तुम्ही व्यायामाचा प्रवास सुरू करत असल्यास या पाच टिप्स नक्की वाचा...
१) व्यायामाच्या नियमिततेचे दोन महत्त्वाचे भाग म्हणजे ‘वॉर्म-अप’ आणि ‘कूल डाउन’. चांगला ‘वॉर्म-अप’ शरीराला व्यायामासाठी तयार करतो. त्यामुळे आपल्याला दुखापतींशिवाय व्यायाम करता येतो. ‘कूल डाउन’ स्नायूंना आराम देण्यास मदत करतो आणि वर्कआउटनंतर स्नायूंच्या तीव्र वेदना टाळण्यास मदत करतो. चांगले ‘वॉर्म-अप’ आणि ‘कूल डाउन’ कसे करावे, हे शिकणे आवश्यक आहे.
२) बिगिनर्सनी व्यायामाच्या गतीवर लक्ष केंद्रित करण्यापूर्वी तो शिकण्याकडे लक्ष द्यावे. व्यायाम ‘शिकणे’ याचा अर्थ चांगला फॉर्म जमेपर्यंत लक्ष केंद्रित करणे आणि त्यासह व्यायामाची पुनरावृत्ती करणे.
३) आपल्या रोजच्या जेवणात सामान्यतः प्रोटिन्स, फॅट्स आणि कार्बोहायड्रेट्स असतात. मात्र, शरीराचे कार्य चांगल्या प्रकारे सुरू ठेवण्यासाठी प्रत्येक मिक्रोनिट्रिएंट्सची निश्चित कार्ये असतात. त्याचे प्रमाण तुमच्या ॲक्टिव्हिटी लेव्हलवर अवलंबून असते. म्हणूनच पौष्टिक आहार महत्त्वाचा आहे. बिगिनर्सनी अंडी, पनीर, चिकन, सी फूड प्रत्येक जेवणात अंतर्भूत करावेत.
४) ‘अनुशासन’ ही आपल्या यशाची गुरुकिल्ली आहे. चांगल्या सवयींचं महत्त्व सर्वांना माहीत आहे. परंतु, आपल्या शरीरास नवीन सवय लावण्यास थोडा वेळ लागतो. म्हणूनच आपल्या शरीरास रोज व्यायाम करण्याची सवय लावण्यास वेळ द्या. तुम्ही हे करण्यास सक्षम झाल्यावरच तुमचे शरीर साथ देईल. अधीर होऊ नका.
५) हे सर्व साध्या करण्यासाठी ‘नियोजन’ महत्त्वाचे आहे. रोज सकाळी उठल्यावर आज आपण काय खाणार आहोत आणि कोणता व्यायाम करणार आहोत, याचाच विचार केल्यास ‘अनुशासन’ पाळणे अवघड होईल. त्यामुळे निवडलेले व्यायाम कदाचित फायद्याचे ठरणार नाहीत, योग्य परिणाम दाखवू शकणार नाहीत. आपण चांगली योजना आखण्यात अपयशी ठरल्यास आपली योजना आपल्याला अपयशी ठरवते, असे म्हणतात. त्यामुळे बिगिनर्सची फिटनेस रूटीन सुरू करण्यासाठीची योजना असणे आवश्यक आहे. त्यातूनच यश लवकरच मिळेल.
लॉकडाउन दरम्यान व्यायामास सुरू करणाऱ्यांसाठी या पाच टिप्स आहेत. तुम्ही फिटनेसच्या या प्रवासाचा आनंद घ्याल आणि त्यासाठी मित्र, कुटुंबीय व प्रशिकांचा सल्ला घ्या. यशस्वी व्हा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.