corona vaccination corona vaccination
health-fitness-wellness

स्तनदा मातांनी कोविड लस घ्यावी का? डॉक्टर सांगतात...

लस घेण्याविषयी अजूनही लोकांमध्ये अनेक गैरसमज आहेत

सकाळ डिजिटल टीम

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखायचा असेल तर कोविड लस घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळेच गेल्या काही महिन्यांपासून देशात मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. यात अनेकांनी लशींचे दोन्ही डोस घेतले आहेत. तर काही जणांनी अद्यापही एकही डोस घेतलेला नाही. विशेष म्हणजे लस घेण्याविषयी अजूनही लोकांमध्ये अनेक गैरसमज आहेत. त्यातच गर्भवती स्त्रिया किंवा स्तनपान करणाऱ्या स्त्रियांनी लस घ्यावी की घेऊ नये असा एक प्रश्न अनेकांना सतावत आहे. त्यामुळेच स्तनपान करणाऱ्या स्त्रियांसाठी कोविड लस घेणं कशाप्रकारे गरजेचं आहे हे डॉक्टरांनी सांगितलं आहे. (health when can pregnant breastfeeding mother take covid vaccine)

२०२० मध्ये कोरोनाने देशभरात एकच हाहाकार माजवला होता. कोरोना रूग्णांच्या वाढत्या संख्येमुळे लोकांच्या मनात भीती निर्माण झाली होती. या कोविड-१९ व्हायरस संक्रमणाची चेन ब्रेक करण्यासाठी जानेवारी २०२१ पासून लसीकरण अभियानाला सुरू करण्यात आले. या अभियानांतर्गंत १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्यात येत होती. परंतु, गर्भवती आणि स्तनदा मातांना या लसीकरण अभियानातून वगळण्यात आले होते. मात्र, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत गर्भवतींना संक्रमणाचा धोका अधिक असल्याचं समोर आलं आहे. यासंदर्भात ‘‘द इंडियन कॉन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’’ (ICMR), आणि ‘‘द फेडरेशन ऑफ ऑब्स्टेट्रिक अँड गायनेकोलॉजिकल सोसायटीज ऑफ इंडिया’’ (FOGSI) या संस्थांनी विविध अभ्यास आणि संशोधनानंतर गर्भवती व स्तनदा मातांना लसीकरणात समाविष्ट करून घ्या असे म्हटले. त्याद्वारे केंद्र सरकारने गर्भवती व स्तनदा मातांनाही लसीकरण करून घेण्याची परवानगी दिली आहे. परंतु, लसीकरणाबाबत अनेक कुटुंबांमध्ये अद्याप जागृती झालेली नाही. गर्भवती महिला व त्यांचे कुटुंबीय यांच्या मनामध्ये लसीकरणासंदर्भात भीती आहे. ही भीती काढून टाकणे गरजेचे आहे.

स्तनपान करणाऱ्या मातांना लस घेणं का आवश्यक आहे?

कोरोनाची लागण होण्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी लसीकरण हा एकमेव पर्याय आहे. भारतात सध्या कोविशिल्ड, कोवॅक्सीन आणि स्पुटनिक या तीन लस उपलब्ध आहेत. स्तनपान करणाऱ्या मातांसाठी ही लस अतिशय फायदेशीर आहे. म्हणूनच स्तनपान करणाऱ्या महिलांनी लसीकरण अजिबात टाळू नये.

स्तनपान करणाऱ्या स्त्रीने लस घेतल्यानंतर तिच्या शरीरात अँटीबॉडीज तयार होतात. व ते दुधावाटे बाळाला मिळतात. त्यामुळे कोविड-१९ विषाणूपासून बाळाचे संरक्षण करण्यात मदत मिळते. यामुळे स्तनपान करणाऱ्या महिलांना कोविड लस घेतली पाहिजे.

लस घेतल्यानंतर ताप येणं, थंडी वाजणे, अंगदुखी, डोकेदुखी, इंजेक्शन दिलेल्या हातावरील भागात सूज येणं आणि थकवा जाणवणं, असा त्रास उद्भवू शकतो. परंतु स्तनपान करणाऱ्या महिलांना घाबरून जाऊ नये. लसीकरणानंतर ही लक्षणं दिसून येणं स्वाभाविक आहे. कोविड-१९ लस माता आणि बाळाच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. म्हणून लसीकरणाला घाबरून त्याकडे दुर्लक्ष करू नयेत.

(डॉ. अर्चना साळवे या पुण्यातील अपोलो क्लिनिक येथे प्रसूतिशास्त्रज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ आणि वंध्यत्व विशेषज्ज्ञ आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Retirement Plan : मोठी बातमी! अमित शहांनी सांगितला ‘रिटारयमेंट प्लॅन'

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Bhoom Crime : भूममध्ये कत्तलीसाठी जाणारी १६ जणावरे पकडली, आठ लाखाचा मुद्देमाल जप्त

Lungs Health Tips: थोडं चाललं तरी धाप लागते? श्वास घेताना त्रास होतोय? जाणून घ्या तज्ज्ञांनी सांगितलेले ५ सोपे घरगुती उपाय!

Bike Accident : दोन दुचाकींची समोरासमोर धडक; १ जण ठार, तर ३ जण जखमी

SCROLL FOR NEXT