Throat Infecction  esakal
health-fitness-wellness

घसा खवखवतोय, तीन घरगुती उपायांनी त्रास होईल कमी

थंडी वाढल्याने सध्या अनेकांना हा त्रास होत आहे.

सकाळ डिजिटल टीम

सध्या खूप थंडी आहे. त्यामुळे लोकांना सर्दी-खोकला- ताप अशी लक्षणं मोठ्या प्रमाणावर दिसत आहेत. अनेक लोकांचा घसा खवखवतोय(Throat Infecction). त्यामुळे अनेकांच्या आरोग्यावर (Health) त्याचा परिणाम होत असून लोकं आजारी पडण्याचं प्रमाण वाढत आहे. जास्त थंडी आणि आंबट पदार्थ खाल्याने तुमचा घसा खवखवू (Sore Throat) शकतो. घश्यात होणारी खवखव व्हायरसमुळे होऊ शकते. पण काही वेळा जंतूही त्यासाठी कारणीभूत असू शकतात. स्ट्रेप्टोकोकस बॅक्टेरियामुळे घश्यात होणारी खवखव जास्त त्रासदायक असते. अशावेळी तीन घरगुती उपाय करून तुम्ही ही खवखव कमी करू शकता.

हळद

हळदीचा चहा

जर घसा खवखवत असेल तर हळद घातलेला चहा प्यायल्याने आराम मिळेल. हळद घश्यातील जळजळ कमी करण्यासाठी मदत करेल. तसेच घशातील खवखव, सूज येणे आणि सर्दी खोकल्याचं प्रमाण कमी करण्यास मदत करेल.

तुळशीचा काढा

आयुर्वेदात तुळस गुणकारी मानली जाते. तुळशीचा चहा किंवा काढा प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. त्यामुळे व्हायरल संक्रमण दूर होऊन सर्दी खोकला आणि घसा खवखवण्यापासून आराम मिळेल.

मध

मध

थंडीत गरम चहा पिणे सर्वांना आवडतेच. पण घसा खवखवत असल्यास तुम्ही चहात मध घालून तो पिऊ शकता. मधात असलेल्या पोषक तत्त्वांमुळे तुम्ही व्हायरलपासून वाचता शिवाय खवखव कमी होण्यास मदत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संकटात धावून आला ‘लालबागचा राजा’! भुलेश्वरचा राजा मंडळाला ११ लाख, तर मृतांच्या कुटुंबीयांनासाठीही आर्थिक मदत जाहीर

IND vs SL 2nd Test: यशस्वी जैस्वाल-असिथा फर्नांडो वादाचा नवा खळबळजनक Video समोर! ICC वर गंभीर आरोप... नेमकी 'ढुशी' मारली कोणी?

प्राजक्ता माळीला 'फरसाण'वरून का चिडवलं जातं? अभिनेत्याने सांगितला हास्यजत्रेच्या सेटवरचा मजेशीर किस्सा

Marathi News Live Updates : आंदोलक विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली

leopard spotted in Satave Kolhapur : आरळे-शहापूर रस्त्यावर दोन बछड्यांसह बिबट्याचा वावर; तरुणांनी कॅमेऱ्यात कैद केला थरारक व्हिडिओ

SCROLL FOR NEXT