habits which are harmful for our brain read full story  
health-fitness-wellness

काय सांगता! सतत गोड खाल्ल्याने मेंदूवर होतो परिणाम? या आहेत वाईट सवयी..

अथर्व महांकाळ

नागपूर: आपला मेंदू  म्हणजे आपल्या शरीरातील अत्यंत संवेदनशील आणि महत्वाचा भाग. आपल्या संपूर्ण शरीराला देण्याचे काम आणि आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवण्याचे काम आपला मेंदू करत असतो. त्यामुळे आपल्या शरीरातील इतर अवयांसोबतच आपल्या मेंदूची काळजी घेणेही महत्वाचे आहे. मात्र आपल्या काही वाईट सवयींमुळे आपल्याला मेंदूचे विकार होतात. या वाईट सवयी कोणत्या आहेत हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

कोणत्या आहेत या सवयी :

धूम्रपान 

धूम्रपान करणे तुमच्या शरीरासोबतच मेंदूसाठीही  धोकादायक आहे. यामुळे मेंदू कमजोर होतो.. एका विद्यापीठात झालेल्या अभ्यासानुसार धूम्रपानामुळे कॉर्टेक्सवर परिणाम होतो. ज्यामुळे स्मरणशक्ती आणि भाषा कौशल्य धोक्यात येते. 

पाण्याची कमतरता  

निरोगी राहण्यासाठी भरपूर पाणी प्यावे असे  सांगण्यात येते. पाणी पिणार्‍या लोकांचा मेंदू पाणी न पिणार्‍यांपेक्षा तब्बल 14 टक्क्यांहून अधिक चांगले काम करतो. 

ताण

ताण आल्यामुळे आपल्या मेंदूवरही वाईट परिणाम होतात. ज्यामुळे आपला मेंदू नीट काम करू शकत नाही. त्यामुळे तणाव येणे टाळले पाहिजे. ताणात असल्यास मूत्रपिंड कॉर्टिसॉलची निर्मिती करते. मात्र कॉर्टिसॉलची जास्त प्रमाणातील निर्मिती ही मेंदूच्या पेशींवर वाईट परिणाम करते.

इअरफोन

मोबाइलवर इअरफोन लावून गाणी ऐकण्याची सवय  प्रत्येकाला आहे. मात्र याचा वाईट परिणाम आपल्या मेंदूवर होऊ शकतो. गाणी हळू आवाजात ऐकायला हवीत.  जास्त आवाजात ऐकल्यास कान खराब होतात आणि मेंदूच्या पेशींचे अत्यंत नुकसान होते. 

झोप 

प्रत्येकाने रोज रात्री कमीत कमीत 7 ते 8 तास झोप घेणे आवश्यक असते. त्यामुळे मेंदू योग्य प्रकारे काम करण्यास मदत होते. मात्र व्यक्तीला पुरेशी झोप मिळाली नाही तर चिडचिड होते राग येतो परिणामी मेंदूचे कार्य बिघडते. 

आळस 

प्रचंड आळस केल्यामुळे आपल्या मेंदूवर वाईट परिणाम होऊ शकतो. यामुळे तुमची स्मरणशक्ति चांगली राहत नाही आणि तुमचं मेंदू उत्साही राहत नाही. कालांतराने मेंदू काम करत नाही. 

गोडाचे अतिप्रमाण 

आपल्या जेवणात नेहमी गोड पदार्थ हवाच अशी मागणी अनेक जणांची असते. मात्र आजच जास्त गोड पदार्थ खने कमी करा. करण यामुळे तुमच्या मेंदूची विचार करण्याची क्षमता कमी होऊ शकते. रूमची स्मरणशक्तीही कमी होऊ शकते.   
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAKISTAN SEMIS SCENARIOS : न्यूझीलंड हरला, म्हणून पाकड्यांनी जास्त फडफडू नये! उपांत्य फेरीचं समीकरण पाहताच येईल चक्कर...

T20 WC, NZ vs ENG : इंग्लंडने बाजी मारली, पाकिस्तानच्या जीवात जीव आला! न्यूझीलंड पराभूत होऊनही पोहचू शकतात उपांत्य फेरीत

Reliance Group: अंबानींच्या सून राधिका मर्चंट पैठणमध्ये! तीन महिन्यात दुसरा दौरा; पोलिस बंदोबस्तात प्रकल्पाला दिली भेट

Accident : सिंदखेड फाट्यावर दुचाकी चारचाकीची भीषण धडक; एक महिला ठार, एक जखमी

Mount Abu Name Change : जगप्रसिद्ध 'माउंट अबू'सह तीन शहरांचे नामांतर; मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT