five vitamins help to cure skin nagpur news 
health-fitness-wellness

सुंदर, मुलायम अन् तजेलदार त्वचा हवीय? मग आहारात 'या' जीवनसत्वांचा आजच करा समावेश

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : जीवनसत्व हे आपल्या त्वचेसाठी महत्वाचं काम करतात. त्वचेवरील काळे डाग, लालसरपणा, सुरकुत्या, पिंपल्स, कोरडेपणा सर्वांवरील रामबाण उपाय म्हणजे जीवनसत्व. या जीवनसत्वांनी भरलेल्या अनेक क्रिम्स बाजारात उपलब्ध आहेत. मात्र, तुम्ही फक्त पाच जीवनसत्व असलेल्या खाद्यपदार्थांचे सेवन केले, तर तुम्हाला कुठल्याही बाह्य सप्लीमेंटची गरज पडणार नाही. तुमची त्वचा अधिक सुंदर दिसायला लागेल. आज याच जीवनसत्वांबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

जीवनसत्व अ -
जीवनसत्व अ हे गाजर, कंदमुळे, पालक, अंडी, मासे यामध्ये असते आणि त्यामुळे त्वचेला अधिक प्रमाणात पोषण मिळत असते. हे पोषक तत्व रिसेप्टर्सला कोशिकामध्ये बांधून एपिडर्मिस आणि कोलेजनच्या काम करण्यास लढत असते. त्यामुळे सुरकुत्या, पिंपल्स कमी करून त्वचा तजेलदार दिसते.

जीवनसत्व ब३ -
जीवनसत्व बी-३ हे तुमच्या त्वचेला पोषक तत्व देतात. यामध्ये जीर्ण डिएनचा विकास करणे आणि सूर्याच्या किराणांपासून बचाव करण्यास मदत करतात. हे जीवनसत्व आत आणि बाहेर अशा दोन्ही प्रकारच्या तणावासोबत लढत असते. त्यामुळे त्वचा अधिक सुंदर दिसण्यास किंवा त्वचा खराब होण्यामध्ये या जीवनसत्वाचा समावेश असतो. या जीवनसत्वाचे सेवन केल्यास सुरकुत्याचे प्रमाण कमी होती. मांस, मासे, दूध, अंडी, हिरव्या पालेभाज्या, बीन्स यांसारख्या पदार्थांचा समावेश करा.

जीवनसत्व ई -
जीवसत्व ई हे अँटीऑक्सीडंट्सचा चांगला स्त्रोत आहे. हे जीवनसत्व सूर्यापासून निघणाऱ्या किरणांपासून त्वचेचे संरक्षण करते. यामध्ये अँटी-इंफ्लामेंटरी आणि एंटीऑक्सीडेंटचे गुण असतात. त्यामुळे त्वचा अधिक कोमल आणि हेल्दी बनवण्यास मदत होते. पालक, बदाम, शेंगदाणे, कोहळे, आंबा आदी पदार्थ तुम्ही खाऊ शकतात. 

जीवनसत्व क -
जीवनसत्व क पिंपल्स, हायपरपिंग्मेंटेशन, डार्क स्पॉट्स आणि फाइन लाइन्स याच्या उपचारावर वापरले जाते. या जीवनसत्वामुळे कोलेजनचे प्रमाण वाढे हे प्रोटीन फायबर आपली त्वचा मजबूत बनवतात. तसेच हे पिग्मेंटेशनच्या स्पॉटला भकून त्वचा अधिक सुंदर बनवण्यास मदत करतात. आंबट फळे जसे की संत्री आणि लिंबू, ब्रोकोली, फूलकोबी, स्प्राऊट्स आणि शिमला मिरची हे जीवनसत्व असतात.

जीवनसत्व के -
जीवनसत्व के रक्तांमध्ये गुठळ्या होण्यापासून बचाव करते. तसेच घाव लवकर भरण्यास मदत होते. इतकेच नाहीतर त्वचेवर असणाऱ्या स्ट्रेच मार्क्स, स्पाइडर वेन्स, काळे डाग, डार्क सर्कल्स आदींवर रामबाण उपाय म्हणजे जीवनसत्व के. केळी, पालक, कोबी, हिरव्या बीन्स यामध्ये जीवनसत्व के असते. 

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sachin Yadav: नीरजलाही मागे टाकणारा कोण आहे सचिन यादव? पोलिस भरतीनंतर भालाफेक सोडण्याचा केलेला विचार, पण...

Mamata Banerjee: ८४० कैदी तुरुंगातून मुक्त! विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांचा निर्णय, नेमकं कारण काय?

Latest Maharashtra News Updates : पुण्यात मुसळधार पाऊस; बाणेर-औंध रस्ता वाहतुकीसाठी अजूनही ठप्प

Malkapur Accident : भरधाव मारुती इको कारची समोर चालणाऱ्या ट्रेलरला पाठीमागून जोरदार धडक; ५ जणांचा मृत्यू , ४ जण गंभीर जखमी

Chikhali Accident : शिक्षक आमदाराच्या गाडीने तरुणास उडविले; तरुण गंभीर जखमी होऊन सध्या कोमात

SCROLL FOR NEXT