jada pinkett  esakal
health-fitness-wellness

केसांचा Alopecia Areata हा आजार कसा असतो? काय आहेत लक्षण, जाणून घ्या

अमेरिकेच्या आरोग्य आणि मानव सेवा विभागाच्या मते, एलोपेशिया एरियाटा प्रकारात रोगप्रतिकारक शक्ती केसांच्या मुळांवर हल्ला करते

सकाळ डिजिटल टीम

ऑस्कर पुरस्काराच्या वेळी जे घडलं त्यानंतर विल स्मिथची बायको जेडा पिंकेट हिच्या आजाराची बातमीही वेगाने पसरली. त्यानंतर एलोपीशिया एरियाटा हा आजार म्हणजे काय त्याची लक्षणे याबाबात सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे हा आजार कसा असतो? त्याची लक्षणं माहिती असणं गरजेचं आहे.

एलोपीशिया एरियाटा आजार कसा असतो?

अमेरिकेच्या आरोग्य आणि मानव सेवा विभागाच्या मते, एलोपेशिया एरियाटा प्रकारात रोगप्रतिकारक शक्ती केसांच्या मुळांवर हल्ला करते. त्यामुळे केस प्रचंड प्रमाणात गळायला लागतात. यामुळे तुमच्या डोके आणि चेहऱ्यावरील केसांवर परिणाम होतो. सुरूवातीला कमी प्रमाणात केस गळतात. पण त्यानंतर काही वेळा मोठ्या प्रमाणात केसगळती सुरू होते. हा आजार झालेले बहुतेक लोकं निरोगी असतात. त्यांना इतर कोणतीही लक्षणे आढळून येत नाहीत.

will and jada pinkett

किती प्रकार - आरोग्य तज्ज्ञांच्या मते, तीन प्रकारे तुमचे केस गळू शकतात.

पॅची - हा सर्वात सामान्य प्रकार असून त्यात केस नाण्यांच्या आकाराच्या पॅचच्या स्वरूपात गळू लागतात. डोक्यापासून किंवा शरीराच्या इतर भागांपासून अशी केसगळती सुरू होते.

टोटालिस- या प्रकारात तुमच्या डोक्यावरील केस पूर्णच गळतात.

यूनिवर्सालिस- हा एक दुर्मिळ प्रकार आहे. याच डोके, चेहरा आणि शरीराच्या इतर भागातले केस पूर्णपणे गळतात.

जेडा पिंकेट स्मिथला आहे हा आजार

जेडा पिकेंटने २०१८ साली एका मुलाखतीदरम्यान या आजाराविषयी सांगितले होते. जेव्हा एलोपेशिया सुरू झाला तेव्हा त्याला सामोरे जाणे भीतीदायक होते. आंघोळ करताना हात भरून केस गळायचे. त्यादरम्यान तिने केस कापण्याचा निर्णय घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Citizen Participation Budget: पुणे महापालिकेचा लोकाभिमुख अर्थसंकल्प: नागरिकांना ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन विकासकामे सुचविण्याची संधी

Pune Road Safety: राजाबहादूर मील रस्त्यावर बिल्डरची मुजोरी कायम; चिखलामुळे अपघात, महापालिकेचा दंड व काम थांबवण्याचा इशारा

Agni 4 missile: 'डीआरडीओ'कडून 'अग्नी-4' ची यशस्वी चाचणी, तब्बल चार हजार किलोमीटरपर्यंतचे लक्ष्य भेदणार!

''Gen Z सगळ्यात प्रामाणिक पिढी, सरकारने आधीच बोलणी करायला पाहिजे होती'', सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले?

Pune civic roads issue: पुण्यात खड्ड्यांचा मारा कायम; महापौरांचा ‘यंदा खड्डे कमी’ दावा, स्थायी समिती अध्यक्षांनी शहरात भरपूर खड्डे असल्याचे मान्य

SCROLL FOR NEXT