four types of exercise use of women for weight loss in kolhapur 
health-fitness-wellness

सकाळी लवकर न उठता, स्वत:ला फीट ठेवायचं आहे? मग चार योगाचे प्रकार करा

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : सकाळच्या दरम्यान व्यायाम करणे ही फक्त तुम्हाला फीट ठेवत असे नाही तर तुमचं वजन ही कमी होऊ करण्यास आणि दिवसभर तुमच्या शरीरात एनर्जी ठेवण्यासोबतच तुमचा मूडही दिवसभर चांगला राहतो. आणि रात्री झोप चांगली येते. याऐवजी तुमचा मेटाबॉल्जिअम उत्तम राहतो आणि पचन क्रिया दुरुस्त राहते. परंतु अधिक महिला सकाळी उठून अंथरूण सोडणे अजिबात पसंत करत नाहीत. तर यावेळी काय करावे हा प्रश्न उपस्थित होतो. जेव्हा आपण बाहेर वर्काऊटला जाण्यासंदर्भात विचार करत असतो परंतु कंटाळ्याअभावी आपण ते टाळतो. परंतु तुम्ही घरीच हलकेफुलके काही प्रभावी एक्सरसाइज किंवा योगा करू शकता. ज्यामुळे तुम्ही तुमचे वजन कमी करु शकता किंवा फीट राहू शकता. तरी अशा महत्वाच्या चार एक्सरसाइजच्या प्रकारांबद्दल आपण माहिती घेणार आहोत...

ग्लूट ब्रिज

  • यासाठी पाठीवर झोपा.
  • तुमचे हात शरीराच्या दोन्ही बाजूला ठेवा.
  • कंमरेचा भाग वरती उचलण्याचा प्रयत्न करा.
  • याच पोझमध्ये काही काळ रहा.
  • यामध्ये तुम्ही तुमचा एक पाय वरती उचलू शकता.

साइड लाइंग लेग रेज

  • उजव्या कुशीवर झोपा.
  • डावा पाय वरती उचलण्याचा प्रयत्न करा.
  • हळू हळू पुन्हा आधीच्या पोझिशनमध्ये या.
  • किमान दहा वेळा अशी कृती करा.
  • दुसऱ्या कुशीवर होऊन असाच व्यायाम करा.
  • साइड फॅट कमी करण्यासाठी याची मदत होते.

कोब्रा पोज

  • हा व्यायाम करण्यासाठी पोटावर झोपा.
  • आता दोन्ही हातांच्या सहाय्यानं सुर्य नमस्कार करताना जशी डोके, छाती वरती उचलतो तशी उचला.
  • शरीर स्थिर ठेवा आणि चेहरा वरच्या दिशेने ठेवा.
  • काही काळ याच पोझमद्ये रहा आणि पुन्हा आधीच्या स्थितीत या.

लोक्सट पोज

  • सर्वात आधी पोटावर झोपा.
  • हात पुढे ठेवा.
  • श्वास घेऊन दोन्ही पाय जितके उचलता येतील तितके वर घ्या.
  • तसंच हात थोडे पुढे स्ट्रेच करा.
  • श्वास हळू हळू सोडत पाय आणि हात खाली घ्या.
  • हा व्यायाम तुम्ही 3 ते 5 वेळा करा.

हे सर्व व्यायाम तुम्ही अंथरुणावर करून स्वत:ला फिट ठेवू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

माेठी बातमी! 'महाबळेश्वर तालुक्यातील छमछमवर पाेलिसांचा छापा; सहा जणांवर गुन्हा; बंगल्यावरील धक्कादायक प्रकार उघडकीस..

Ramraje Naik-Nimbalkar: नार्को चाचणी त्यांची त्यांनीच करावी: रामराजे नाईक-निंबाळकर; एकाही घटनेच्या मागे मी आहे, सिद्ध करून दाखवा

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरे आजपासून मराठवाडा दौऱ्यावर, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या गावांना देणार भेटी

तुम्हाला अतिवृष्टीची भरपाई मिळाली नाही का? शेतकऱ्यांनी ‘येथे’ तातडीने काढावा फार्मर आयडी; सोलापूर जिल्ह्यातील ४.९० लाख शेतकऱ्यांना ४९८ कोटींची भरपाई अजूनही मिळाली नाही

७ नोव्हेंबरपासून मुंबईला दररोज विमान! डिसेंबरमध्ये गोव्यालाही सोलापुरातून दररोज विमान; गृह विभागाकडून मिळेना पोलिसांचे मनुष्यबळ, पोलिस ठाण्याचाही प्रस्ताव धुळखात

SCROLL FOR NEXT