Pregnant Women HIV esakal
health-fitness-wellness

Pregnant Women : गर्भवती महिलांसाठी महत्वाची बातमी! पहिल्या तिमाहीत HIV तपासणी करण्याचे निर्देश

गर्भवती मातांची पहिल्या तिमाहीतच एचआयव्ही तपासणी करणे आवश्यक आहे.

सकाळ डिजिटल टीम

जिल्ह्यात सध्या १० हजार ५९४ रुग्ण असून हे रुग्ण सांगली, मिरज, उपजिल्हा रुग्णालय इस्लामपूर व भारती हॉस्पिटल येथे उपचार घेत आहेत.

सांगली : गर्भवती मातांची पहिल्या तिमाहीतच एचआयव्ही तपासणी करणे आवश्यक आहे. यासाठी आरोग्य विभागाने सुयोग्य नियोजन करून तपासणीबाबत आवश्यक खबरदारी व दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिले.

जिल्हा एड्स (Aids) प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रम समितीची सभा जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. मिलिंद पोरे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. जोशी, जिल्हा एड्स नियंत्रण कक्षाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी विवेक सावंत उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाले, "एचआयव्ही बाधितांना विमा योजना, आयुष्यमान भारत, कौशल्य विकास यांसह केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी एड्स नियंत्रण कक्षाने प्रयत्न करावेत. जिल्ह्यात एचआयव्ही बाधितांची संख्या घटत आहे, ही समाधानाची बाब आहे.

जिल्ह्यात सध्या १० हजार ५९४ रुग्ण असून हे रुग्ण सांगली, मिरज, उपजिल्हा रुग्णालय इस्लामपूर व भारती हॉस्पिटल येथे उपचार घेत आहेत. एचआयव्ही बाधित रुग्णांना सेवा देताना आवश्यक ती गोपनीयता बाळगावी. अन्न सुरक्षा योजनेंतर्गत धान्य मिळवून देण्यासाठी ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही, त्यांच्या रेशन कार्डसाठी पाठपुरावा करावा, असंही त्यांनी सांगितलं.

ते म्हणाले, "आरोग्य विभागाने एचआयव्ही एड्स व टी. बी. बाबत जनजागृती करण्यावर भर द्यावा. जनजागृतीसाठी युवकांचे गट तयार करावेत. जनजागृतीसाठी समाज माध्यमांचा उपयोग करावा. एचआयव्ही बाधितांच्या डायलिसिससाठी मिरज वैद्यकीय महाविद्यालयात स्वतंत्र डायलिसिस मशीनची सोय करण्यात आली आहे. हे डायलिसिस मशीन १५ जूनपूर्वी कार्यान्वित करावी. एचआयव्ही बाधितांची तपासणी तसेच एआरटी लिंक करणे व त्यांना आवश्यक आरोग्यविषयक सेवा पुरविण्यासाठी नवीन एआरटी सेंटरसाठीचा प्रस्ताव व आराखडा तातडीने पाठवावा.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Women Doctor : बहिणीसाठी शिक्षण सोडलं, वडिलांसोबत शेती करायचा भाऊ; कर्ज काढून MBBS केलं, एक महिन्यानंतर तिचा...

Laptop Repair Tips: लॅपटॉप खराब होण्यापासून वाचवण्यासाठी आजपासूनच 'या' 10 चुका करणे टाळा

Latest Marathi News Live Update : चांदसैली घाटातील सातपायरी वळणार कोसळली दरड

Viral News : कामगाराने केला १.२४ कोटींच्या बांगड्यांचा चुराडा, पण त्यानंतर मालकाने जे केले ते वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

Sangli Crime : सांगलीत खळबळ! ‘कृषी’ विभागातील शिपायावर तलवार हल्ला; गळ्याला फास लावला अन्

SCROLL FOR NEXT