health-fitness-wellness

रोसासिया म्हणजे काय? जाणून घ्या या त्वचाविकाराविषयी

शर्वरी जोशी

चुकीची आहारपद्धती, बदललेली जीवनशैली, अपूर्ण झोप आणि प्रदूषण या सगळ्याचा थेट परिणाम आपल्या त्वचेवर होतो. त्यामुळे सध्याच्या काळात प्रत्येक जण त्वचेशी संबंधित समस्यांनी त्रस्त आहेत. यामध्येच सध्या रोसासिया ही त्वचेशीसंबंधित समस्या अनेकांना असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, हा रोसासिया म्हणजे काय? किंवा तो कशामुळे होतो? याविषयी नागरिकांमध्ये अनेक समज-गैरसमज आहेत. रोसासिया या विकारात चेहऱ्यावर लालसरपणा आणि सूज येते. गोऱ्या रंगाचे लोक आणि रजोनिवृत्तीमधील स्त्रियांमध्ये हा आजार अधिक सामान्य आहे. त्वचेशी संबंधित या आजाराचं वेळीच निदान व उपचार होणं गरजेचं आहे. अन्यथा रोसासिया वाढू शकतो. अशा स्थितीत चेहऱ्यावर मुरूम येणं, कपाळावर व हनुवटीवर लाल ठिपके दिसणं, चेहऱ्यांवरील त्वचेखालील रक्तवाहिन्यांना सूज अशी लक्षणं दिसून येतात. या आजारामुळे त्वचेची गुणवत्ता कमी होते. याशिवाय अनेकांचा आत्मविश्वास कमी होतो. रोसासिया या आजारात चेहऱ्याचा लालसरपणा वाढत असल्याने घराबाहेर पडताना अशी लोक घाबरतात. लोक काय म्हणतील, या विचारातून ते घरातून बाहेर पडत नाहीत. त्यामुळे दैनंदिन कामं ही त्यांना करता येत नाहीत. परंतु, रोसासिया या आजाराचं वेळीच निदान व उपचार झाल्यास रूग्ण बरा होऊ शकतो. त्यामुळेच रोसासियाची होण्याची कारणे आणि त्यावरील उपाय कोणते ते पाहुयात.

रोसासिया  होण्यामागील कारणे -

रोसासिया  हा एक त्वचेचा विकार आहे जो आपल्या जन्मजात रोगप्रतिकारशक्तीच्या प्रणालीमुळे होतो. या आजाराचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही. परंतु, यासंदर्भात अनेक सर्वेक्षण करण्यात आले आहेत. त्यातून काही गोष्टी उघड झाल्या आहेत.

१. अनुवांशिक कारणांमुळे रोसासिया हा आजार होऊ शकतो.

२.  आतड्यांना संसर्ग झाल्यास

३. त्वचेचा संसर्ग

४. रजोनिवृत्ती

५.  सूर्यप्रकाश

६.भावनिक ताण

७.  थंड हवामान

८. अतिरिक्त व्यायाम

९. मद्यपान

१०. मसालेदार पदार्थांचे सेवन

रोसिसिया हा आजार टाळण्यासाठी काय करावेत –

१. प्रखर सूर्यप्रकाशात जाणं टाळावं. 

२.  त्वचेच्या संरक्षणासाठी दर्जेदार सनस्क्रीनचा वापर करावा.

३. घराबाहेर पडतांना टोपी, स्कार्फसोबत घ्या.

४.शारीरिक व मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी छंद जोपासा आणि योगाभ्यास करा.

५. मद्यपान टाळा.

६.  मसालेदार खाद्यपदार्थांचे सेवन करू नका.

७.त्वचा आणि केसांची निगा राखणारी उत्पादने निवडताना अधिक काळजी घ्या.

८.  चेहऱ्यावर रेशमी स्कार्फ बांधून त्वचेचे संरक्षण करा.

९. उन्हात उभं राहून व्यायाम करु नका.

१०. नियमितपणे औषधे आणि उपचार घ्या

(लेखिका डॉ. रिंकी कपूर या मुंबईतील एस्थेटिक क्लिनिक अँड फोर्टिस हॉस्पिटलमध्ये कॉस्मेटिक डमॉटोलॉजिट आणि डर्मेटो-सर्जन आहेत.)
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! पिंपरी चिंचवडच्या मोशीमध्ये होर्डिंग कोसळलं; अनेक गाड्या दबल्या

SRH vs GT Live Score : गुजरात जाता जाता हैदराबादला धक्का देणार की SRH प्ले ऑफचं तिकीट सेफ करणार?

Amit Shah : ..म्हणून PFI वर बंदी घातली! बिहारमध्ये गृहमंत्री अमित शाहांचा खुलासा; म्हणाले...

Bengaluru Crime: बाथरुममध्ये गळा चिरलेल्या अवस्थेत आढळला तरुणीचा मृतदेह! आई आहे मानवाधिकार कार्यकर्ता

Petrol, Diesel Rates : पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त? सरकारचा 'टॅक्स'संदर्भात मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT