Dizziness Symptoms esakal
health-fitness-wellness

Dizziness Symptoms : 'चक्कर येण्यामागील 80 टक्के कारणे ही कानाशी संबंधित असतात'; यावर कसा करता येईल उपचार?

चक्कर येण्यामागील ८० टक्के कारणे ही कानाशी संबंधित असतात.

सकाळ डिजिटल टीम

चक्कर येण्याची असंख्य कारणे आहेत. त्यामध्ये रक्तातील साखर कमी होणे, रक्तदाब कमी होणे, रक्तातील लोहाचे प्रमाण कमी होणे ही कारणे तर सर्वश्रुत आहेत.

-डॉ. सायली फडके (कान, नाक, घसातज्ज्ञ)

चक्कर (Dizziness) येणे ही डोकेदुखीनंतरची सगळ्यात सामान्य तक्रार असून, नेमके उपचार कुठे करावे हे माहित नसल्यामुळे बहुतांश रुग्णांचा अस्थिरोग तज्ज्ञ, मेंदूविकार तज्ज्ञांपासून (Neurologist) सगळीकडे फेरफटका मारून होतो; मात्र, चक्कर येण्यामागील ८० टक्के कारणे ही कानाशी संबंधित असतात आणि हेच जनसामान्यांना माहीत नसल्यामुळे बहुतांश रुग्णांचा घोळ होतो व रुग्ण वेगवेगळ्या तज्ज्ञांकडे फिरत राहतो. सर्व तपासण्या, अगदी मेंदूचे MRI करून झाल्यानंतर पेशंट कानामुळे तर चक्कर येत नाहीना हे तपासण्यासाठी कानाच्या डॉक्टरांकडे जातो.

चक्कर येते ते लोक त्याचे वर्णन अनेक वेगवेगळ्या संवेदना म्हणून करू शकतात जसे की, हालचाल किंवा खोली फिरल्याची खोटी भावना, डोके हलके होणे किंवा अशक्तपणा जाणवणे, तरंगणे किंवा डोक्यात जडपणाची भावना, चालणे, उभे राहणे किंवा डोके हलवल्याने या भावना वाढतात व रुग्णाची परिस्थिती जास्त बिघडू शकते. ही मळमळ इतकी अचानक व इतकी तीव्र असू शकते की, तुम्हाला खाली बसायला किंवा झोपायला लागू शकते. अशा घटना काही सेकंद किंवा अनेक दिवस टिकू शकतात व त्यांची पुनरावृत्तीदेखील होऊ शकते.

चक्कर येणे याबरोबर रुग्णाला अजूनही लक्षणे दिसतात जसे की, कानामधून घंटीसारखा आवाज येणे, कानाला दडा बसणे, कानाची ऐकण्याची क्षमता कमी होणे, अशी कोणतीही लक्षणे आढळल्यास त्वरित कानाच्या डॉक्टरांना भेटणे गरजेचे आहे. चक्कर येण्याची असंख्य कारणे आहेत. त्यामध्ये रक्तातील साखर कमी होणे, रक्तदाब कमी होणे, रक्तातील लोहाचे प्रमाण कमी होणे ही कारणे तर सर्वश्रुत आहेत.

याचबरोबर सर्वाइकल स्पाँडिलायटिस, मेंदूचे विकार (छोट्या मेंदूचा रक्तपुरवठा कमी होणे म्हणजेच स्ट्रोक, ब्रेनट्युमर इ). या सर्व कारणांचाही समावेश होतो; परंतु चक्कर येण्यामागे ८० टक्के कारणे कानाशी संबंधित आजारांमध्ये असतात आणि कानाशी संबंधित १० ते १२ प्रकारच्या आजारांमुळे चक्कर येऊ शकते म्हणजेच कानाच्या विविध आजारांचे चक्कर येणे हे एक प्रकारचे लक्षण आहे. यामध्ये प्रामुख्याने २० टक्के चक्कर ही BPPV (सौम्य पेरिफेरल पोझिशनल व्हर्टिगो) मुळे येते.

सौम्य पॅरोक्सिस्म्ल पिझिशन व्हर्टिगो : या प्रकारची चक्कर BPPV म्हणूनही ओळखली जाते आणि कानात ओटोलिथ नावाच्या कॅल्शिअम कणाच्या हालचालींमुळे होऊ शकते. हे कण जेव्हा स्वत:ची मूळ जागा सोडून अंतर्कर्णाच्या सेमी सर्क्युलर कॅनॉलमध्ये जाऊन फिरतात तेव्हा अशी चक्कर येते. यामुळे खाली पडण्याची किंवा तोल गमावल्याची भावना येते. हे सहसा कानाच्या त्या भागात घडते जे गुरूत्वाकर्षणाची संवेदना पकडते. ओटोलिथच्या हालचालीमुळे रुग्णाला असे वाटू शकते की, त्याचे डोके फिरत आहे किंवा डोलत आहे, तर प्रत्यक्षात रुग्ण स्थिर असू शकतो. याचे निदान करण्यासाठी सध्याची अत्याधुनिक पद्धती म्हणजे videonystagmograpahy या टेस्टमध्ये डोळ्याला गॉगल्स लावून डोळ्यांमध्ये होणाऱ्‍या अनैच्छिक हालचालींचा अभ्यास केला जातो व कानाच्या आजराचे निदान केले जाते.

डोके गोलाकार फिरवून उपचार वेगवेगळ्या प्रकारचे ’मॅन्युवर्स’ केवळ डोके हाताने वेगवेगळ्या कोनांमधून शास्त्रशुद्ध पद्धतीने फिरवण्याचा उपचार केला जातो आणि त्यामुळे हा आजार बरा होतो. त्यासाठी कुठल्याही प्रकारच्या औषधांची गरज शक्यतो भासत नाही. चक्कर येण्याच्या इतर कारणांमध्ये अंतर्कर्णाचा दाह, आतल्या कानाचे व्हायरल इन्फेक्शन, कानाच्या नसेचे ट्युमर इ. आजारांचा समावेश होतो. अंतरकर्णातील ’लॅबिरिंथ’ किंवा ’कॉकलिया’ या भागातील विविध दोषांमुळे चक्कर येण्याचे कारण सर्वाधिक आहे. कानाच्या आजाराचे नेमके कारण शोधावे लागते आणि आजाराचे अचूक निदान झाल्यानंतर उपचार केले जातात. काही आजार व स्थितीमध्ये शस्त्रक्रिया करावी लागते; मात्र अचूक निदानानंतर खात्रीशीर उपचार होऊ शकतात व आजार बरा होऊ शकतो.

(डॉ. स्वस्तिक क्लिनिक येथे कान, नाक, घसातज्ज्ञ आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT