health news summer juice recipes
health news summer juice recipes e sakal
health-fitness-wellness

वजन घटवायचंय? मग दररोज प्या कमी कॅलरीजचे 'हे' ज्यूस

शर्वरी जोशी

सध्याच्या काळात प्रत्येक जण फिटनेस फ्रीक झाला आहे. त्यामुळे अनेक जण नियमितपणे वर्कआऊट, डाएट असं बरंच काही फॉलो करत असतात. मात्र, नियमितपणे या सगळ्या गोष्टी करणं अनेकांना शक्य होत नाही. त्यामुळेच अशा वेळी आपल्या दररोजच्याच आहारात असे काही किरकोळ बदल केले पाहिजेत ज्यामुळे वाढत्या वजनाला आळा बसू शकतो. म्हणूनच, वजन कमी करणारे व कमी कॅलरीज असलेले ज्यूस कोणते ते पाहुयात. (healthy-drink juices-that-are-very-low-in-calories)

१. गाजराचं ज्यूस -

गाजरामध्ये फायबर व व्हिटॅमिन ए चं प्रमाण जास्त असतं. तसंच त्यात कॅलरीजदेखील अत्यंत कमी असतात. त्यामुळे वजन कमी करणाऱ्या व्यक्तींनी आहारात नियमितपणे गाजराच्या ज्यूसचा समावेश केला पाहिजे. गाजराच्या ज्यूसमध्ये केवळ ३९ कॅलरीज असतात. त्यामुळे वजन झटपट कमी होण्यास मदत मिळते.

२. कारल्याचा ज्यूस -

कारलं म्हटलं की अनेक जण नाकं मुरडतात. परंतु, कारल्याच्या रसात १७ कॅलरीज असतात. त्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यासोबतच मधुमेहींसाठीदेखील हा रस फायदेशीर आहे.

३. काकडीचा रस -

काकडीच्या रसामुळे फॅट बर्न होण्यास मदत मिळते. या रसात केवळ १६ कॅलरीज असतात. त्यामुळे वजन कमी करणाऱ्यांनी आहारात नियमितपणे काकडीचा रस घ्यावा.

४. आवळा ज्यूस -

आवळ्याच्या रसामुळे मेटाबॉलिज्म वाढण्यास मदत मिळते. तसंच फॅट जलद गतीने बर्न होतं. एक कप आवळ्याच्या रसात १५ कॅलरीज असतात.

५. डाळिंबाचा रस -

डाळिंबाच्या रसात ५४ कॅलरीज असतात. त्यामुळे वजन घटविण्यास याचा फायदा होतो. हा रस प्यायल्यामुळे पोट लवकर भरतं. तसंच त्वचेचा पोतदेखील सुधारतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: प्रज्वल्ल रेवण्णाविरोधातील फास आणखी आवळला! निघालं अटक वॉरंट

IPL 2024 RCB vs CSK Live Score: बेंगळुरूने गमावली तिसरी विकेट! आक्रमक खेळणारा रजत पाटिदार आऊट, अर्धशतकही हुकलं

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

Video: 'सिग्मा मेल' म्हणून केलं रोस्ट, धमकी मिळाल्यावर कॅरी मिनाटीने टेकले गुडघे, काय होतं व्हिडिओमध्ये? पाहाच

MI vs LSG: मुंबईच्या पराभवानंतर रोहितबरोबर नीता अंबानींची आधी गहन चर्चा अन् मग ड्रेसिंग रुममध्ये दिलं स्पेशल मेडल, Video व्हायरल

SCROLL FOR NEXT