health-fitness-wellness

सर्दी-खोकला-तापावर जालीम उपाय, ट्राय करा 5 प्रकारचे काढे

नामदेव कुंभार

कोरोना महामारीपासून बचाव करण्यासाठी लोक गोळ्या-औषधांसोबतच काढा पिण्याचाही सल्ला दिला जातो. वातावरणात अथवा पाण्यात बदल झाल्यानंतर अनेकांना सर्दी-खोकला यासारखे आजार उद्भभवतात. असं वाटते की ही कोरोनासारखी लक्षणं आहेत. पण ही कोरोनाची लक्षणं नाहीत. वातावरणाच्या बदलामुळे अथवा पाण्यामध्य बदल झाल्यामुळे अनेकदा सर्दी-खोकला अथवा छातीमध्ये कप साचतो. घरगुती उपायातून या आजारावर मात केली जाऊ शकते.

काढा पिल्यानं काय होतं? (Health Benefits of Kadha)

कोणत्याही आजारावर मात करण्यासाठी तुमच्या शरिरातील मोठ्या प्रमाणात रोग प्रतिकारकशक्ती हवी. कोणाला गोळ्या औषधांपेक्षा प्राकृतिक, घरगुती गोष्टींपासून फायदा मिळातो. सर्दी-खोकल्यासारख्या आजारांवर मात करण्यासाठी विविध प्रकारच्या काढा प्यावा, असा सल्ला दिला जातो. आज अशाच प्रकारच्या काढ्याची माहिती तुम्हाला देणार आहोत.

1. तुळशीचा काढा (Tulsi kadha recipe)

  • साहित्य :

    तुळशीची पाने 100 ग्राम , दालचीनी 10 ग्राम, कडीपत्ता 10 ग्राम, बडीशेप 50 ग्राम, छोटी इलायची 15 ग्राम आणि काली मिर्ची 10 ग्राम

  • कसा तयार कराल काढा :

    - सर्व साहित्य बारीक मिश्रण करुन एका भरणीमध्ये ठेवा.

- दोन कप पानी एखाद्या भांड्यात गरम करा.

- पानी उकळल्यानंतर मिश्रणाचा अर्धा चमचा टाका.

- थोडावेळ आणखी उकळू द्या. त्यानंतर गाळून कपामध्ये घ्या.

- चहाप्रमाणे गरम आहे तोपर्यंत हा काढा फुंकून फुंकून प्या...

2. लवंग, तुळस, आद्रक आणि काळी मिर्चीचा काढा (Laung Tulsi adrak kali mirch kadha recipe)

सर्दी-खोकला, नाक बंद अथवा छातीत कफ साचल्यानंतर हा काढा रामबाण उपाय ठरतो. लवंग, तुळसी, अद्रक आणि काळी मिर्चीचा काढा घेतल्यामुळे पचनक्रियाही सुधारते. आद्रकचा रस गळ्यातील खरखर कमी करतो.

  • कसा तयार कराल काढा -

    7-8 तुळशीचे पानं, 5 काळी मिर्ची, 5 लवंग आणि खिसलेला आद्रक घ्या. वरील पदार्थ भांड्यात टाका. त्यानंतर दोन कप पाणी ओता. 10 मिनिटांपर्यंत याला मंद आचेवर ठेवा. गरम गरम गाळून प्या...सकाळ-संध्याकाळी याचं सेवन केल्यास सर्दी-खोकला दूर नाहिसा होईल.

3. इलायची आणि मधाचा काढा (Ilaichi honey kadha)

कोरोनाच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये श्वास घेण्यास त्रास होतो. मात्र श्वास घेण्यास त्रास होणं, हे कोरोनाचेच लक्षण नाही. पण असा त्रास होत असेल तर कोरोना चाचणी करण्यापूर्वी मध-इलाइचीचा काढा घेऊन पाहा.

  • कसा तयार कराल -

    भांड्यात दोन कप पाण्यात एक चमचा इलाइची पावडर टाका. दहा मिनिटांपर्यंत याला मंद आचेवर ठेवा. त्यानंतर ग्लासमध्ये गाळून घ्या. यामध्ये थोडा मध मिसळा आणि प्या.

4. लवंग-तुळशी आणि काळे मिठ (Laung tulsi And black salt kadha recipe)

लवंग-तुळशी आणि काळे मिठाच्या काढ्यामुळे सांध्याचं दुखणं कमी होतं. हा काढा तयार करण्यासाठी एका भांड्यात दोन ग्लास पाणी घ्या. ते मंद आचेवर ठेवा. यामध्ये 8 ते 10 तुळशीची पाने टाका. पाच लवंग टाका. याला चांगलं उकळू द्या. पाणी आर्धे झाल्यानतर गाळून ग्लासमध्ये घ्या. यामध्ये चवीनुसार मिठ टाका आणि फुंकून फुंकून प्या.

5. व्हायरल ताप कमी करणारा काढा (Viral Fever Kadha Recipe)

  • साहित्य -

बदलत्या वातावरणामुळे अनेकांना ताप येतो. अशा व्हायरल ताप आणि गोळ्या औषधांपासून वाचण्यासाठी काढ्याचं प्राशन करा. यासाठी इलायची, दालचीनी, पाच काळी मिर्ची, तीन लवंग, अर्धा चमचा Ajwain आणि हळद घ्या.

  • कसा तयार कराल काढा :

एका भांड्यात दीड ग्लास पाणी टाका. यामध्ये वरील सर्व सामुग्री टाका. पाणी आर्धे झाल्यानंतर गाळून घ्या. यामध्ये एक चमच हळद टाका आणि फुंकून फुंकून प्या. उ

टीप - वरील सर्व प्रकारचे काढे शरिरात उष्णता निर्माण करतात. त्यामुळे काढा पिण्यासोबत आपल्या खाण्यापिण्यावरही विशेष भर द्या. कोणताही काढा उपाशीपोटी घेऊ नका. तसेच वरील सर्व घरगुती उपचार आहेत. जर तुम्ही एखाद्या गंभीर आजारासाठी गोळ्या-औषधं घेत असाल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच काढा घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Visarjan 2025 : लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप ! दुसऱ्या दिवशीही राज्यासह देशभरात विसर्जन मिरवणुकांचा उत्साह

Sunday Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात कमी वेळेत बनवा बटाटा अन् रव्यापासून स्वादिष्ट पुरी, लगेच नोट करा रेसिपी

Ganpati Visarjan 2025 Live Updates : : पुण्यात २२ तासांनंतरही गणेश विसर्जन मिरवणुकीचा उत्साह

आजचे राशिभविष्य - 7 सप्टेंबर 2025

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 7 सप्टेंबर 2025

SCROLL FOR NEXT