health-fitness-wellness

तुमच्या घरातील वृद्धही चालतांना अचानक पडतात?

‘डोमेस्टीक फॉल्स’ म्हणजे नेमकं काय?

शर्वरी जोशी

घरात एखादी वृद्ध व्यक्ती असेल तर सहाजिकच त्यांच्या आरोग्याविषयी प्रत्येक गोष्टीची चिंता कुटुंबियांना असते. एकीकडे वय वाढत असतांना त्यांचा शरीरावरील ताबा सुटत असतो. त्यामुळे चालतांना अचानक पडणे, चक्कर येणे असे प्रकार वृद्धांसोबत घडत असतात. विशेष म्हणजे केवळ घराबाहेरच नव्हे तर, घरात चालतांनादेखील हे लहान मोठे अॅक्सिडेंट होऊ शकतात. यालाच वैद्यकीय भाषेत ‘डोमेस्टीक फॉल्स’ (Domestic Falls) असेही म्हटले जाते. अनेकदा लहान-मोठ्या अपघातामुळे वृद्धांच्या शरीरावर विपरीत परिणाम होतो. यात अनेकदा त्यांना कायमस्वरुपीचं अपंगत्वही येतं. त्यामुळेच घरात वृद्ध व्यक्ती असतील तर त्यांची नेमकी कशी काळजी घ्यावी किंवा कोणत्या कारणामुळे त्यांचा अपघात होऊ शकतो याविषयीची माहिती पुण्यामधील लोकमान्य रुग्णालयातील जॉंईट रिप्लेसमेंट सर्जन डॉ. अनुप गाडेकर यांनी दिली आहे. (Health problems Domestic Falls Causes and treatment)

घरगुती दुर्घटना होण्यामागची कारणे -

१. वाढत्या वयामुळे स्नायुंना येणारा कमकुवतपणा

२. चालताना तोल जाणे

३. वयोमानानुसार आकलनशक्ती कमी होणे

४. प्रदीर्घ आजार व त्यामुळे होणारे शारीरिक बदल उदा. संधिवात, पार्किन्सस, अल्झायमर

५. दृष्टी व ऐकण्याची क्षमता कमी होणे.

भौगोलिक परिस्थितीमुळेही घडू शकतो उपघात

१. अपुरा प्रकाश

२. घरात अस्ताव्यस्त पडलेले सामान

३.लुज कार्पेट्स

४. निसरड्या जागा अथवा जमिनी

५. सुरक्षित साधनांचा अभाव

६. झोपेच्या व इतर गुंगी आणणाऱ्या औषधांचा वापर

घरगुती दुर्घटनांमुळे कोणत्या प्रकारची दुखापत होऊ शकते

१. खुब्याच्या हाडाचे फ्रॅक्चर

२. मनगटाच्या हाडाचे फ्रॅक्चर

३. मणक्याच्या हाडाचे फ्रॅक्चर

४. घोट्याजवळील हाडाचे फ्रॅक्चर

घरगुती अपघात टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यावी

१. न घसरणाऱ्या चप्पल अथवा बुटांचा वापर करणे

२. घरात पुरेसा प्रकाश असावा. झोपायची खोली, बाथरुम, जिना, हॉल येथे नाईट लॅम्प असावेत.

३. कार्पेट जमिनीवर व्यवस्थित फिक्स करणे.

४. बाथरुम व शौचालयांमध्ये आधार घेता येईल असे बार तयार करावेत.

५. जिन्याच्या दोन्ही बाजुंना आधार घेण्यासाठी रेलींग असावेत.

६.वृध्द लोकांनी शिडीवर चढणे अथवा स्टुलवर चढणे टाळावे.

७. घरातील निसरड्या जागांची नियमितपणे साफसफाई करणे

८.कान व डोळे यांची नियमितपणे वैद्यकीय तपासणी करणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CCTV: अजित पवारांच्या विमान अपघाताचा सीसीटीव्ही आला समोर; प्लेन कोसळलं अन् झाला स्फोट

Baramati Plane Crash : विमान अपघातात अजित पवारांचा दुर्दैवी मृत्यू; ॲड. प्रकाश आंबेडकरांनी वाहिली श्रद्धांजली, म्हणाले...

Ajit Pawar Death News LIVE Updates: शरद पवार, प्रतिभा पवार बारामतीत दाखल

Ajit Pawar Last Message : मुलाबाळांना चांगलं शिकवा, निर्व्यसनी राहा, आयुष्य नीट जगा; निधनापूर्वी अजित पवारांनी दिलेला अखेरचा सल्ला

Ajit Pawar Plane Crash: बारामती विमान अपघातात निधन झालेली क्रु मेंमर पिंकी माळी कोण?

SCROLL FOR NEXT