेनं थेट रचला कट, ६ लाखांची सुपारी देत संपवलं; धक्कादायक माहिती उघड

Nagara Road Accident : कामाच्या शोधात निघालेल्या मजुरांवर काळाचा घाला! गोंदिया-बालाघाट मार्गावर ट्रक-पीकअपच्या धडकेत 6 जण ठार, 3 वर्षीय बालकाचाही समावेश; 7 गंभीर

Marathi News Live Updates : काल केसनंद, आज खराडी... ऐश्वर्या जाधव यांच्या लावणी कार्यक्रमाला पुन्हा परवानगी नाकारली!

२८ चेंडूंत १३६ धावा! Mumbai Indians च्या फलंदाजाची हवा; १७३ धावांच्या वादळी खेळीने वेधले जगाचे लक्ष, IPL 2027 गाजवण्यासाठी सज्ज

SCROLL FOR NEXT